पंजाब कॉंग्रेसमध्ये मतभेद होण्याचे कारण इतर कुणी नसून राहुल गांधींची नवी स्ट्रॅटेजी आहे. 

गांधी घराण्याचं वर्चस्व कायम ठेवण्याचं वंशजांनी ठरविले आहे आणि ते तितक्याच ठामपणे पुढे नेतही आहेत.

गांधी फॅमिलीने आता नवजोतसिंग सिद्धू यांना समोर करून पंजाबचे मुख्यमंत्री जे राजीव गांधी यांचे शालेय मित्र राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का ? गांधी परिवाराला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन सिंग यांच्यावर पैज लावण्यापेक्षा क्रिकेटपटू ते राजकीय नेते असा प्रवास असलेले सिद्धू  यांच्यावर कॉंग्रेस चे नशीब आजमावत आहेत का ? सद्याची राजकीय हवा पाहता हे प्रश्न पडणे सहाजिकच आहे.

 परंतु याचं खरं कारण काही वेगळंच आहे.

हे सगळा बदल होण्यामागे नवज्योत सिंग सिद्धू यांचा सबंध नसून यात सबंध आहे तो गांधी फॅमिलीचा. 

हो हे सर्व प्रकरण गांधी घराण्याशी संबंधित आहे तसचं पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी चालू असलेल्या विधायक तोडफोड करण्याच्या फॉर्म्युलाशी संबंधित आहे. हे मान्य आहे कि, गांधी कुटुंबाबाहेरील लोकांना हे सूत्र तर्कहीन आणि विचित्र वाटू शकतं परंतु हे खरंय..

काय करू पाहतायेत प्रियांका गांधी आणि राहुल गांधी ?
पंजाब राज्यातील विरोधी पक्ष विखुरलेले आणि भरकटलेले दिसत आहेत, आणि याचाच फायदा घेत गांधी कुटुंबाने मुद्दाम काहीतरी वेगळे करण्याची जोखीम पत्करली आहे, जोखीम च्या ऐवजी आपण एक जुगारही म्हणू शकतो.

गांधी परिवार असा समज बाळगून चालत आहे कि कॅप्टन सिंग या बदलाचा नम्रपणे स्वीकार करतील. 

असंही कॅप्टन सिंग वयाच्या ७९ व्या वर्षी  कितपत निवडणूक लढवतील? या वयात नवीन एक डाव सुरू करणे सोपं नाही. ते येत्या महिन्यांत सिद्धू यांच्यासोबत सामील झालेल्या नेत्यांवर कॅप्टन सिंग विश्वास ठेवू शकतील का?  आता याचं उत्तर सिंग यांच्यासारख्या अनुभवी नेताच देऊ शकतो हे तितकंच खरंय.

बरं मूळ मुद्दा म्हणजे पंजाबमध्ये सुरु असलेला राजकीय कलहाला सिद्धू किंवा सिंग यांच्याशी घेणं देणं नाही त्याचं कनेक्शन थेट गांधी घराण्याशी आहे. 

थोडक्यात प्रियांका गांधी आणि राहुल यांनी असंच ठरवलं असेल कि, त्यांची आई सोनिया गांधी यांनी ज्या प्रकारची राजनीतीची पद्धत वापरली तीच पद्धत आपणही वापरून पाहावी.

हि पद्धत म्हणजे पक्षातील असंतुष्टांशी वाटाघाटी करण्याचे आणि त्यांना राजी करून सामंजस्याचे धोरण अंमलात आणणं इत्यादी. हि सगळी पद्धत चालायची ती गेल्या नोव्हेंबर मध्ये थांबली कारण सोनिया यांचे सल्लागार अहमद पटेल यांच्या निधनानंतर हा टप्पा जवळपास संपला होता.

अहमद पटेल जोपर्यंत होते तोपर्यंत सोनिया या पटेल यांच्या सल्ल्यावर विसंबून राहायच्या.

