इतरांचा विरोध होता तरी हेडगेवार यांनी गोळवलकरांनाच त्यांचा उत्तराधिकारी म्हणून का निवडले?

तो दिवस होता 20 जून 1940 चा. खोलीत एक डॉक्टर आणि प्राध्यापक उपस्थित होते. अनुभवाच्या आणि वयाच्या दृष्टीने दोघेही वयस्कर होते.  डॉक्टर वृद्ध होते तर  प्राध्यापक तुलनेने थोडेसे तरुण.  त्यातले डॉक्टर खूप आजारी होते, त्या आजारपणात त्यांनी थरथरत्या हातांनी त्या तरुणाच्या हाती एक पत्र ठेवले.  त्यात काय लिहिलं असावं?

“माझे आजारी शरीर डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यापूर्वी, मला तुम्हाला सांगायचे आहे की, इथूनपुढे संगठन चालवण्याची जबाबदारी संपूर्णपणे तुमच्यावर असेल.”

त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजेच 21 जून रोजी, त्या वृद्ध डॉक्टरांचे निधन झाले. तर दुसरे-तिसरे कुणी नसून हे डॉक्टर केशवराम बळीराम हेडगेवार होते! आणि ते प्राध्यापक म्हणजे माधवराव गोळवलकर होते.

हेडगेवार यांच्यानंतर माधवराव सदाशिवराव गोलवळकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या संघटनेचे प्रमुख झाले.  संघाच्या भाषेत बोलायचं झालं तर सरसंघचालक. संघाची लोकं गोळवलकरांना ‘गुरुजी’ देखील म्हणतात.

गोलवलकर यांना सरसंघचालक बनवण्यापूर्वी हेडगेवार यांना आरएसएसचा उत्तराधिकारी निवडण्याचे काम काही सोपे नव्हते. या घटनेच्या तीन दशकांपूर्वी सुरू झालेल्या घटनेबद्दल आज आपण बोलूया.

तेव्हा महाराष्ट्राचे केशवराम हेडगेवर बंगालमध्ये डॉक्टरीचे शिक्षण घेत होते.  तिथे ते अरबिंद घोष यांच्या क्रांतिकारक योजनेच्या अंतर्गत अनुशीलन समितीचे हेडगेवार सदस्य झाले.  त्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर ते नागपुरात परतले आणि काँग्रेसमध्ये सक्रिय झाले.  1920 च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनात त्यांना संघटना स्थापण करण्याचा पहिला अनुभव आला. 

या स्वयंसेवकांच्या संघटनेचे नाव होते ‘भारत स्वयंसेवक मंडळ’.

तीन वर्षांनंतर १९२३ मध्ये नागपुरात हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या, कारण ठरले मशिदीसमोर कीर्तन यात्रा काढल्याचे. या दंगलीनंतर हेडगेवार यांची विचारसरणी आणि मार्ग अधिक स्पष्ट झाला.  आतापर्यंत त्यांनी काँग्रेसला साथ दिली होती. आता मात्र ते खिलाफत चळवळीसह अनेक आंदोलने, मोर्चे तसेच कॉंग्रेसच्या गांधीवादी धोरणांमधील त्रुटीवर ते उघडउघड बोलायला लागले.

गांधींच्या काळातच कॉंग्रेसचाच एक कट्टर हिंदू गट रिंगणात उतरू लागला होता.

या दरम्यान डॉ. हेडगेवार यांच्यासह इतर पाच जणांनी मिळून नागपूर येथे 1925 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर संघटना स्थापन केली. त्याला नाव दिलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 

या संघटनेवर थोडक्यात कित्येक विचारांच्या संकल्पनांचा प्रभाव होता.  उदाहरणार्थ, बंगालच्या आखाडे आणि युथ क्लब मधील संघटना, एक राष्ट्राच्या संकल्पनेचे केंद्रबिंदू, सावरकरांच्या हिंदुत्व संकल्पनेचा इत्यादीचा आरएसएसच्या विचारधारेवर मोठा परिणाम झाला.

यांचबरोबर हेडगेवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात असलेल्या चळवळींशी सहमति-असहमति, मतभेदांचे संवाद चालूच ठेवले.  उदाहरणार्थ, त्यांनी दांडी यात्रेत भाग घेतला, गांधीजींच्या नेतृत्वात सविनय कायदेभंग आंदोलनातही सहभाग नोंदवला, परंतु संघाला व्यक्तिशः त्यापासून दूर ठेवले.

हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली संघ ही एक शिस्तबद्ध संघटना म्हणून जवळपास दीड दशकापर्यंत विस्तारत राहिली. कॉंग्रेसचे सहकारी अप्पाजी जोशी यांनी देखील संघाला सक्रियपणे पाठिंबा दर्शविला.

