गांधीजींचे खासगी डॉक्टर पुढे जाऊन कसे बनले गुजरातचे पहिले मुख्यमंत्री

2 ऑक्टोबर 1956 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची गांधी जयंतीनिमित्त अहमदाबाद येथे सभा घेण्यात आली होती. गांधीजींच्या स्मरणार्थ ठेवली गेलेली ही सभा अपेक्षेप्रमाणे राजकीय आखाड्यात बदलली. नेहरू चाचा विरुद्ध इंदू चाचा यांच्यातील हा एक मनोरंजक सामना होता. जवाहरलाल नेहरू यांच्या सभा प्रमाणेच आणखी एक विधानसभा अहमदाबादमध्ये आयोजित केली गेली होती. या मेळाव्याचे मुख्य वक्ते होते, ‘महागुजरात चळवळीचे’ नेते इंदूलाल याग्निक.

इंदू लाल यांना गुजरात मधील लोकांनी ‘इंदू चाचा’ असं नाव ठेवलं होतं.

असं म्हणतात की, त्या दिवशी अहमदाबादमध्ये नेहरूंचा करिष्मा कमी आणि इंदू चाचा यांची हवा जास्त होती. नेहरू यांना पाहण्यासाठी जमाव तेथून निसटून इंदू लाल याज्ञिक यांच्या सभेला गेला. यावरून ‘महागुजरात या चळवळीचे किती वजन होते हे दिसून येते.

एकीकडे वेगळा महाराष्ट्र आणि दुसरी कडे वेगळा गुजरात याची आंदोलन त्यामुळे नेहरूंनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. सुमारे चार वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर मुंबई राज्याचे तुकडे करण्यात आली आणि संयुक्त महाराष्ट्र आणि गुजरात ही नवे राज्य निर्माण झाली.

नुकताच जन्म झालेल्या गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला तो जीवराज मेहता यांना!

हे तेच जीवराज मेहता होते जे कधीकाळी महात्मा गांधीजींचे डॉक्टर असायचे. जेव्हा जेव्हा गांधीजींना वैद्यकीय सल्लामसलतीची आवश्यकता वाटायची तेंव्हा केवळ डॉक्टर जीवराज मेहता यांचेच नाव समोर यायचे. पण असा काय घटनाक्रम, परिस्थिती घडत गेली असेल ज्यामुळे एका डॉक्टरांना राज्याच्या सर्वोच्च राजकीय पदावर पोहचवले गेले होते.

अशा प्रकारे बनले मुख्यमंत्री…

राज्याच्या स्थापनेच्या घोषणेबरोबरच नव्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतही वाद विवाद चालू झाले होते.

राज्यातील कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते मोरारजी भाई देसाई त्यावेळी केंद्र सरकारमध्ये पोहोचले होते. ते नेहरू सरकारच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम करत होते. परंतू केंद्रात पोहचूनही राज्याच्या राजकारणात मोरारजी यांची रुची कमी झाली नव्हती. ते बलवंतराय मेहता यांना पाठिंबा देत मेहता यांचे नाव आपल्या मार्गाने पुढे करत होते.

भावनगर मध्ये जन्मलेले बलवंतराय मेहता बरदौली सत्याग्रहाच्या दरम्यान गांधीजींच्या सानिध्यात आले.

तसेच स्वातंत्र्यापूर्वी ते कॉंग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आणि लाहोर अधिवेशनाच्या वेळी ते कॉंग्रेसचे महासचिव होते. स्वातंत्र्य लढ्यात भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांनी 3 वर्षे तुरुंगात घालविली होती.

1957 मध्ये बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने देशात पंचायतराजची पायाभरणी केली होती. गांधीजींच्या ‘ग्राम स्वराज’ प्रमाणे स्वतंत्र भारताचा हा पहिलाच उपक्रम होता. मेहतांच्या राजकीय कारकीर्दीच्या प्रवासात सर्वं प्रकारचे कर्तृत्व नोंदवले गेले होते ज्यामुळे मुख्यमंत्री पदाचे सर्वात सक्षम उमेदवार म्हणून ते योग्यच होते.

मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या सुरुवातीच्या चर्चेत नेहरूंनी मोरारजी भाईंना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचा प्रस्ताव दिला. परंतू मोरारजींना त्यांची अर्थमंत्र्यांची खुर्ची सोडायची नव्हती.

प्रथम मोरारजीनी बलवंतराय मेहता यांचे नाव सुचविले. मेहता त्यावेळी लोकसभेचे सदस्य होते. नेहरू बलवंतराय यांच्या नावावर सहमत नाहीत हे बघून मोरारजींनी खंडू भाई देसाई यांचे नाव सुचवले.

खंडू भाई देसाई हे अहमदाबादच्या कापड गिरणी कामगारांचे नेते होते.

1954 मध्ये राजकीय मतभेदांमुळे व्ही.व्ही. गिरी यांनी कामगार मंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा खंडू भाई यांनी या पदावर नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला होता.

