महापुरावेळी तब्बल ४३ वेळा पाण्याखाली जाऊन ही हे गाव पुन्हा उभं राहिलंय.

सध्या सगळीकडं पाऊस सुरूय. पाऊस म्हंटल की लोक घराबाहेर पडताना नाक मुरडतात. चिकचिक कोणालाच नको असते. आपल्याला थोड्याशा पावसानं घराबाहेर पडायला कसं कसचं होत, तर मग महापुरानं घरादाराची वाताहत झालेल्या लोकांना किती त्रास होत असेल.

बरं हा महापूर नेहमीचाच आहे असं नाही. हल्ली हल्ली म्हणजे मागच्या एक १० वर्षात महाराष्ट्राला हा फटका बसतोय. महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकण किनारपट्टीला बसणारा हा पुराचा फटका तसा नवा नाही.

पण भारताच्या बिहार राज्याच्या नकाशावर एक नरकटिया नावाचं गाव आहे ते तब्बल ४३ वेळा महापुरामुळं पाण्याखाली गेलंय. 

ही गोष्ट आहे नरकटियातील लोकांचं अस्तित्व आणि सर्व काही गमावल्यानंतर पुन्हा उभं राहण्याच्या धडपडीविषयीची. बागमतीच्या पुरामुळं आपलं सावरलेलं घरदार पुन्हा पुन्हा नष्ट होणं हे त्यांचे नशिब आहे. पण मग पुन्हा प्रयत्न करून गाव वसविण हे त्यांचे कर्म आहे.

हे गाव गेल्या ८७ वर्षात ४३ वेळा पाण्याखाली गेलंय. एवढं होऊनही इथल्या ग्रामस्थांनी हार मानली नाही. या वेळीही परिस्थिती सारखीच आहे. बेघर झालेले गावकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. उध्वस्त झालेल्या गावात पुन्हा एकदा लोकवस्ती तयार करण्याची वाट बघतायत.

बिहारच्या शिवहर जिल्ह्यातील पिपराही ब्लॉकच्या बेलवा पंचायतीत असलेल्या नरकटिया गावात साधारणतः ३०० च्या आसपास घरं आहेत. लोकसंख्या सुमारे दीड हजार आहे. या गावाजवळून बॅगमती  नदी वाहत तर होती पण पूर येण्याचं कारण तस काही न्व्हहत. पण १९३४ मध्ये झालेल्या भूकंपामुळे दोन किलोमीटर लांबून वाहणारा बागमतीचा प्रवाह वळला आणि त्या गावाजवळ पोहोचला. त्यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा बागमतीने कहर केला. त्यानंतर, वर्षा दोन वर्षानंतर, विध्वंस या गावकऱ्यांचं नशिबात बनलयं.

गावातला जुनीजाणती लोक सांगतात, आतापर्यंत ५० वेळा पूर आला आहे. त्यातले ८५ वर्षीय ब्रह्मदेव साहनी सांगतात की,

त्यांनी आत्तापर्यंत २० वेळा स्वतःच घर बांधले आहे.

गावातले सत्यनारायण साहनी सांगतात की बागमतीच्या सततच्या पुरामुळं कोणीही गावात पक्की घर बांधत नाही. केवळ १० पक्की घरे बांधली गेली आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी बहुतेक घरांच्या स्त्रिया आपल्या मुलांना घेऊन नातेवाईकांच्या घरी जातात.

पावसाळ्यात आजारी रूग्णालयात नेणे खूप अवघड असते. गेल्या वर्षी बागमतीच्या धरणात ४७ घरे वाहून गेली होती. सर्व कच्ची घरे कोसळली होती. यावेळी १ जुलैला पूरात ५० घरे वाहून गेली. अनेक घरे कोसळली आहेत. लोक प्लास्टिक टांगून आणि मचान बनवून पावसात तग धरून आहेत. पाऊस पडल्यानंतर सप्टेंबरमध्ये गावकरी पुन्हा घरे बांधण्यास सुरुवात करतील.

गावकरी सांगतात की,

बागमती प्रवाह कधी बदलेल आणि कोणाचे घर वाहून जाईल हे सांगणे कठीण आहे. यानंतरही आम्ही हार मानत नाही. त्यांना नदीविषयी कोणती ही तक्रार नाही. त्यांचा रोष सरकारी यंत्रणेवर आहे. मागच्या दहा वर्षात या गावात कोणताही अधिकारी आला नाही. पुरादरम्यान अधिकारी धरणातील साठा बघून निघून जातात.

सरपंच कमलेश पासवान सांगतात की,

पुर झाल्यानंतर गावकरी इतरत्र घरे बांधतात. यामुळे गावाचा नकाशा सतत बदलत राहतो. यामुळे या इथल्या प्रत्येक घरात नळाचे पाणी, रस्ता आणि शौचालय यासारख्या सुविधांचा लाभ मिळू शकलेला नाही. फक्त वीज सुविधा उपलब्ध आहे.

नरकटियाला पुरापासून वाचविण्यासाठी बेलवाघाट येथे धरणाचे बांधकाम केले जात आहे. या माध्यमातून बागमतीचे पाणी थांबवून जुन्या ओढ्यात सोडण्यात येणार आहे. हे बांधकाम सन २०२० मध्येच पूर्ण केले जाणार होते, मात्र पुरामुळे या कामावर परिणाम झाला आहे. ते लवकरच पूर्ण होईल.

आणि अशाप्रकारे पूर येणाऱ्या गावाची गोष्ट संपलीय.

हे हे वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.