कल्याण सिंहांच्या पार्थिवावर भाजपचा झेंडा तिरंग्यावर लावला अन् सोशल मीडियात गोंधळ सुरु झाला.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्ट रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. साहजिकच शासकीय इतमामात त्यांच्यवर अंत्यसंस्कार होणार. म्हणजे तिरंग्याभोवती त्यांना लपेटून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार.

पण अंत्यसंस्काराला एक गालबोट लागलंय, आणि भाजपला यावरून ट्रोल करण्यात येत आहे. म्हणजे सोशल मीडियावर नुसती बोंबाबोंब सुरूय. 

त्याच झालंय असं की, कल्याण सिंहांच्या श्रद्धांजली सोहळ्यातला एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोत दिसल्याप्रमाणे, कल्याणसिंहांच्या पार्थिवाच्या पेटीवर तिरंगा ध्वज लपेटण्यात आला होता. आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावण्यात आला. म्हणजे तिरंगा थोडासा झाकला गेला होता. हे तुम्हाला खालच्या फोटोवरुन दिसेलच.

zenda

भाजपने ट्विट केलेल्या या फोटोत, कल्याण सिंह यांचे पार्थिव राष्ट्रध्वजाने गुंडाळलेले आहे, परंतु शरीराचा अर्धा भाग भाजपच्या पक्षाच्या ध्वजाने झाकलेला दिसत आहे.

यावर आक्षेप घेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास म्हणतात, 

 

“नवीन भारतामध्ये भारतीय ध्वजावर आपल्या पक्षाचा झेंडा लावणे ठीक आहे का?”

तर युवक काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे,

तिरंग्यावर भाजपचा झेंडा ! स्वयंघोषित देशभक्त तिरंग्याचा आदर करतात की अपमान ?

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी ट्विट केले की,

“देशापेक्षा वरचढ पक्ष. तिरंग्याच्या वरचढ पक्षाचा झेंडा. भाजपचे नेहमीप्रमाणे : ना पश्चाताप, ना दु:ख”.

हे झालं ट्विटच, पण कायदा काय सांगतो 

राष्ट्रीय गौरव अपमान निवारण प्रतिबंधक कलम २ नुसार,

कोणताही व्यक्ती जो भारतीय राष्ट्रीय ध्वज किंवा भारतीय राज्यघटना किंवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाळतो, विकृत करतो, त्याची विटंबना करतो, भ्रष्ट, विकृत करणे, नष्ट करणे, गैरवर्तन करणे, अन्यथा त्याचा अनादर दाखवणे किंवा (तोंडी किंवा शब्दात किंवा कृतीत लिहिलेले) त्याचा अपमान करणे, त्याला तीन वर्षांच्या मुदतीसाठी कारावास किंवा दंड किंवा दोन्हीसह शिक्षा होऊ शकते.

याआधी भाजपसोबत असा वाद उद्भवला होता का ?

तर हांजी जनाब, असे  वाद बऱ्याचदा उफाळून आलेत, की भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ध्वजाचा अपमान झाला आहे. २००९ सालात मंदसौर मध्ये (मध्यप्रदेश) भाजपा कार्यकर्तांनी तिरंग्या पेक्षा अधिक उंचीचा भाजपाचा झेंडा फडकवला. तर २०२१ म्हणजेच यावर्षी १५ ऑगस्टला मध्यप्रदेश मध्येच तिरंग्या सोबत भाजपाचा झेंडा फडकला,पण भाजपचा झेंडा उंचीवर होता.

Tiranga 1 680x453 1

राष्ट्रध्वज फडकविण्याच्या नियमाप्रमाणे, 

अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.

बऱ्याच वर्षांपूर्वी एनडीटीव्हीकडून सर्वे करण्यात आला होता. यात लोकसभेतील किती सदस्यांना राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज माहीत आहे याबाबतचा तो सर्व्हे होता. सर्वे चालू होऊन पंधरा मिनिटे झाली पण एकाही खासदाराला त्या प्रश्नांची नीट उत्तरे देता आली नाहीत.

अशी गंभीर परिस्थिती असताना भिडू तरी काय बोलणार सांगा तुम्हीच..

 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.