बलवंतराय मेहता आणि खंडू भाई देसाई हे महागुजरात चळवळीतील नेत्यांच्या निशाण्यावर होते.

या चळवळीदरम्यान जनतेत दोन्ही नेत्यांची लोकप्रियता हळूहळू कमी होत होती. त्या दरम्यान इंदूलाल याज्ञिक यांच्याविरोधात 1957 च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेले खंडू भाई पराभूत झाले होते. नवीन राज्याच्या पहिल्या निवडणुकीची धुरा एका पराभूत झालेल्या सैनिकाला सोपविली जाऊ शकत नव्हती, अशा परिस्थितीत नेहरूंनी डॉ. जीवराज मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

जीवराज मेहता हे पेशाने डॉक्टर होते आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांची प्रतिमा स्वच्छ होती.

ते गांधीजींचे निकटवर्तीय होते. त्यांची प्रतिमा म्हणजे ‘इंस्टीट्यूशन बिल्डर’ सारखी होती. मुख्यमंत्री पद हे डॉ.जीवराज मेहता यांच्यासाठी ‘काट्यांचा मुकुट’ होता. कारण मोरारजींच्या इच्छेविरूद्ध त्यांना मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती म्हणून, हट्टी वृत्ती असलेले मोरारजी मेहता यांना लक्ष्य करत त्यांचा सर्वात मोठा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून समोर आले.

जीवराज मेहता यांनी मंत्रिमंडळ निर्मितीच्या प्रक्रियेत मोरारजी आणि त्यांच्या विश्वासू माणसांना बाजूला केल्यामुळे मोरारजींची नाराजी आणखीच वाढली.

1962 मध्ये गुजरातमधील पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन गट आमने-सामने झाले होते. सरकारची कमान जीवराज मेहता यांच्या हाती होती तर, संघटन मात्र मोरारजी यांचे सहकारी ठाकूरभाई देसाई यांच्या ताब्यात होते. अशा परिस्थितीत तिकिटांच्या वितरणाबाबतही दोन्ही गटात प्रचंड नाराजी होती.

त्यामागील कारण म्हणजे भावनगरमधील 1960 चे कॉंग्रेस अधिवेशन.

या अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष नीलम संजीवा रेड्डी यांनी एक नियम सुचविला कि,

“दहा वर्ष सरकार चालविण्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटन, प्रचार-प्रसार यासाठी सहकार्य करावे. यामुळे कॉंग्रेसमधील कोणत्याही एकाच नेत्याच्या वर्चस्व स्थापीत होण्यापासून रोख लागेल.”

त्यांनी सुचवलेला हे फक्त एक सूचना होती, परंतु बंधनकारक नियम नव्हता. पण ठाकूरभाईंनी तो नियम मेहता यांच्याविरोधातील शस्त्र म्हणूनच घेतले होते.

जीवराज मेहता 1948 मध्ये बडोद्याच्या रियासतचे मुख्यमंत्री झालेले होते, यामुळे ते या नियमांच्या कक्षेत येत होते. जीवराज ह्यांना शेवटी टाकण्यात आलेल्या यां नियमांच्या सापळा समजला. आणि मग ते या नियमांच्या विरोधात उभे राहीले.

नेहरूंच्या प्रभावामुळे शेवटी कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचा निर्णय जीवराज मेहता यांच्या बाजूने लागला.

1962 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. 154 जागांच्या विधानसभेत कॉंग्रेसने 113 जागा जिंकल्या. स्वतंत्र पक्षाने 26 जागा जिंकल्या. प्रजा सोशलिस्ट पक्षाला 7 जागा मिळाल्या, तर 8 निर्मल आमदार विधानसभेत पोहोचले. स्वतंत्र पार्टीसाठी ही चांगली सुरुवात होती. त्यास 24% मते मिळाली होती.

उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण बिघडत चालले होते. चंद्रभानू गुप्ता त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. गुप्ता मोरारजी यांच्या जवळचे होते.

जुलै 1963 मध्ये प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या निवडणुकीत गुप्ता यांच्या विरोधी गटाचे ए.पी. जैन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. यानंतर गुप्ता यांच्या हातातून गोष्टी वेगाने सुटत चालल्या होत्या.

15 जुलै रोजी गुप्ता मंत्रीमंडळातील 8 मंत्र्यांनी एकत्र राजीनामा दिला. गुप्ता आम्हाला वाईट वागणूक देतात, असा आरोप या बंडखोर मंत्र्यांनी केला होता. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्धच्या अपप्रचारात गुंतले होते.

‘कामराज प्लॅन’ आल्यानंतर नेहरूंनी चंद्रभानू गुप्ता यांचा ठिकाणा लावण्याचा निर्णय घेतला.

कामराज प्लॅनअंतर्गत त्यांचा राजीनामा मागितला गेला. या राजीनाम्या विरुद्ध मोरारजी देसाई उभे होते. त्यांनी नेहरूंना इशारा दिला की, जर सध्याच्या राजकीय परिस्थितीत गुप्ता यांचे बलिदान दिले तर ते अधिक विवाद निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरेल मात्र त्यांच्याशी नेहरू सहमत नव्हते.

