पॉर्नमध्ये कमावलेला पैसा राज कुंद्राने क्रिकेटच्या सट्ट्यात गुंतवला होता ?

पॉर्न, पॉर्न, पॉर्न सगळीकडं नुसतं पॉर्नचं वादळ उठलंय. आधी सगळं कस निवांत चालू होत. सगळेच कसे आपल्या फोन मध्ये निवांत पॉर्न बघत होते. पण आता पॉर्न साईट उघडायलाच लोक भ्यायला लागलेत वाटत. त्यांना वाटतंय पोलीस आपल्या फोनवर धाड टाकतील. असं होऊ शकत का? हे आपण शेवटी बघूच या.

पण आधी ज्या राज कुंद्राचा बाजार उठलाय त्याचं पुढं काय झालंय ते बघूया.

या भावड्याला हे असले पॉर्न कांड केलेत म्हणून अटक झालीय हे सगळ्यांनाच माहित आहे. पुढं २० जुलैला कुंद्राच्या मुंबई स्थित घरावर आणि ऑफिसवर मुंबई क्राईम ब्रांचने धाड टाकली. या धाडीत पोलिसांना काय काय मिळालं ते २३ तारखेला पोलिसांनी उघड केलं.

आजतक आणि इंडिया टुडेने याबाबतची बातमी पब्लिश केली होती. त्यांच्या बातमीनुसार,
या धाडीत पोलिसांना राज कुंद्राच्या घरातून एकूण २४ हार्ड डिस्क मिळाल्या. ४ हार्ड डिस्क वाले ८ सर्व्हर सापडलेत. पोलिसांच्या मते या सर्व्हर्सचा वापर कंटेंट वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी वापरला जात असावा. इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार या सगळ्या हार्ड डिस्कची तपासणी चालू आहे.

याव्यतिरिक्त कुंद्राच्या घरातून पोलिसांना ५१ अश्लील व्हिडिओ सापडेलत. पोलिसांनी राज कुंद्राचा मोबाईल जप्त केलाय.

त्यात असे चॅट्स आहेत, ज्यामुळं कुंद्राचा आत्ता उठलाय त्यापेक्षा जास्तीचा बाजार उठू शकतो. आता या चॅट मध्ये केनरिन प्रायव्हेट लिमिटेड प्रदीप बक्षीचे चॅट्स आहेत. ज्यात कुंद्राने स्वतः केनरिन प्रायव्हेट लिमिटेडचा हेड असल्याप्रमाणं बोलतोय. ऑर्डर्स देतोय. पोलिसांना या चॅटमुळे जवळजवळ ११९ पॉर्न फिल्म्सच्या संदर्भातली लिस्ट मिळाली आहे. आणि या फिल्म्स कोणत्या तरी कंपनीला ९ करोड रुपयांना विकल्या जाणार होत्या.

या सगळ्यात राज कुंद्राशी निगडित आणखी एका कंपनीचं नाव समोर आलंय. या कंपनीचं नाव मर्करी इंटरनॅशनल !

ही कंपनी क्रिकेट मॅचवर सट्टा लावायचं काम करते. असं म्हणतात या कंपनीच्या खात्यावरून मोठी रक्कम राज कुंद्राच्या खात्यावर ट्रांसफर झाली होती. आता पोलीस याची चौकशी करत आहेत कि कुंद्राने पोर्नोग्राफी मधून कमावलेला पैसा क्रिकेटच्या सट्टेबाजीवर उडवलाय कि ही कंपनीचं त्याची आहे.

रिपोर्टनुसार राज कुंद्राच्या या यस बँक अकाउंट आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका यांच्यात काही पैशांची देवाणघेवाण झालीय. पोलिसांची एक टीम या दोन्ही अकाउंट्स आणि त्यांच्या ट्रान्जॅक्शनची चौकशी करणार आहे.

आणखी एक माहिती अशी कि राज कुंद्राला अटक झाल्या झाल्या त्याच्या ऑफिस मधला डिजिटल डाटा मोठ्या प्रमाणात डिलीट करण्यात आला आहे. राज कुंद्राचे वियान नावाचे ऑफिस मुंबईच्या अंधेरी वेस्ट मध्ये आहे. पोलीस सर्वात आधी त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन तिथला तो डाटा कोणी डिलीट केला याची माहिती घेत आहेत. सीसीटीव्हीचे उत्खनन सुरु आहे.

फॉरेन्सिक एक्सपर्ट लोकांना डाटा रिकव्हर करायचं काम देखील देण्यात आलं आहे.

शुक्रवारी मुंबई न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.