जनरल करिअप्पा सत्तापालट करू शकतात या भीतीने नेहरूंनी त्यांना आस्ट्रेलियात राजदूत म्हणून पाठवले होते.

भारतीय सैन्याच्या इतिहासात आजवर फक्त दोनच असे सैनिक होऊन गेले ज्यांना भारताचा सर्वात मोठा ‘फिल्ड मार्शल’ हा किताब मिळाला आहे.

यापैकीच एक आहेत फिल्ड मार्शल के.एम करिअप्पा.

कोंडाडेरा मडप्पा करियअप्पा अर्थात के.एम करिअप्पा हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते. १५ जानेवारी १९४९ रोजी त्यांची सेना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १५ जानेवारी हा सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. करिअप्पा राजपूत रेजिमेंटमधून होते. ते १९५३ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली.

१९६५ च्या इंडो पाक युद्धात करिअप्पाचे पुत्र लेफ्टनंट कर्नल नंदा करिअप्पा यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती.

अय्युब खानने फिल्ड मार्शल करिअप्पाना फोन केला आणि म्हणाले,

जर तुम्हाला तुमचा मुलगा परत हवा असेत तर मी सांगतो त्या अटी मान्य करा, तुमच्याशी माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत.

त्यावर फिल्ड मार्शल करिअप्पा यांनी सणसणीत उत्तर देत म्हणाले, 

तो जरी माझा मुलगा असला तरी आता त्याने देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करून माझ्याशी असलेलं नातं भारत भूमीशी जोडलं आहे. त्यामुळे त्याला तीच वागणूक द्या, जी तुम्ही इतर भारतीय सैनिकांना देता आहात. जर सोडायचे असेल तर सर्वांना सोडा नाहीतर कोणालाच सोडू नका.

देश स्वतंत्र्य झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काही प्रमुख नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. भारतीय फिल्ड मार्शल कोणाला बनवले जावे? हा या बैठकीचा विषय होता. यावेळी नेहरुंनी असे मत व्यक्त केले की, अद्याप आपल्याला सेनेचे प्रमुखत्व करण्याचा अनुभव नाही त्यामुळे आपण एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याला फिल्ड मार्शल बनवावे. त्यावर सर्वानीच नेहरू यांचे समर्थन केले.

नेहरूंना नकार देण्याचे धाडस त्यावेळी कोणीच केले नाही.

पण, तेवढ्यात एक आवाज आला, मला काहीतरी बोलायचे आहे.

आपल्याकडे देश चालवण्याचा कोणाला अनुभव नाही. तर आपण एखाद्या इंग्रज नेत्याला पंतप्रधान बनवायला हवे का?

सर्व लोक शांत झाले आणि नेहरूंनी त्या अधिकाऱ्याला विचारले की, तुम्ही स्वतंत्र्य भारताचे पहिले फिल्ड मार्शल व्हायला तयार आहात का?.त्यावर त्या अधिकाऱ्याने नकार देत नेहरुंना सुचवले की, मी तर नाही पण आपल्यात एक असे अधिकारी आहेत ज्यांना लष्कर प्रमुख बनवायला हवे. ते म्हणजे के.एम करिअप्पा. आणि या नावाची शिफारस करणारे होते लेफ्टनंट जनरल नाथू सिंह राठोड.

करियप्पा यांची भारतीय भाषा अडखळती होती त्यामुळे लोक त्यांना ब्राऊनसाहेब असेही म्हणत. याचे २ किस्से आठवणीने सांगितले जातात. एकदा सैनिकांना उपदेश करताना ते म्हणाले होते की, या क्षणापासून तुम्ही मोफत आहात. आपण आपला देश मोफत आहोत. सर्वकाही मोफत आहे. त्याऐवजी त्यांना म्हणायचे होते की, Country is free and so are all of us.

आणखी एका कार्यक्रमात ते म्हणाले की, माता आणि भगिनींनो मला वाटत की तुम्ही २ मुले जन्माला घाला. एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. पण, करिअप्पा यांना म्हणायचे होते की, माता भगिनींनो तुम्ही २ मुले जन्माला घाला एक तुमचे घर सांभाळण्यासाठी आणि दुसरे देश सांभाळण्यासाठी.

सिकंदराबादमध्ये असताना करिअप्पा यांचे लग्न मुथू माचीया यांच्याशी झाले. त्यावेळी करिअप्पा यांचे वय ३७ होते तर त्यांची पत्नी निम्म्या वयाची होती.

लष्कर प्रमुख असताना असताना करियप्पा यांनी राजपूत रेजीमेंटल सेंटर कुटुंबांसहित भेट दिली. त्यावेळी अधिकाऱ्याच्या मेसमध्ये भेट देताना त्यांनी दोन्ही मुलांना दुसऱ्या गाडीने घरी पाठवले. कारण, अधिकारी मेसमध्ये अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता. हा नियम ते सहज मोडू शकले असते पण त्यांनी अस केल नाही.

लष्करासोबतच माझ्या आई वडिलांचे राजकीय क्षेत्रातही मोठे प्रस्थ होते. त्यामुळेच जनरल करिअप्पा यांचे नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्याशी घनिष्ट संबंध होते. जनरल करिअप्पा सत्तापालट करू शकतात, या भीतीने पंतप्रधान नेहरू यांनी त्यांना १९५३ मध्ये ऑस्ट्रेलियाचे राजदूत म्हणून तिकडे पाठवले असल्याचे करिअप्पा यांचा मुलगा एअर मार्शल के.सी.करिअप्पा यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हंटले आहे.

करिअप्पा यांनी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये राजदूत म्हणून काम केलं. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध सुधारण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.