चार मोबाईल, एक कंपनी, एक मालक…. याला म्हणतात बिझनेस !

आपण सगळेच नवीन मोबाईल घ्यायचा म्हंटल तर कमी बजेटवाले ओपो, विवो, रिअलमी असे आणि जास्त बजेट असेल तर वन प्लस. असे साधारण फोन बघत असतो. आपल्या माहित असते हा चायना ब्रॅन्ड आहे तरीही आपण त्याचा विचार करतोच. हा घेवू की तो.

झालं कन्फुजनला सुरुवात होते ती इथूनच.

पण भिडूंनो, ओपो घ्या, विवो घ्या नाहीतर रिअलमी घ्या. सगळी एकाच मालकाची लेकरे आहेत. आणि पैसे पण सगळा एकाच ठिकाणी जाणार आहे.

म्हणजे सांगतो, बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन चीन हे स्मार्टफोन उद्योगातील एक बरच मोठे नाव आहे.

२०१६-१७ पर्यंत या कंपनींना कोणी विचारत ही नव्हते. म्हणजे २०१६ मध्ये विवो इंडियाला १२० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.

यानंतर बीबीके इलेक्ट्रॉनिक्सने चारी कंपन्यांचे सीईओ वेगळे ठेवले. ज्यामुळे एकमेकांच्यात स्पर्धात्मक वातावरण तयार केले. तसेच कंपनी एक असली तरी सर्व व्यवहार वेगळे ठेवले.

त्यामुळे नफा – तोटा यांचे गणित समजायला सोपे झाले. तसेच चारी मोबाईलची वितरण व्यवस्था पुर्ण वेगळी ठेवली. सुरुवातील ओपो, विवो ऑफलाईन तर वन प्लस आणि रिअलमी ऑनलाईन अशी व्यवस्था उभी केली.

भारतात कंपनी असे पाय पसरले :

सोबतच त्याच वर्षी विवोने १०० कोटी रुपयांना आयपीएल स्पॉन्सर केली. तर पुढच्याच वर्षी ओपोने भारतीय टीम स्पॉन्सर केली. याचा परिणाम म्हणजे इकोनॉमिक्स टाईम्सच्या आकडेवारीनुसार भारतीय बाजारत पुढच्या दोनच वर्षात म्हणजे मार्च २०१९ पर्यंत ओपो आणि विवो यांच्या विक्रीमध्ये जवळपास ६७ टक्क्यांची वाढ झाली. तर २०१७ मध्ये १४ हजार कोटी रुपयांच्यावरुन २०१९ मध्ये जवळपास ४० हजार कोटी रुपयांच्या घरात गेला होता.

बीबीके इलेक्ट्रॉनिक्सचा इतिहास :

डुआन यांगपिंग यांच्या मालकीची असलेल्या या कंपनीची सुरुवात १९९८ ला चीनमध्येच झाली होती. सुरुवातील टेलिव्हिजन संच बनवणाऱ्या या कंपनीने हळू हळू एमपी 3 प्लेयर, डिजिटल कॅमेरा अशी उत्पादने बनवायला सुरुवात केली.

कालांतराने २००८ ला ओपोच्या रुपात बीबीके इलेक्ट्रॉनिक्सने मोबाईल उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवले. तर पुढच्याच वर्षी २००९ मध्ये विवो हा ब्रॅन्ड कंपनीने लॉन्च केला. हेडफोन अ‍ॅम्प्लीफायर्स, स्मार्ट वॉच अशी अन्य उत्पादने ही चालू केली.

जगातील मोबाईल विक्री करणाऱ्या टॉप फाईव्ह कंपनीमध्ये :

बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आतापर्यंत ५७ दशलक्ष स्मार्टफोनची विक्री केली असून ही कंपनी संपुर्ण जगात सॅमसंग, हुआवे आणि अॅपलनंतरची सर्वात मोठी स्मार्टफोन विक्री करणारी कंपनी ठरली आहे.

मार्केट रिअलिस्टच्या आकडेवारीनुसार जवळपास ४० देशांमध्ये या कंपनीचा व्यापार पसरला असून ४० हजार पेक्षा जास्त कामगार या कंपनीसाठी काम करत आहेत.

ओपो – विवोची सद्यस्थिती :

एका बाजूला कोरोना आणि सोबतच देशात सध्या निर्माण झालेल्या अँटी चायना वातावरणाने चीनी कंपन्यांचे प्रोडक्ट्सची विक्री कमी झाल्याचा अहवाल रिसर्च फार्म आईडीसी ने दिला आहे.

अहवालानुसार भारतीय बाजारात चीनी स्मार्टफोन्सच्या विक्रीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा पण जास्त घसरण झाली आहे.

२०१९ मध्ये ५६ लाख मोबाईल यूनिट्स शिप करणाऱ्या विवोची विक्री २०२० मध्ये ३२ लाख मोबाईल यूनिट्स शिप वर आली. तर ओपोची ३६ लाखांहून १८ लाखांवर आली आहे.

ही विक्री आता कमी झाली असली तरी आपली डिजिटल गरज भागवण्यासाठी चीनने गेल्या मागील ४ वर्षांच्या काळात किती मोठा हातभार लावला आहे वरील आकडेवरी वरुन कळून येते.

भारताच्या पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचा नारा तर दिला, पण त्यांच्या स्वप्नातला डिजिटल भारत साकार होण्यासाठी जे हार्डवेअर लागते, ते अजूनही आपण चीनकडूनच आयात करतो हे देखील तितकेच खरे आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.