५ मिनटात उरकलेलं लग्न जास्तीत जास्त २० दिवस टिकेल असा अंदाज लोकांनी बांधलेला… 

काजोल आणि अजय देवगण, या दोघांची जोडी रोमॅण्टिक वाटते. पण त्या काळात लोकांना कॉजोल आणि शाहरूखची जोडी रोमॅण्टिक वाटायची. काजोल पुर्णपणे वेगळ्या झोनचे सिनेमे करायची आणि अजय देवगण पुर्णपणे वेगळ्या झोनचे. त्यामुळे झालेलं अस की दोघे लग्न करणार ही गोष्टच पचवणं लोकांना अवघड झालेलं. 

त्यांच्या लग्नाला जवळपास २० वर्ष झाली. मिडीयातून तरी किमान या जोडीबद्दल कधी कुरबुर ऐकायला मिळाली नाही. पण हे लग्न जास्तीत जास्त २० दिवस टिकेल अशा लोकांच्या पैजा लागलेल्या. 

काजोल आणि अजय देवगणची पहिली भेट ही गुंडाराज सिनेमाच्या शुट वेळी झाली होती.

पहिल्याच भेटीत काजोलसाठी अजय हा एक घमेंडखोर मुलगा वाटलेला. त्याला कारण देखील तसच होतं. अजय फक्त आपल्या कामापुरताच विषय ठेवत असे. जास्त कोणाशी बोलणं नाही. पण इथेच काजल अजयला व्यवस्थित समजू शकली. दोघे बोलू लागले. खरं तर दोघेही तेव्हा वेगवेगळ्या रिलेशनमध्ये होते. अजय देवगण आणि करिष्मा दोघांचं अफेअर सुरु होतं तर काजोल आपल्या बालपणीच्या मित्राच्या प्रेमात होती. पण काही ना काही कारणामुळे त्यांचं ब्रेक अप झालं होतं.

नेमक्या याच काळात अजय आणि काजोलची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. काजोलने तर अजय देवगनला फ्रेंडझोन मध्ये टाकलेलं. ती त्याला रिलेशन एडव्हाइस मागायची. पण वरून शांत शांत दिसणाऱ्या गड्याने  फ्रेंडझोन तोडला आणि आपलीच सेटिंग लावली. मैत्रीतून दोघांचं प्रेम झालं. 

त्या काळात या दोघांच्या संबंधांची कोणाला कल्पना देखील नव्हती. दोघांनी देखील सुपरहिट सिनेमे दिलेले. पण हे दोघं एकत्र येतील याची सुतराम शक्यता नव्हती. 

अखेर वेळ काढून काजोलने आपल्या घरी सांगितलं. तेव्हा या लग्नाला पहिला विरोध करणारे होते ते काजोलचे वडील. त्यांच म्हणणं होतं की तू आत्ता तुझ्या करियरच्या पीक पॉईन्टला आहेस. अशा वेळी तुझं लग्न करणं तुझं करियर बरबाद करण्यातला प्रकार ठरू शकतो. गडबडीत निर्णय घ्यायची काही आवश्यकता नाही. 

पण काजोलचं म्हणणं होतं की, मी सात-आठ वर्षांपासून काम करतेय. वर्षाला पाच सहा सिनेमे करतेय. माझ्यासाठी माझं इतकं करियर देखील पुरेसं आहे. मला वाटतं मला जितकं काम करायचं होतं तितकं मी केलेलं आहे आत्ता सेटल होण्याची वेळ आली आहे. 

अखेर दोघांनी आपआपल्या मित्र-मैत्रीणींना ही गोष्ट सांगितलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह होतं की हे किती टिकणार.. 

या गोष्टीची बातमी मिडीयाला लागली. काहीही गॉसिप म्हणून लोकांनी या बातमीकडे लक्ष देखील दिलं नाही. अजय एका मुलाखतीत सांगतो, आमच्यात रोमॅण्टिक अस काहीच झालं नाही. एकमेकांना प्रपोज करणं, लग्नाची मागणी घालणं असले काहीही प्रकार झाले नाही. आम्हाला एका क्षणी वाटलं लग्न करावं आणि आम्ही केलं.. 

१९९९ साली त्यांच लग्न झालं, या लग्नाबद्दल अजय देवगण एका मुलाखतीत सांगतो, मला वाटलं पण नव्हतं आमचं लग्न इतकं साध असेल. घराच्याच टेरेसवर आमचा लग्न सोहळा पार पडला. मीडियाला फसवण्यासाठी वेगळाच पत्ता दिला होता त्यामुळे घरचे सोडल्यास  कोणीही तिथं नव्हतं. भटजींनी बोलावल्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो, पाच एक मिनटात लग्न पार पडलं आणि खाली आलो. आमचं लग्न देखील झालेलं.. 

काजोलला मध्यतंरी एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. तुमचं लग्न कस टिकलं. तेव्हा काजोल म्हणालेली, 

आम्ही जेव्हा दोघांचा वेगवेगळा विचार करतो तेव्हा आम्ही दोघे खूप वेगळे असतो. त्याच्या आणि माझ्या स्वभावात खूप अंतर आहे. पण आम्ही एकत्रित असताना असा वेगळा विचार होतच नाही. आमच्या दोघांच्यामुळे एक वेगळ्याचं स्वभावाची जोडी तयार होते. आणि असच आम्ही मानतो. टिपीकल फिल्मी भाषेत सांगायचं झालं तर, दो जिस्म एक जान टाईप असत. याच कारणामुळे आमचं अगदी सुरळीत चाललं आहे.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.