रक्तरंजित हिंसाचाराची कल्पना होती तरी वैभव निंबाळकरांनी आसाम केडर निवडलं होतं…

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. दोन्ही राज्याच्या वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतला. आणि मग तिथं हिंसाचाराला सुरुवात झाली.

आसामचे बऱ्याच राज्यांसोबत सीमावाद आहेत. यात सातत्यानं रक्तरंजित संघर्ष उसळतो. पण सोमवारच्या उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी आणि सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवानं यात महाराष्ट्राचे आणि सध्या कछरच्या पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असलेले वैभव निंबाळकर या हिंसाचारात जखमी झाले आहेत. या अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे.

हे वैभव निंबाळकर हे मुळचे बारामतीचे असून २००९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सुरुवातीला त्यांना आसाम केडर मिळाल्यानंतर तेव्हापासून ते तिथेच कार्यरत आहेत. त्यांनी काचार जिल्ह्यात यापूर्वीही काम केलंय.

पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबातला पंचविशीतले वैभव निंबाळकर  केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) प्रवेश केला. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच त्यांनी आसामचं केडर निवडलं.

अतिशय अस्थिर आणि अशांततामय वातावरण अशी आसामची अख्या भारतात ओळख आहे. नक्षलवादी आणि अंतर्गत अशांतता यामुळं तिथलं राजकीय आणि सामाजिक वातावरण नेहमीच तणावग्रस्त असतं. पण आसाम केडर मिळाल्यानंतरही वैभवच्या घरामधून अशी कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया आली नव्हती.

या आसामच्या नियुक्तीवर वैभव म्हंटले होते,

‘‘माझ्या आईवडलांनी, बहिणीने मला केडर बदलून घे, असा कोणताही सल्ला दिला नाही.
उलट त्यांच्याकडून पाठिंबाच मिळाला.

देशपातळीवर २०४ वा नंबर मिळवून आयपीएस झाले. पण जर ते या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला नसते तर गणित विषयाचा शिक्षक किंवा प्राध्यापक झाले असते असं त्यांनी सांगितलं होत.

त्यांना आयपीएसचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पहिलेच पोस्टिंग आसाममधील ‘बोकाखाट’ जिल्ह्यात मिळाले. याच जिल्ह्यात भारतातील प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याचा बराचसा भाग येतो. परंतु आसाम म्हणजे भारताचा दुर्लक्षित, सर्वार्थाने उपेक्षित असा उत्तर-पूर्व भाग. शेजारच्या राष्ट्रांमधून घुसखोरी. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना साक्षी असलेला अशांत टापू.

यावर वैभव म्हणाले होते,

बरोबर हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर होते. अर्थात हे सर्व खोटे होते, अशातला भाग नाही. मीदेखील आसाम यापूर्वी पाहिला नव्हता. लोक कसे असतील? प्रत्यक्ष शासकीय कामाचा अनुभव नव्हता. मी स्वत: उपरा माणूस. स्वीकारतील का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते. मी १३ सप्टेंबर २०११ रोजी ‘एसडीओ’ म्हणून चार्ज घेतला.

या जिल्ह्याच्या हद्दीत काझीरंगा अभयारण्याचा मोठा प्रदेश येतो. त्यामुळे अर्थातच तिथं वन्यजीव तस्करांचा मोठा धोका असतो. आसाम प्रदेश गेंड्याच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असून या प्राण्याची हत्या मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या केली जाते. वैभवच्या पोलिस दलाने ‘अँटिपोचिंग’ मोहीम सुरू केली.

वनसंपत्तीच्या तस्करींमध्ये मुख्यत: नागालँडमधील लोक गुंतलेले असतात. ‘उल्फा’ ही संघटना आजही काही प्रमाणात कार्यरत असली तरीही सामान्य आसामी हे राज्याच्या प्रगतीला हातभार लावणार्‍या प्रत्येक व्यक्तीस आपला मानतात. यावर वैभव म्हंटले होते,

पोलिस दलाबद्दल प्रचंड आदर असल्यामुळे आसामी लोकप्रतिनिधी पोलिस दलाच्या विकासासाठी शासन पातळीवर खास प्रयत्न करताना दिसून येतात. आसामी लोक शांतताप्रिय असून आपली संस्कृती, भाषा याबद्दल त्यांना खूप ममत्व आहे. यामुळेच आसामी लोकांबरोबर पहिल्या दिवसापासून माझे सूर जुळले.

आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. आणि आसामला आपलंच घर मानणारे वैभव निंबाळकर स्वतःच या संघर्षाला बळी पडले.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.