संघाच्या सुरुवातीच्या काळात, शालेय विद्यार्थी त्यांच्याशी जोडले जात होते, आणि मग तेच किशोरवयीन मुले जेंव्हा उच्च शिक्षणासाठी देशातील इतरशहरांत व विद्यापीठांत गेले, तेव्हा संघटनेचा विस्तार सुरू झाला. 

यांच्यातला एक किशोरवयीन स्वयंसेवक म्हणजे प्रभाकर दानी, जो बनारस हिंदू विद्यापीठात शिकण्यासाठी गेला होता.  तिथे त्याने संघाचा प्रचार, प्रसार केला. त्या शाखेत प्रभाकर यांनी एकदा आपल्या प्राणीशास्त्रविषयाचे प्राध्यापकांना आमंत्रित केले.  मूळ विषयाखेरीज हे प्राध्यापक तत्त्वज्ञान आणि इतिहासावरही चर्चा करायचे. ते ‘गुरुजी’ म्हणून प्रसिद्ध होते.  ते गुरुजी म्हणजेच माधवराव गोलवलकर!

डॉ. हेडगेवार यांनी बनारसच्या प्रवासादरम्यान गोलवलकर यांच्याशी संवाद झाला. आणि मग त्यांना नागपुरात बोलविण्यात आले आणि एका वर्षा नंतर गोळवलकर स्वत: कुटूंबाच्या दबावाखाली प्राध्यापक पेशा सोडून नागपुरात आले.  आणि मग ते संघात संपूर्णपणे सामील झाले. काळानुसार त्यांच्यावर संघाच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या, ह्या जबाबदाऱ्या  देऊन हेडगेवार संघाच्या भविष्यासाठीची तयारी करत राहिले.

पण हेडगेवार यांच्या प्रयत्नांना 1936 मध्ये धक्का बसला. या वर्षापर्यंत गोलवलकर यांनी कायद्याची पदवी मिळवली तर होतीच, पण त्यांना संघापेक्षा जास्त अध्यात्मात रस वाटत होता. 

अशा परिस्थितीत त्यांनी कुटुंब आणि संघटना सोडली आणि योग-ध्यान करण्यासाठी बंगालला निघून गेले ते तडक स्वामी विवेकानंद यांचे गुरुभाई स्वामी अखंडानंद यांच्या सानिध्यात.  त्याच्या पुढच्याच वर्षी स्वामींचा मृत्यू झाला, त्यानंतर गोलवलकर परतले.  तेव्हापासून त्यांचा दाढी वाढवून आलेले रूप नंतरही कायम राहिले. हेडगेवार यांनी पुन्हा एकदा आपल्या संभाव्य वारसांना जबाबदारी देऊन भविष्याची तयारी सुरू केली.

आणि वरील जो संवाद सुरुवातीस आपण वाचला…आणि नंतर या पत्राच्या 14 दिवसानंतर ही एक घटना म्हणजे…

डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर 13 दिवसानंतर म्हणजेच 3 जुलै 1940 रोजी संघाच्या पाच आयोजकांची नागपुरात बैठक झाली.  यात संघ प्रमुखांनी पत्राद्वारे व्यक्त केलेली इच्छा जाहीरपणे वाचण्यात आली.  गोलवलकर यांच्या निवडीमुळे बरेच लोक चकित झाले.  आरएसएस वर अतिशय अस्सल पुस्तक लिहिणारे वॉल्टर अँडरसन आणि श्रीधर दामले यांनी त्यांच्या ‘द ब्रदरहुड इन सैफ़रन’  या पुस्तकात लिहिले होते की,

“हेडगेवार अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडतील अशी अपेक्षा आरएसएस नेत्यांना होती.”

बहुतेक लोकांना वाटले की ही डॉक्टरांनी नेमलेला वारसदार आप्पाजी जोशी असेल.  पण डॉक्टरांनी असा विचार केला नाही.  याचे काय कारण असेल असा शोध घेतल्यावर एका पुस्तकांमध्ये त्याचे उत्तर सापडले.

डॉ. दामले यांनी संघावर लिहिलेल्या दुसऱ्या एका पुस्तकात,  बाळासाहेब देवरस यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे.  गोलवलकर यांच्यानंतर ज्यांना संघ प्रमुख बनविण्यात आले ते म्हणजेच बाळासाहेब देवरस होय. तर त्या संभाषणात म्हणाले देवरस म्हणाले की,

“त्यावेळी आपल्यातील बर्‍याच जणांना असे वाटते की, संघात गोळवलकर गुरुजी नवीन आहेत.  अशा परिस्थितीत ते सरसंघचालक म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडतील, याबद्दल अनेकांना शंका होती.  संघाबद्दल सहानुभूती असणाऱ्यांना देखील अशी भीती होती की डॉक्टरांच्या मागे संघ कसा चालेल? ”

गोळवलकरांच्या नेतृत्वावर प्रश्न उभ्या  करणाऱ्या नेत्यांचा विरोध  2-3 मुद्द्यांना धरून होता. प्रथम ते समृद्ध मराठी कुटुंबातून होते, दुसरे म्हणजे, त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात राजकारण की संघ? हे शोधणे कठीण होते. तिसरे असे की, गोलवलकर हे तपस्वी आणि शिष्ट स्वभावाचे म्हणून ओळखले जायचे.

