भाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १० पॉईंट महत्वाचे आहेत

सगळ्या एक्झिट पोल्सला मागे टाकत भाजप गुजरातमध्ये दमदार विजया मिळवत आहेत. भाजपच्या पारड्यात सध्या १५७ जागा असून ५७ जागांवर पक्षाने विजय मिळवला आहे तर १०० जागांवर लीड कायम आहे. या लीडमुळे भाजप आजपर्यंतचे स्वतःचे आणि गुजरातच्या इतिहासातले सर्व रेकॉर्ड तोडणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं सांगितलं जातंय. त्यांचा शपथविधी १२ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले जातेय.

गुजरात निवडणूक निकालात हे १० महत्वाचे मुद्दे आहेत.

१) भाजपाला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळत असला तरी आप १८२ जागांपैकी ५ जागांवर लीडवर आहे. जरी आपच्या जागा कमी असल्या तरी आपचा गुजरातमधील वोट शेअर अंदाजे १२.८३ टक्के आहे. त्यामुळे आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल.

२) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भूपेंद्र पटेलच पुढचे मुख्यमंत्री असणार आणि ते येत्या सोमवारी शपथ घेणार आहेत. तर संध्याकाळी ६ वाजता भाजपच्या दिल्ली मुख्यालयात होणाऱ्या विजय समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

३) आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपने ४२ जागा जिंकल्या आहेत तर ११५ जागांवर लीडवर आहे. एकूण १५७ जागा जिंकत असलेली भाजप आजपर्यंतच्या स्वतःच्याच ७ टर्मचे रेकॉर्ड मोडणार आहे.

४) गुजरात निवडणुकीचं नेतृत्व करणारे भाजपचे गुजरात महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी सांगितलंय की, “भाजपला गुजरातमध्ये मिळालेलं यश हे गुजरात मध्ये मोदीजींनी केलेली तपस्या आहे.”

५)  १९५० दशकात काँग्रेसचं वर्चस्व आदिवासी सीट्सवर वर्चस्व होतं. या जागा १९८५ मध्ये खाममध्ये महत्वपूर्ण  होत्या. त्या आदिवासी बेल्टमधील २७ पैकी २६ जागांवर भाजप लीडवर आहे. २०१७ मध्ये आदिवासी पट्ट्यात भाजपाला फक्त ८ जागा मिळाल्या होत्या तर १५ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. 

६) १९८५ मध्ये माधव सिंग सोळंकी यांच्या खाम प्रयोगाने काँग्रेसला गुजरातमध्ये १४९ इतक्या ऐतिहासिक जागा मिळाल्या होत्या. मात्र हा रेकॉर्ड आता भाजप तोडणार आहे. २०१७ मध्ये काँग्रेसकडे ७७ जागा होत्या त्या जागा सुद्धा काँग्रेसला वाचवता आल्या नाही, फक्त १६ जागांवर काँग्रेस लीडवर आहे.

७) अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे काँग्रेसने गुजरातमध्ये अतिशय वाईट कामगिरी केली असं सांगण्यात येतेय. यासोबतच १९८५ मध्ये खामचा प्रयोग करणाऱ्या माधव सिंग सोळंखी यांचाही निधन झालंय.

८) आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी भविष्यवाणी केली होती की, गुजरातमध्ये भाजपच्या फक्त ९० किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक जागा निवडून येतील. परंतु त्यांची भविष्यवाणी खोटी ठरली आणि भाजपने रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.

९) गुजरातच्या निवडणुकीत भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या नरेंद्र मोदींनी ३० पेक्षा अधिक रॅली केल्या होत्या. तर काँग्रेसचा मुख्य चेहरा असलेल्या राहुल गांधी यांनी फक्त २ रॅली केल्या होत्या.

१०) १९९५ पासून गेली सात टर्म भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. इथूनच मोदींनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात प्रवेश केला होता. ते १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते, म्हणून हा विजय त्यांच्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी महत्वाचा मानला जातोय.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.