JNU च्या मुलांना सपोर्ट दिला म्हणून शेकडोजण दीपिकाच्या पिक्चरचं तिकीट कॅन्सल करत आहेत. पण..

देशात माहौल लई गरम हाय. काय तर ते सीएए की कशावरून तर वाद सुरु आहेत. शाळा कोलेजातली पोर मारामारी करालेत. whatsappवर बघीतलो ओ मी. लई राग आला. तुमच्या आईबापान एवढ्यासाठीच फी भरून पाठवलंय का रे लेकानो. देश एवढ पुढ चाललाय आणि ही कार्टी भांडत बसल्यात.

यात अमेरिकेचा हात असला पाहिजे असं माझ १००% मत झालं. मी तर पहिला मिस कॉल देऊन आपला त्या बिलाला सपोर्ट जाहीर केला.

काल टीव्ही बघत होतो. या राजकारण्यांचा खेळात फिल्मस्टारसुद्धा सामील झालेले दिसले. आता ते अनुराग कश्यप हायच तसलं म्हणा. डोळे बघितल तरी गोन केस वाटते. पण धक्का मला तेव्हा बसला जेव्हा माझी दीपिका पदुकोन उर्फ माझी लाडकी दिपू त्या टूकडे टूकडे गंगच्या जेएनयु मध्ये गेलेली दिसली. त्यांच्याबरोबर आंदोलनात सामील झाली.

माझ हार्ट ब्रेक झालं. दिपूनं त्या वेंधळ्या रणवीरबरोबर लग्न केली तरी मी ते खपवून घेतलेलं. पण हे जरा अतीच झालं. आता मोठी झालीय ती, दिपूला तरी कळायला पाहिजे नां की पिक्चरच्या प्रमोशन पायी ती देशद्रोही कार्यात सामील होत आहे ते. रागच आला.

काल रात्रीच माझ्या मित्रांच्या ग्रुपवर मेसेज आला की दीपिकाचे पिक्चर बॉयकॉट करा. दिपूचा आता एक पण पिक्चर बघायचं नाही अस ठरवलं. 

मला स्वतःला तिचा आता येणारा छ्पाक बघायची इच्छा होती. एकतर्फी प्रेमात चेहऱ्यावर असिड फेकणाऱ्या मुलीचा रोल ककरायचं धाडस केलेलं दिपू नं. पण काय करायचं देशासाठी भावनिक होऊन चालणार नाही. एका मित्रान त्याने बुक केलेलं तिकीट कॅन्सल केलेल्याचा मेसेज दाखवला. सगळ्यांनी त्याच कौतुक केलं.

असच पाहिजे या फिल्म सेलिब्रेटीनां. स्वतःला सुपरस्टार समजून काहीही करतात म्हणजे काय? लगेच फेसबुक सुरु केलं आणि दीपिकाच्या वॉलवरून जाऊन मस्त शिव्या घातल्या. आता मी छ्पाक बघणार नाही फक्त तानाजी बघणार असं पण सांगितलं. मनाला बर वाटलं.

रात्री असच जरा नेटपॅक शिल्लक आहे म्हणून सर्फिंग करत बसलेलो तो पर्यंत खूप जण दिसले जे छ्पाकच तिकीट कॅन्सल केलेले. याच लोकांच्या जीवावर देश टिकून आहे अस म्हणत माझी छाती अभिमानाने भरून आली.

शेकडोंजण तिकीट कॅन्सल करत होते.

सहज म्हणून त्यातल्या एकाच तिकीट बघीतलो. तर ते बुक माय शो वर काढलेलं तिकीट होतं. बडोद्यात सिनेमा आर्क नावाच्या थिएटरमध्ये गोल्ड A-०९ ते A-१० अशी तीन तिकीट बुक केलेली. ४२० रुपये परत आलेले. थोड खाली गेल्यावर बघितल परत एका मुलाने दीपिकाला शिव्या घालत तिकीट कॅन्सल केलेलं. त्याच तिकीट बघितल्यावर धक्का बसला. हे तिकीट सुद्धा तेच बडोद्यामधलं होतं.

डोक चक्रावल. त्यानंतर ते सगळे मेसेज काढून बघितले. सगळ्यांनी तोच फोटो शेअर केलेला. आमच्या त्या मित्राचा ग्रुपवरचा मेसेज परत एकदा वाचला. त्या गड्याने पण तेच बडोद्याच  सिनेमा आर्क थिएटरचं तिकीट टाकलेलं. लगेच त्याला फोन लावला म्हटल,

“फुकनीच्या तू कधी गेलास र गुजरातला?”

त्याला शिव्या घातल्यावर त्यां सांगितला की असच दुसऱ्या ग्रुपवर मेसेज आलेला तो मी पुढ ढकलला.

त्याला म्हटल पुढ ढकलला पण स्वतःच्या नावावर का ढकलला? तर याच उत्तर त्याच्याकड नव्हतं. डोस्क आउट झालं. ट्विटर वर बघितलं, #boycottChhapaak #boykottdeepika ट्रेंडमध्ये दिसत होतं. सगळीकडे ते एकच कॅन्सल केलेलं तिकीट फिरत होतं.

आमच्याच ग्रुपमध्ये एक पोरग आहे, ते कधी असल्या भांडणात पडत नाही, कोणाची बाजू घेत नाही त्याच एक वाक्य आठवल,

“सब मोह माया है.”

आपण खरच एवढे दळभद्री झालोय का की एखाद्या दीपिकाने एखद्या प्रवीण तरडेनं त्याच वैयक्तिक मत मांडलेल पाहिलं तर त्याला ट्रोल करतो, त्याचे सिनेमे बंद पाडायची धमकी देऊ लागतो. जर दीपिकाचा सिनेमा बंद पाडणे हे खरच राष्ट्रीय कार्य असेल तर त्यासाठी खोट बोलायची काय गरज?

जर सीएए चांगल आहे तर त्याच्या सपोर्टला मिस कॉल देण्यासाठी फेक मेसेज पाठवायची काय गरज. आयटी सेलमध्ये बसून सब मिलके हमे पागल बना रहे है असच वाटलं

काहीच कळेना झालंय. तुम्हाला कळाल तर नक्की सांगा.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.