कोरोनाकाळातली दाहकता कळाली ती फक्त दानिश च्या फोटोंमुळेच…!

कोरोनाकाळात भारतातील जितकी काही भयावह फोटोज आपण पाहिलेत ते कुणी काढले असतील याचा प्रश्न पडतोच… कित्येक फोटो जर्नलिस्टने, नागरिकांनी हे फोटोज काढले, ज्या फोटोमधून आपल्याला कोरोनाचे वास्तव समजलं.

त्यातलंच एक नाव म्हणजे दानिश सिद्धीकी !

त्याने काढलेले फोटो पाहिली कि, अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्याचा एक फोटो त्यामागील सगळी पार्श्वभुमी सांगून जातो. पत्रकारितेच्या क्षेत्रातला जगातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे पुलित्झर पुरस्कार. हाच मानाचा पुलित्झर पुरस्काराच्या यादीमध्ये दानिश सिद्दिकी यांचीही नोंद आहे.

तो म्हणायचा मी कधीही हा पुरस्कार मिळवण्यासाठी काम केले नाही, माझ्या फोटोमधून मी त्या जागेवरची अफाट शांतता टिपायचा प्रयत्न करतो.

दानिश रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी ते काम करत असायचा, अफगाणिस्तानातल्या कंदहार मध्ये तो फिल्ड वर असतांना त्याची हत्या करण्यात आल्याची बातमी अफगाणिस्तानचे भारतातले राजदूत फरीद मामुन्दजई यांनी ट्विट करून दिली आहे.

त्याचा फोटो पाहिला तरी अंगावर काटा येतो. त्याच्या याच वादग्रस्त फोटोमुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. कारण या फोटोमुळे भारतातील कोरोनाचे वास्तव साऱ्या जगाला कळले होते.

. कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये भारताच्या राजधानीत मृत्यूच्या प्रलयाचे हे वास्तव या फोटोतून दिसतेय. २२ एप्रिल, २०२१ रोजी नवी दिल्लीमधील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळींचे सामूहिक अंत्यसंस्कार केले गेले..फोटो जर्नलिस्ट सिद्दीकी तेंव्हा ऑगस्ट महिन्यात नवी दिल्ली येथे मुक्कामाला होता. तेंव्हाच त्याने हे फोटो ड्रोनद्वारे काढले होते.

दिल्ली
ट्वीटर

हा फोटो खूप काही सांगून जातो.

दिल्ली ५
ट्वीटर

. २२ एप्रिल, २०२१ रोजी, नवी दिल्ली, कोविड रूग्णांसाठी भारतातील सर्वात मोठी सुविधा असलेल्या लोक नायक जय प्रकाश नारायण हॉस्पिटलच्या बाहेर कोरोनव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या मृतदेहाला बिलगत  नातेवाईकांनी शोक व्यक्त केलेला फोटो पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

दिल्ली ३
ट्वीटर

३. कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं हेच हा फोटो सांगून जातो.  

दिल्ली ६
ट्वीटर
दिल्ली ७
ट्वीटर

४. अनेकांना बेड मिळत नव्हते, एका बेड वर २-२ रुग्ण ऍडमिट होते.

up १
ट्वीटर

५. उत्तर प्रदेशातील एका गावात गंगा नदीच्या काठावर कोरोना बळींचे अंत्यसंस्कार.

up २
ट्वीटर

६. उत्तराखंड मध्ये नातेवाईक पार्थिवावर गंगा नदीच्या काठी अंत्यसंस्कार करतांना.

७. लॉकडाउन मधील मजुरांचे झालेले स्थलांतर .

दानिश ४
ट्वीटर

दानिश यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत टिपलेल्या अंत्यसंस्कारांच्या फोटोंची खूप चर्चा झाली होती. परंतु त्यांनी अजूनही अनेक घटनांचे फोटो कैद केले आहेत.

त्याला देशद्रोही ठरवलं होतं. कारण त्याने २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीत काढलेला फोटोसुद्धा चर्चेचा विषय ठरला होता.

दिल्ली २
ट्वीटर

दानिश सिद्दीकी हे पुलित्झर पुरस्कार विजेते छायाचित्र पत्रकार आणि भारतातील रॉयटर्स पिक्चर्स टीम या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचे प्रमुख आहेत. फोटो जर्नलिस्ट म्हणून श्री. सिद्दीकी यांनी आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील अनेक महत्वाच्या कथांचा समावेश केला आहे आणि त्यांच्या काही कामांमध्ये अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्धे, रोहिंग्या निर्वासित संकट, नेपाळ भूकंप आणि तेथील आश्रय घेणाऱ्यांच्या राहणीमान यांचा समावेश आहे.

फोटो जर्नलिझममध्ये जाण्यापूर्वी सिद्दीकी हे भारतातील आघाडीच्या न्यूज नेटवर्क्समधील दूरचित्रवाणी बातमीदार होते. त्याचे काम नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन, न्यूयॉर्क टाइम्स, द गार्डियन, द वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल, टाइम मॅगझिन, फोर्ब्स, एनपीआर, बीबीसी, सीएनएन, अल जझीरा अशा विविध आघाडीच्या आंतरराष्ट्रीय मासिके, वर्तमानपत्रे, स्लाइडशो आणि गॅलरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाशित केले गेले आहे. , साउथ चायना मॉर्निंग पोस्ट, बँकॉक पोस्ट, सिडनी मॉर्निंग हेराल्ड, ले फिगारो, ले मॉन्डे, डेर स्पीगल, स्टर्न, द इंडिपेंडेंट, गल्फ न्यूज आणि इतर अनेक प्रकाशने.

सिद्दीकी हे यू.एस.ए., इंग्लंड, चीन आणि भारतातील विविध छायाचित्रण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.