देशात पहिल्यांदा कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून स्टार्ट अप उभं केलं आणि लाखो रुपये देखील कमवले..

आजकाल शहरं वेगाने विकसित होतायेत. रेल्वे, मेट्रो, आयटी इंडस्ट्री अश्या अनेक क्षेत्रांत हाय स्पिडनं काम करत भारत विकसित देशांच्या शर्यतीत नंबर मिळवण्यासाठी धडपड करतोय. प्रत्येक प्रश्नाच झटपट सोल्युशन मिळावं, यासाठीची धावपळ. पण या सगळ्यात कचऱ्याच्या प्रश्न म्हंटल कि, मूग गिळून गप्प बसावं लागत.

कारण कचऱ्याची विल्हेवाट हा आपल्या समोरचा असा प्रश्न आहे, ज्याच्यावर तोडगा तर काही निघत पण तो आणखी किचकट बनत चाललायं.

शहरातल्या काचऱ्या पेट्या दुथडी भरून वाहतायेत, कचरा डेपोसाठी तर आता डोंगर कमी पडायला लागलेत. यामुळे नागरिकांच्या आयोग्यावर परिणाम तर होतोच सोबतच आणखी आजारांना फुकटचं आमंत्रणही मिळत. 

ही  कचऱ्याची डोकेदुखी दूर करण्यासाठी प्रशासन, खाजगी संस्था यांची कसरत तर सुरूच आहे. सोबतच कचरा एटीएम, कचऱ्यातून पैसे, गारबेज कॅफे सारखे नवनवीन प्रयोग राबवले जातायेत. मात्र, या प्रयोगांचं ‘चले तो चांद तर्क, नही तो शाम तर्क असं होऊन बसलयं’. 

तसही या स्टार्टअप किंवा प्रयोगांच्या मनानं कचरा हा कितीतरी पटींनी जास्त आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रयोगांचं तर कौतुक व्हायलाच हवं. कारण ‘फुल ना फुलाची पाकळी’ असं म्हणत त्यांचं काम सुरूच आहे. यातच आठवण येते ती बिरजू मुंदडा यांची. ज्यांनी कचऱ्याचा सदुपयोग करुन मोठमोठी ढिगारं सपाट केली.

बिरजू मुंदडा यांचं जवळपास २० वर्षांपूर्वीचं कचऱ्यापासून खत निर्मितीचं स्टार्टअप शहराच्या कचरा प्रश्नावर रामबाण उपाय ठरलं. विनी एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मुंदडा यांच्या कंपनीच्या ठाण्यातल्या कचरा डेपोत बायो बॅक्टेरियाचा वापर करुन कचऱ्यापासून खत निर्मितीच्या प्रोजेक्टचं कौतुक विदेशातही झालं, जगभरातल्या अनेक तंत्रज्ञांनी भेट त्यांच्या या कामाला भेट दिली. याची चर्चा राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झाली. 

मुलुंडमध्ये राहणाऱ्या बिरजू मुंदडा यांनी याआधी अनेक व्यवसाय केले, पण त्यात म्हणावं तेवढं यश काय मिळेना. याच दरम्यान त्यांची भेट झाली शास्रज्ञ डॉ.एस.आर. माळे यांच्याशी. बिरजू मुंदडा यांनी आपलं व्यवसायातलं दुखणं माळेंपुढं मांडलं’

माळे त्यावेळी घनकचरा व्यवस्थापनावर अभ्यास करत होते. बायो बॅक्टेरीयाची फवारणी करुन कचऱ्याचा ढिग कमी केला जाऊ शकतो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या खताचा वापर पर्यावरणासाठी होऊ शकतो, हा आपल्या डोक्यातला प्रयोग माळेंना प्रत्यक्षात उतरवायचा होता. यासाठी लागणाऱ्या चाचण्या देखील त्यांनी केल्या होत्या.

मग काय, बिरजू मुंदडा यांनी डॉ.माळें यांच्या या प्रयोगावर काम करायचं ठरवलं. त्यांनी स्वत: ठाणे महानगरपालिकेकडे या प्रयोगासाठी जमीन मागितली. तत्कालिन मनपा आयुक्त टी चंद्रशेखऱ यांनी या प्रोजेक्टसाठी हिरवा कंदील दाखवला आणि मुंदडा यांना जमीन दिली जमिनीवर कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभा राहिला

सगळ्यात आधी दुर्गंधीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कचऱ्याचा नैसर्गिक पद्धतीच्या फवारणीचा वापर करून निर्जंतुक करून करण्यात आलं. 

बिरजू मुंदडा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं कि, ‘हा असा प्रयोग होता जो देशात याआधी कधीही झाला नव्हता. त्यांनी कर्ज घेऊन ही यंत्रणा राबवली. हातात एक रुपयाही नव्हता, तेव्हा त्यांनी हे काम सुरु केलं. या प्रयोगच आधी विरोधही झाला.