त्यांच्या ह्याच बाबी पाहून डॉ. हेडगेवार यांना असे वाटले की, आपण संघटनाच्या कामांसाठी योग्य निकष असणाऱ्या व्यक्तीची निवड करतोय. 

आरएसएसशी संबंधित विषयांवर लिखाण करणारे विनय शारदा यांनी याचे कारण सांगितले.  त्यांच्या मते

“डॉ. हेडगेवार यांना अशी एखादी व्यक्ती हवी होती जो संघाचा कार्यवाहक म्हणून दीर्घकाळ मार्गदर्शन करेल.  गोलवलकर या पॅरामीटरवर खरे उतरत होते, कारण तो तरुण होते आणि प्राध्यापकाच्या अनुभवामुळे त्यांचा संवादही तरुणांना आकर्षित करणारा असायचा. त्यात त्यांच्यावर काँग्रेसचे हँगओव्हर देखील झाले नाही.

आता ह्याचा बाबी आप्पाजी जोशींच्या नेमक्या विरोधात होत्या.  तथापि, आप्पाजी न निवडण्याचे एक कारण म्हणजे त्यांचे वय. सरसंघचालकांची जबाबदारीही फार काळ त्यांना पार पाडता आली नसती.”

हेडगेवार यांनी ज्या पद्धतीने गोलवलकर यांची संघप्रमुख म्हणून निवड केली, तीच पद्धत पुढे गोळवळकरांनी चालू ठेवली. म्हणजेच एका पत्राद्वारे उत्तराधिकारी नेमण्याची पद्धत.  1973 मध्ये गोलवलकर यांच्या निधनानंतरही स्वयंसेवकांनी तीन पत्रे उघडली गेली.  त्यापैकी एकामध्ये पुढचे सरसंघचालक म्हणून बाळासाहेब देवरस यांचे नाव होते.

ज्येष्ठ पत्रकार रामबहादुर राय यांनी मात्र या संपूर्ण चर्चेला एक रंजक दृष्टिकोन जोडला. त्यांच्या मते

“बर्‍याच लोकांसाठी हेडगेवारांनी गुरुजींची निवड केल्याचे आजही तसेच कोडे आहे, जसं की, महात्मा गांधींनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नेहरुंची निवड केली. गांधींना हे चांगले ठाऊक होते की,  नेहरू आपले कार्य पुढे चालवणारा व्यक्ती हा नेहरू नाहीच, तरीही त्यांनी त्यांची निवड केली.

त्याचप्रमाणे माझ्या मते, गोलवलकर हे त्यांचे वय आणि वैचारिक स्पष्टता या दोन निकषामुळे निवडले गेले.  त्यांच्या 33 वर्षांच्या कार्यकाळात संघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला.” 

गोलवलकर यांच्या कार्यकाळातच दरम्यान संघाचा प्रसार झाला आणि नंतर गांधी हत्येच्या आरोपाखाली यावर बंदी घातली होती. 

पुढे काही काळा नंतर पून्हा संघटना सक्रिय झाली.  पटेल यांच्या आदेशानुसार संघाची लेखी राज्यघटना तयार करण्यात आली.  गोलवलकरांच्या काळात भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विश्व हिंदू परिषद यांची स्थापना झाली.  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पक्षाचे एकत्रीकरण झाले.  भारतीय जनसंघापासून ते भविष्यातील धोरण आणि रूप यासंदर्भात त्याचे नाव निर्धार इथपर्यंत.

गोलवलकर गेले आणि देवरस आले.  जनसंघ व जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि  देवरस यांच्या काळात बाबरी मशीद आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर अखेर संघाच्या नेतृत्वात सत्ता मिळवली.

आणि राहिला मुद्दा संघाचा, तर विरोधकांच्या दृष्टीने ही ‘अतिरेकी राष्ट्रवादाला चालना देणारी फॅसिस्टवादी संघटना’ आणि समर्थकांच्या दृष्टीने ‘राष्ट्रबांधणीत गुंतलेली एक स्वयंसेवी संस्था’ होती.  पत्राद्वारे संघटनेच्या प्रमुखांची निवड गोळवलकर यांच्यानंतरच थांबविण्यात आली. 

त्यांच्यानंतर संघाचे सर्व नेत्यांनी आणि प्रमुखांनी जिवंत असतांनाच पुढील उत्तराधिकारी निवडले गेले आणि संघप्रमुख पद देखील बहाल करण्यात आले.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.