मागच्या बजेटमध्ये आणि या बजेटमध्ये सरकारने शेतकऱ्यांना नक्की काय दिल..?

केंद्राच या वर्षीच अर्थसंकल्प बजेट सादर झालयं. या वर्षीच्या शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा करण्यात आलेल्या आहेत.  मागच्या वर्षीच्या म्हणजेच २०२० च्या बजेटमध्येही शेतकऱ्यांना समोर ठेवून बजेट सादर केल होत.

मागच्या बजेटला शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ठाम आहेत.

२०२० च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय दिल होत. आणि यावर्षीच्या २०२१ च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय दिलयं बघुया.

बजेट २०२१ मध्ये केंद्राने शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा केल्या आहेत. बजेट मांडत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेती संबंधात अनेक मुद्दे मांडले आहे. यात केंद्र सरकार शेतीमालाची हमीभावाने खरेदी करणार असल्याच म्हटलं आहे. गहू पिकासाठी सरकारनं शेतकऱ्यांना २०२०-२१ मध्ये ७५,०६० कोटी रुपये दिले आहेत.

केंद्राने २०२१ च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना या गोष्टी दिलेल्या आहेत. 

  • १६.५ लाख कोटी रुपये शेतीसंबंधी कामांसाठी कर्ज शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा केली आहे.
  • मत्स्योत्पादक शेतकऱ्यांसाठी मत्स्य उपात्पदन हब उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
  • गहू पिकासाठी यावर्षी ७५,०६० कोटी रुपये दिले आहेत
  • तांदुळ पिकाच्या खरेदीसाठी या बजेटमध्ये सरकारने १,७२,७५२ कोटींची घोषणा केली आहे.
  • डाळींसाठी सरकारने १०,५३० कोटींची घोषणा.
  • कापूस पिकासाठी २५,९७४ कोटी रुपयांची घोषणा.
  • वन नेशन वन कार्ड ही येजना राबवण्यात आली आहे. या योजनेतून कामगार कोणत्याही राज्यातून रेशन कार्ड घेऊ शकतात.
  • स्वामित्व योजनेतून शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. तसेच ही योजना सगळ्या राज्यांसाठी राबवली जाणार असल्याची घोषणा केली आहे.
  • नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) अंतर्गत तयार केलेला सिंचन निधी 5 हजार कोटी रुपयांवरून दुप्पट करून 10 हजार कोटी रुपये करण्यात आला आहे.
  • कृषी उत्पादनांची किंमत आणि आयातीची यंत्रणा चांगली राहण्यासाठी ऑपरेशन ‘ग्रीन स्कीम’ ची व्याप्ती वाढवून आणखी त्यात २२ उत्पादने समाविष्ट करण्यात आली आहेत. आतापर्यंत हे टोमॅटो, बटाटे आणि कांदे या उत्पादनांनाच लागू होते.

२०२० च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना या गोष्टी देण्यात आल्या होत्या.

  • प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान या योजनेतून कृषी पंपांना सौर उर्जेशी जोडण्याची घोषणा केली होती. देशातील २० लाख शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप देण्याची घोषणा केली होती. व १५ लाख शेतकऱ्यांच्या ग्रीड पंपांना सौर उर्जेशी जोडण्याची घोषणाही केली होती.
  • देशातील १०० जिल्ह्यांना जलसंकटातून मुक्त करण्याची घोषणा केली होती.
  • शेती मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल ची घोषणा केली होती. या किसान रेल मध्ये रेफ्रिजरेटर असलेले कोचही असणार असल्याची घोषणा केली होती.
  • मासेमारी व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी ‘सागर मित्र योजना’ सुरू करण्याची घोषणा केली तसेच, या माध्यमातून मासेमारीचं उत्पदान 200 लाख टन करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले होत.
  • मागच्या आर्थिक वर्षात 83 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. शेती, सिंचन, ग्रामविकास आणि पंचायती राज यासाठी ही तरतूद केली होती.
  • शेतकऱ्यांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद केली होती. तसंच, शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत दीन दयाल योजनेअंतर्गत वाढवली जाईल अशी घोषणाही केली होती.
  • जलजीवन मिशनचीसाठी मागच्या अर्थसंकल्पातून 6 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती.
  • नाशवंत मालासाठी ‘कृषी उडाण’ योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावर सुरु करणार असल्याचं जाहीर केल
  • दूध उत्पादनवाढीसाठी सरकारकडून खास योजनाही आणली जाईल अशी घोषणा केली होती.
  • शेतकऱ्यांच्या संख्येनुसार ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अशा समूह योजनांवर भर देणार असल्याची घोषणा केली होती.
  • देशात वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी PPP मॉडेल अवलंबलं जाणार असल्याची घोषणा मागिल अर्थसंकल्पात केली होती.
  • महिला शेतकऱ्यांसाठी ‘धन्य लक्ष्मी’ योजनेची घोषणा केली होती .
  • सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून ऑनलाईन मार्केट वाढवून झिरो बजेट शेतीवरही भर दिला जाणार असल्याची घोषणा केली होती.
  • मनरेगा योजनेच्या अंतर्गत चारा जोडण्याची घोषणा.
  • मॉडर्न ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट राज्य सरकारांकडून लागू करण्याची घोषणा.
  • शेती खतांचा संतुलिक वापर व्हावा म्हणून शेतकऱ्यांना शेतीतील खतांच्या वापराची माहिती दिली जाणार असल्याची घोषणा मागिल वर्षी केली होती.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.