दरम्यान, कंपनीनं १९९९ मध्ये ठाण्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरु केला. दुर्गंधी बंद झाल्यावर त्यावर बायो बॅक्टेरियाची फवारणी करण्यात आली. अगदी नैसर्गिक पध्दतीनंच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायो बॅक्टेरीयाचा वापर करण्यात आला होता. हळू हळू कचऱ्याचा हा डोंगर कमी कमी होत गेला आणि दोन महिन्यात हा डोंगर नष्ट झाला.

डंपींग ग्राऊंड म्हंटल कि लोक नाकाला रुमाल लावतील आणि तोंड वाकडं करतील, अश्या डंपींग ग्राऊंडवर मुंदडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कचऱ्याला आपलं विश्व मानलं.

अखेर माळे आणि मुंदडा यांची मेहनत फळाला आली आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. दोन महिन्यात इथल्या कचऱ्यापासून कंपनीनं हजारो टन खत बनवलं. खत बनवण्यापूर्वी कचऱ्यापासून तयार झालेल्या मिश्रणातून दगड, विटा आणि इतक टाकाऊ गोष्टी ज्यांचा खतासाठी वापर होणार नव्हता. त्या वेगळ्या करून खतांच्या पोती शेतकऱ्यांना विकल्या गेल्या.

या प्रयोगातून जे सेंद्रिय खत तयार झालं, ते अगदी नैसर्गिक आणि पिकांसाठी उपयुक्त होत. सोबतच आर्थिक दृष्ट्याही ते फायद्याचं होत.

मुंदडा आणि माळे यांच्या या स्टार्टअपचे देशभरात तर कौतुक तर झालेच पण विदेशातून बरेच जण या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येऊ लागले. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणू नका जपान, चीन आणि युरोपात देशील या प्रोजेक्टची चर्चा होऊ लागली.

पुढे चांगलं काम होतंय हा पाहून ठाणे महानगरपालिका आणि बिरजू मुंदडा यांच्या विनी एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करार झाला. त्यानुसार ठाणे महानगरपालिका दररोज ३०० टन कचरा विनी एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला द्यायची.  त्यावर प्रक्रियाकरुन खत निर्मिती करण्यात येत असे आणि त्यानंतर खत विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातला एक टक्के ठाणे महानगरपालिकेला रॉयल्टी म्हणून मिळायची. त्यामुळे फायदा सगळ्यांचाच व्हायचा. हा टाकाऊ कचरा साधासुधा नव्हता तर लाखो रुपयांची उलाढाल करायचा.

पण, असं म्हणतात ना एकाचा फायदा दुसऱ्याला देखवत नाही. असचं काही झालं बिरजू यांच्या कचऱ्याच्या स्टार्टअपमधून करोडो रुपये मिळतायत हे लक्षात आल्यानंतर राजकारणी आणि भ्रष्टचाऱ्यांनी त्याच्यावर बोट दाखवायला सुरुवात केली.  

पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला कचरा मिळणार नाही, यासाठी प्लॅन बनवला, ज्यामुळे काम अवघड होऊन बसलं. अखेर हे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचलं. पण , कनिष्ठ न्यायालयानं बिरजू यांची बाजू घेतली. मात्र या दरम्यान कामकाज बंद असल्यानं कंपनीवर कर्जाचा बोजा पडलाय. मात्र तरीही त्यांची लढाई सुरूच होती.

या दरम्यान मुलुंड आणि गोराई कचरा डेपोचं कामही बिरजू यांच्याकडे आलं. मात्र, मुलुंडच्या प्रकरणातही मिठाचा खडा पडला आणि पुन्हा प्रशासकीय वाद निर्माण झालं. पण गोराईतला काचऱ्या डेपोची बिरजू यांनी विल्हेवाट लावली.  

बिरजू यांना जम्मू आणि काश्मिर सरकारनंही बोलावलं होतं. तस म्हणायचं झालं तर मात्र शहर आणि डोंगराळ भागातली कचऱ्याची समस्या वेगळी होती. कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या विषारीद्रवामुळे पाण्याचे स्त्रोतही खराब होत होते. मात्र बिरजू यांनी काही महिन्यातचं  तिथल्या सरकारचीही समस्या सोडवली.

बिरजू यांनी संगितलं कि, “ मला तिथल्या मौलवींना बोलवलं आणि माझ्या हाताचं चुंबन घेतलं. त्या मौलवींनी म्हंटल की, मी त्यांना पुन्हा नवसंजीवनी दिली. तिथली नदी प्रदुषित आणि काळी होत चालली होती. जीआता एकदम लख्ख झाली होती. हे सर्व एका प्रयोगामुळे शक्य झालं होतं.’

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.