तोपर्यंत सोनिया यांनी राहुल गांधींना पक्षातील जुन्या नेत्यांनी ‘सिस्टम’ विरोधात राग व्यक्त करण्यास रोखलं होतं. पटेल जुन्या नेत्यांना त्यांच्या हताश आणि अधीरतेवर लगाम घालण्यासाठी मनापासून प्रयत्न करायचे आणि त्यांचं पक्षातील नेते ऐकायचे सुद्धा.

जेंव्हा ‘जी -23’ या गटाने जेंव्हा सोनिया यांना पक्षाच्या नेतृत्वाबद्दल निराशा व्यक्त करत पत्र लिहिले होते तेंव्हा राहुल गांधी यांनी सोनिया यांना शक्ती प्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला होता.

निवडणुका आल्या कि भलेही नेत्यांना कॉंग्रेस सारखा पक्ष डोक्यावरचं ओझं वाटत असेल तरी या गांधी कुटुंबाची मुळे खोलवर रुजलेली आहेत. सहाजिकच या बहिण भावाला मोठ्या कसोटीतून जावं लागणार आहे. म्हणूनच राहुल गांधी प्रियांका गांधी आता शक्ती प्रदर्शनाला सज्ज झाले आहेत.

पंजाबमधील अमरिंदर सिंग, किंवा राजस्थानमधील अशोक गहलोत किंवा हरियाणामधील भूपिंदरसिंग हुड्डा, केरळमधील उमान चंडी, काही कर्नाटकातील सिद्धारमैया, जम्मू-काश्मीरमधील गुलाम नबी आझाद, मध्य प्रदेशमधील दिग्विजय सिंह किंवा दिल्लीत कपिल सिब्बल निर्णय घेऊ शकत नाहीत कि पक्षासाठी काय योग्य आणि काय वाईट आहे.

गांधी कुटुंबच कॉंग्रेस आहे आणि याचे नशीब गांधी परीवाराशीच जोडलं जावं असा एकंदरीत सूर आहे.

आणि हाच सूर बहिण भाऊ इतर राज्यात देखील काढायचा प्रयत्नात आहेत. सोनिया यापुढे या दोघांच्या मार्गात येणार नाही. आता त्यांना आपल्या कुटुंबातील कॉंग्रेस कुटुंबातील मुलांच्या स्वाधीन करावे लागेल आणि त्यांना पक्षाचा कर्ता-धर्ता बनवावं लागेल.

कॉंग्रेसचे जुने आणि अनुभवी नेते याच विचारसरणीवर अजूनही अवलंबून आहेत की त्यांची कित्येक दशके असलेली कॉंग्रेसबद्दल असलेली विचारसरणी किंवा राजकारणाची निष्ठा हाच त्यांचा आधार आहे. पण आता गांधी भावंडांना आता या निष्ठेचे फारसे महत्त्व नाही राहिले आहे.

याचे उदाहरण म्हणजे राहुल यांनी अलीकडेच रेवंत रेड्डी यांना तेलंगाना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले गेले आहे, जे एके काळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते.

रेवंत रेड्डी यांच्याकडे ते पद सोपविण्यात त्यांना अजिबात संकोच वाटला नाही.

रेड्डी २०१७ मध्ये कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. पंजाब कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी १३ वर्षे भाजपामध्ये राहिल्यानंतर सिद्धू यांनी २०१७ मध्ये भाजप  सोडले आणि आप मध्ये गेले मात्र आपचे संयोजक अरविंद केजरीवाल इतर कोणासही पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री बनू देत नव्हते, म्हणून सिद्धू कॉंग्रेसमध्ये दाखल झाले.

महाराष्ट्रातलं पहायचं झालं तर, नाना पटोले यांनी २०१८ मध्ये भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अगदी तीनच वर्षांनंतर त्यांना महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष केले गेले. म्हणूनच, आता  कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी त्यांची विचारसरणी आणि पक्षाशी निष्ठा हि ढाल म्हणून वापर करणे आता थांबवावे थोडक्यात हाच संदेश यातून जातो.

पण राहुल यांच्या याच शैलीवर अनेक प्रश्नही उभे केले जात आहेत.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.