शाहरुखच्या आजोबांनी लाल किल्ल्यावरचा ब्रिटिश झेंडा काढून तिथे तिरंगा फडकवला होता.

‘क्या बात हुई क्या गरज पड़ी, ये रंग-ए-जहां बदला कैसा

मगरूरों का मजलूमों में सर रखना कैसा

हिंदू कैसा, मुस्लिम कैसा, ब्राह्मण कैसा, बनिया कैसा

हम वोट शाहनवाज को देंगे, हम वोट शाहनवाज को देंगे’

पहिल्या लोकसभा निवडणुकीत जनरल शाहनवाज खान काँग्रेसच्या तिकिटावर मेरठमधून पहिले खासदार झाले होते त्या निवडणुकीमध्ये या घोषणा जनसामान्यांमध्ये दुमदुमत होत्या. १९५२ मध्ये जेंव्हा देशामध्ये लोकशाहीचं वारं वाहू लागलं होतं तेंव्हा मेरठच्या जनतेने जनरल शाहनवाज खान यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.  आणि याच जनतेच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे ते १९५२ ते १९७१ या काळात सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 

आजची पिढी मात्र जनरल शाहनवाज खान यांना ओळखत नसावी पण आपल्या २-३ पिढ्या हे नाव नेहेमीच आदराने घेतात.  

जनरल शाहनवाज खान यांची राजकीय ओळख सोडता एक महत्वाची ओळख आहे ज्यामुळे त्यांचे नाव मेरठच्या गल्ली-बोळात दुमदुमत असायचे. ते म्हणजे शाहनवाज खान हे आझाद हिंद फौजेचे पहिले मेजर जनरल. आजाद हिंद सेनेचे मेजर असलेले शहनवाज खान हे एक सच्चे देशभक्त, एक स्वतंत्र सैनिक आणि सुभाष चंद्र बोस यांच्या अतिशय जवळचे व्यक्ती होते. त्यांची तिसरी एक ओळख म्हणजे,

शाहनवाज खान हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी लाल किल्ल्यावरून इंग्रजांचा झेंडा उतरवून तिरंगा फडकवला होता.

भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी हजारो क्रांतीकारकांना, सैनिकांनी आपले बलिदान दिले. यापैकी एक नाव म्हणजे ‘जनरल शाहनवाज खान’.

कोण आहेत हे शाहनवाज खान?

शाहनवाज खान यांचा जन्म २४ जानेवारी १९१४ ला रावळपिंडी मधल्या मातौर गावात झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षण पाकीस्तान्मधून घेतलं होत. पुढील शिक्षण त्यांनी ‘प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडिअन मिलिटरी कॉलेज’ डेहराडून मधून पूर्ण केल. त्यांचे वडील झांझुआ राजपूत हे कॅप्टन सरदार टिका खान होते. १९४० मध्ये त्यांची ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सैनिक परिवारात जन्मलेले शाहनवाज यांनी कौटुंबिक परंपरेला जागत १९४० मधे ‘ब्रिटीश इंडिअन आर्मीत’ एक अधिकारी म्हणून भारतीय सैन्यात सामील झाले.

याचदरम्यान दुसरं जागतिक युद्ध सुरु होतं. 
आणि मग शाहनवाज खान यांची नियुक्ती सिंगापूर येथे करण्यात आली होती. जपानच्या सैन्याने ‘ब्रिटीश इंडिअन आर्मी’च्या सैनिकांना बंदी बनवून जेलमधे टाकलं होतं. यादरम्यान १९४३ साली नेताजी सुभाष चंद्र बोस सिंगापूर ला आले. नेताजीनीच आजाद हिंद सेनेच्या मदतीने बंदी सैनिकांना मुक्त करण्यात आल. 
नेताजींच्या ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा’ या घोषणेने प्रभावित होऊन शाहनवाज खान यांच्यासोबत अनेक सैनिक ‘आजद हिंद सेनेत सामील झाले. आजाद हिंद सेनेचे सच्चे सैनिक होते.