मोरारजीने स्कोअर बॅलन्स करण्यासाठी थोडाही वेळ लावला नाही, तोच कामराज प्लॅनची ​​पुढची कामगिरी जीवराज मेहता यांच्यावर पडली.

मोरारजींनी नेहरूंवर दबाव आणला कि, कामराज योजनेमुळे मेहता यांचा देखील राजीनामा घ्यावा.

शेवटी हेच घडले. चंद्रभानू गुप्ता यांनी राजीनामा दिल्यानंतर महिनाभरातच जीवराज मेहता यांनाही मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. सप्टेंबर 1963 मध्ये, जीवराज मेहता गेल्यानंतर बलवंतराय मेहता गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री झाले.

केंद्रातील राजकीय उलथापालथमुळे जीवराज मेहता यांना त्यांचे पद गमावावे लागले.

ते मोजून 1238 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. मग त्याचा कार्यकाळ कसा होता? तर कांडला बंदरात त्यांनी ‘फ्री ट्रेड झोन’ तयार केले. आयआयएम अहमदाबादमध्ये उघडता यावे म्हणून ते विक्रम साराभाईसमवेत दिल्लीला पोहोचले होते. अहमदाबादने 1961 मध्ये त्यांच्या कारकीर्दीतच आयआयएम ची सुरुवात झाली.

त्रिभुवन दास मेहता यांना गुजरातला बोलवून त्यांना, State Co-operative Marketing चे हेड बनवण्यात आले. ह्या प्रयोगाला नंतर ‘अमूल’ म्हणून ओळखला जाऊ लागले.

काही महिन्यांनंतर गुजरातमध्ये ‘गुजरात स्टेट फर्टिलायझर कंपनी ‘ ची सुरूवात झाली.

ही कंपनी विशिष्ट आर्थिक अजेंड्यावर काम करीत होती. स्वभावाने साधे, मृदू असणारे जीवराज मेहता मोठ्या-मोठ्या संस्था तयार करण्यासाठी प्रसिद्ध होत होते.

मुख्यमंत्री होण्यापूर्वीही त्यांनी अशी अनेक कामे केली होती. मुंबईचे ‘सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज सुद्धा त्यांच्याचमुळे शक्य झाले होते. व्यवसायाने डॉक्टर म्हणून असले तरी त्यांनी आधुनिक बडोदा शहराचे नगररचना देखील केली होती. डॉक्टर म्हणून असलेली त्यांची कारकीर्द आणि ‘इंस्टीट्यूशन बिल्डर’ म्हणून असलेली त्यांची ख्याती ही सर्वांनांच परेशान करायची.

जीवराज मेहता यांनीच भारतातील मुलांसाठी घरगुती उपचारांवर आधारित ‘बाबुलिन ग्रिप वॉटर’ बनविला होता.

ते गांधीजींचे पर्सनल डॉक्टर होते.. बापूंच्या अ‍ॅपेंडिसाइटिसचे ऑपरेशनही त्यांच्याच खात्यात नोंदवले गेले आहे.

जीवराज मेहता यांचा जन्म 29 ऑगस्ट 1887 रोजी झाला आहे. तो गुजरातमधील अम्रेलीचे रहिवासी होते. वडील व्यापारी होते. अम्रेली येथे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. ते कॉलेजचे टॉपर होते. पुढील अभ्यासासाठी ते लंडनला गेले.

1915 मध्ये तेथून परत आले आणि त्यांनी मुंबई येथे डॉक्टर व्यवसाय सुरु केला.

डॉक्टर असताना त्यांनी मुंबईत नानावटीसह अनेक रुग्णालये स्थापन केली. ते सलग तीन वेळा ‘ऑल इंडिया मेडिकल कांग्रेस’चे अध्यक्ष होते.

हे सर्व असूनही, जर त्यांची ओळख वेगळ्या प्रकारे द्यायची झाली तर, ते हंसा मेहता यांचे पती होते. यापेक्षाही चांगली ओळख अजून काय असू शकते? हंसा मेहता बडोद्याचे दिवाण मनुभाई मेहता यांची मुलगी होती. जीवराज बडोद्यात मुक्काम करताना दोघांचे प्रेम झाले. त्या काळात घरातील मंडळींच्या इच्छेविरूद्ध जाऊन त्यांनी आंतरजातीय लग्न केले. हंसा आपली ओळख यशस्वी पतीपासून वेगळी ठेवली. संविधान समितीमधील समाविष्ट असलेल्या 15 महिलांपैकी त्या एक होत्या.

याव्यतिरिक्त, ती 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जारी केलेल्या ‘युनिवर्सल ह्यूमन राईट चार्टर’ च्या मसुदा समितीच्या त्या सदस्य होत्या. महिलांच्या हक्कांसाठी लढणार्‍या लढाऊ नेत्या म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.