एक ई-मेल आला आणि त्याच्या ५ मिनिटानंतर दिल्लीत होत्याचं नव्हतं झालं.

आजचा १३ सप्टेंबरचा हा दिवस देशाच्या इतिहासात एका भयंकर घटनेची आठवण करून देत असतो. 
१३ सप्टेंबर २००८ च्या संध्याकाळी दिल्लीकरांनी नेहेमीप्रमाणे करोलबागच्या बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. करोलबाग हे महत्वाचं आणि गर्दीचं समजलं जाणारं ठिकाण. अचानक हे धावत्या गर्दीचं वातावरण रक्तपाता मध्ये बदलेलं. कुणाला कळायच्या आत या बाजारपेठेत एक मोठा बॉम्बब्लास्ट झाला आणि कित्येक लोकं जागीच गेले…कित्येकांना कायमचं अपंगत्व आलं तर कित्येक लेकरं अनाथ झाली.
बरोबर १३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दिल्लीत हि भयंकर बॉम्बस्फोट मालिका घडली होती.  
दहशतवाद्यांनी देशाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राजधानीत ३० मिनिटांच्या अंतराने करोलबागच्या गफ्फार मार्केट, कॅनॉट प्लेसजवळील बाराखंबा रोड, सेंट्रल पार्क आणि नंतर एम ब्लॉक मार्केटमध्ये गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट मालिका घडवली होती.  या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे २१ लोक ठार झाले आणि ९० हून अधिक लोक जखमी झाली होती.
या इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यामुळे केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला होता.
याच दरम्यान अनेक ठिकाणांहून वेळेवर जिवंत बॉम्ब सापडले होते, त्याला निष्क्रिय केले आणि होणारे बॉम्बस्फोट रोखले त्यामुळे आणखी लोकांचा जीव वाचला होता.

पण हे सगळं घडायच्या आधी पत्रकारांना एक मेल आला होता…

“अल्लाह के नाम पर इंडियन मुजाहिदिन एक बार और हमला कर रहा है… जो चाहो कर लो. रोक सकते हो तो रोक लो”. 

हि घटना घडायच्या ५ मिनिटं आधी दिल्लीच्या सर्व मोठ्या मीडिया हाऊसेसवर एक मेल आला. हा ई-मेल इंडियन मुजाहिदीनच्या नावाने करण्यात आला होता. मेल पाठवणाऱ्याचे नाव अरबी हिंदीमध्ये सांगण्यात आले होते,

तो मेल आयडी al_arbi_delhi@yahoo.com असा होता.

मिडिया हाऊसला आलेल्या या ई-मेलबाबत पोलिसांना माहिती देणार तोपर्यंत गफार मार्केटमध्ये संध्याकाळी ६.१० वाजता पहिला मोठा स्फोट झाला. पोलिसांना ई-मेलबाबत काही समजण्याआधीच दिल्लीचे हार्ट म्हणले जाणाऱ्या कॅनॉट प्लेस मध्ये दुसरा स्फोट झाला. यानंतर लगेच ६.३० वाजता बाराखंबा रोडवरील गोपालदास बिल्डिंगजवळ तिसरा स्फोट झाला.

त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला म्हणजे ६.३१ वाजता सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला. त्याचवेळी ग्रेटर कैलाश १ मधील एम ब्लॉक मार्केटमधील मॅकडोनाल्डजवळही स्फोट झाला. त्याच्या  ७  मिनिटांनंतर त्याच बाजारात असणाऱ्या प्रिन्स पान शॉपजवळ आणखी एक स्फोट झाला.

बॉम्ब अशा ठिकाणी ठेवले जेणेकरून त्याची तीव्रता वाढावी आणि जीवितहानी व्हावी.

गफ्फार मार्केटमध्ये पहिला स्फोट सीएनजी सिलेंडरद्वारे करण्यात आला होता, ते सिलेंडर एका ऑटोमध्ये ठेवले होते. स्फोट झाला आणि तो ऑटोने हवेत उडाला आणि विजेच्या तारावर आदळला, त्यामुळे हा स्फोटाची तीव्रता आणखी वाढली होती. प्रिन्स पान शॉपजवळचा आणि  मॅकडोनाल्डजवळ स्फोटांमध्ये बॉम्ब कचऱ्याच्या डब्यात ठेवण्यात आला होता. ग्रेटर कैलाशच्या एम मार्केटमध्ये झालेला स्फोट एका कारमध्ये बॉम्ब ठेवून करण्यात आला होता.

या  स्फोटांच्या मालिकेनंतर, जेव्हा मृत आणि जखमींच्या आकडा मोजला तेंव्हा कळलं कि, या बॉम्बस्फोटांमध्ये किमान ३० लोक मारले गेले आहेत आणि १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

स्फोटांचा तपास सुरू झाला आणि एका आठवड्यात बाटला हाऊस चकमक झाली

इंडियन मुजाहिद्दीनने ज्यांनी स्फोटांच्या मेळ केला होता त्यानेच या दिल्लीतील स्फोटांची जबाबदारी घेतली असं ई-मेल करून कळवलं होतं. 
पोलिसांनी तपासकार्य हाती घेतल्यानंतर एका आठवड्याच्या आत पोलिसांना समजले की इंडियन मुजाहिद्दीन हा दहशतवादी दिल्लीच्या जामियानगर भागातील बाटला हाऊसमध्ये लपला आहे.  यानंतर, इन्स्पेक्टर मोहन चंद शर्मा यांनी बाटला हाऊस गाठले. आणि पोलीस टीमने बाटला हाऊसला घेराव घातला. इन्स्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना या दहशतवाद्याच्या चकमकीत गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
६ फेब्रुवारी २०१० रोजी इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी शहजाद अहमदला पोलिसांनी अटक केली होती. २०१३ मध्ये न्यायालयाने शहजाद अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर २०११ पर्यंत १३ जणांना साखळी बॉम्बस्फोटांच्या संदर्भात अटक करण्यात आली होती.
हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.