भारताच्या संविधानाबाबत १० आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

भारताचे संविधान हे सगळ्या लोकशाही देशांमधील एक आदर्शवत संविधान आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री असो किंवा सामान्य माणूस प्रत्येकाला संविधान लागू आहे. याच आपल्या संविधानाबद्दल च्या १० आश्चर्यकारक गोष्टी आज तुम्हला सांगणार आहे.

  1. भारताचे संविधान हाताने लिहले गेले आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी italic फोंट मध्ये ते लिहले होते आणि शांतीनिकेतनचे कलाकार बेवहार राममनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांनी आतील पान सुशोभित केली होती. 
  2. भारतीय संविधान हे जगातील सगळ्यात मोठ लिहल गेलेलं संविधान आहे. यात २५ भाग, ४४८ आर्टिकल आणि १२ शेड्युल आहेत. याच्या इंग्रजी भाषांतरात एकूण ११७,३६९ शब्द आहेत. संविधान  लिहताना एकूण २५४ पेनच्या निबचा उपयोग करण्यात आला आहे आणि यासाठी ६ महिने लागले  होते. याचा एकूण खर्च ६.३ करोड रुपये झाला होता.
  3. संविधानाची इंग्रजी आणि हिंदी अनुवादित मूळ प्रत संसदेच्या लायब्ररीत ठेवण्यात आली आहे.
  4. संविधान सभेत एकूण ३८९ लोक होते. ज्यात २९२ ब्रिटीश प्रांताचे प्रतिनिधी, चार चीफ कमिशनर आणि 93 राजांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. अंतिम समिती मध्ये २९९ लोकं होती. हैद्राबादचा राजा एकमेव असा राजा होता ज्याचे प्रतिनिधी या सभेसाठी आलेच नाहीत.
  5. भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ लाच तयार झाले होते, पण आपण अधिकृतरीत्या ते २६ जानेवारी १९५० या दिवशी स्वीकारले.
  6. पहिली संविधान सभा ९ डिसेंबर १९४६ साली झाली. त्यानंतर संविधान तयार होण्यासाठी दोन वर्ष ११ महिने आणि १८ दिवस लागले होते.
  7. अंतिम संविधान तयार होण्याआधी, यावर अनेक  चर्चा आणि वाद देखील झाले, यातूनच २००० पेक्षा अधिक बदल करण्यात आले होते.
  8. भारतीय संविधानावर एकूण २८४ लोकांनी सही केली होती, ज्यात एकूण १५ स्त्रियांची देखील सही होती.
  9. आपल्या देशाचे संविधान जगातील सर्वश्रेष्ठ मानले जाते, कारण आज पर्यंत खूप कमी बदल आपल्याला संविधानात करावे लागलें आहेत.
  10. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत असणारा समाजवाद हा शब्द १९७६ मध्ये ४२वा बदल करताना टाकण्यात आला आहे.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.