 खान पण देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून इंग्रजांच्या विरोधात गेले. त्यांच्या नेतृत्वगुणांनी  प्रभावित होऊन नेताजींनी त्यांना ‘आरजी हुकुमत-ए-आजाद हिंद’च्या कॅबिनेट मधे जागा दिली होती.

१९४५ ला नेताजींनी काही सैनिकांना घेऊन ‘सुभाष ब्रिगेड’ बनवली आणि शाहनवाज यांना याच तुकडीचा कमांडर म्हणून घोषित केले. 
 
या तुकडीने कोहिमामध्ये इंग्रजांविरुद्ध बंड केलेले पण बर्माच्या लढाईत इंग्रजांनी शाहनवाज आणि त्यांच्या सैनिकांना बंदी केलं. मग नोव्हेंबर १९४६ मधे जनरल खान ,कर्नल प्रेम सहगल आणि कर्नल गुरुबक्ष सिंग यांच्याविरुद्ध दिल्ली येथे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण लोकांच्या विरोधाला घाबरून ब्रिटीश आर्मीचे जनरल आक्निलेक याने या सर्वांकडून काही दंड वसूल करून सोडून दिलं होतं. 
आणि शाहनवाज खान आणि त्यांच्या साथीदारांचा जामीन करणारे व्यक्ती म्हणजे, जवाहरलाल नेहरू, सर तेज बहादूर सप्रू, आसिफ आली, बुलाभाई देसाई आणि कैलाशनाथ काटजू हे होय. 
आणि नंतर जनरल खान हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय झाले. आजाद हिंद सेनेच्या समाप्तीनंतर १९४६ मध्ये जनरल खान हे महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या विनंतीवरून ‘इंडिअन नॅशनल कॉंग्रेस’ मध्ये सामील झाले. 
 
पंडित नेहरूं यांनीच त्यांना ‘खान’ ही उपाधी दिली होती. सन १९४७ ला पंडित नेहरूंनी त्यांच्यावर ‘कॉंग्रेस सेवा दल’च्या सदस्यांना सैनिकी शिस्त आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली होती.  देशाच्या पहिल्या तिन्ही पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना शाहनवाज यांचा उल्लेख केला होता.
तसेच त्यांना कॉंग्रेस दलाकडून सेवापती या पदाने गौरवण्यात आलं होतं. 
 
१९४७ ते १९५१ या काळात ते सेवादालाशी जोडलेले होते. आपल्या शेवटच्या दिवसात १९७७ ते १९८३ पर्यंत ते सेवादलाचे प्रभारी राहिले होते. 
शाहनवाज खान यांचा आणि शाहरुख खान चा काय सबंध ?
१९४० च्या दरम्यान, शाहरुख खानची आई फातिमा आणि त्यांच्या कुटुंबाचा दिल्लीत अपघात झालेला,  आणि यातून सावरण्याची त्याच परिसरात असलेल्या शाह नवाज खान यांनी त्यांना रुग्णालयात नेले. या अपघातानंतर शाहरुखच्या कुटुंबियांना सावरण्यात त्यांनी हातभार लावला.  शाह नवाज फातिमाच्या कुटुंबाच्या संपर्कात राहिले होते. 
शाहनवाज खान यांनी शाहरुख च्या आई म्हणजेच फातिमा यांना दत्तकही घेतले होते. 
 
नंतर त्यांनी मीर ताज मोहम्मद खान यांच्यासोबत फातिमाचे लग्न यांच्या बंगल्यात लाऊन दिले, जे एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते. शाहनवाज खान यांनी नंतरच आयुष्य त्यांनी आपल्या दत्तक मुलीसोबत आणि जावयासोबत  काढले. 

आजही शाहरुख खान आपल्यावर झालेले देशभक्तीचे संस्कार आपल्या नानांमुळे झाले असे मानतो.

Leave A Reply

Your email address will not be published.