म्हणून पाकिस्तानचं नाव जरी काढलं तरी जनरल जी.डी. बक्शी यांना प्रचंड राग येतो…

प्रश्न मग पाकिस्तानचा असो, जगभरातील दहशतवादाचा असो, त्यावर भल्या मोठ्या  पिळदार मिशा असणारे निवृत्ती लष्करी अधिकारी आपले मत मांडत असतात. केवळ मतच नाही तर ते टीव्ही वरील चर्चे दरम्यान इतर सदस्यांना शिव्याही दिल्याचे उदाहरण आहे.

तर हे सगळ करणारे आहेत भारतीय लष्कराचे (निवृत्त) मेजर जनरल जी. डी. बक्शी. त्यांना इंग्लिश, हिंदी वृत्तवाहिन्यांनावर संरक्षण तज्ञ म्हणून त्यांना बोलाविण्यात येते.

भारतात राजकारण, क्रिकेट नंतर सर्वाधिक कुठल्या गप्पा होत असतील तर त्या संरक्षण या विषयावर होतात. नागरिकपण या गप्पा तेवढ्याच लक्ष देऊन ऐकतात. त्यामुळे अशा चर्चांना विशेष देण्यात येते.

तर चर्चेतील सदस्य म्हणून बोलविण्यात येणाऱ्या जी. डी. बक्शी याचं पूर्ण नाव आहे गगनदीप बक्शी. त्यांचा जन्म १९५० मध्ये मध्यप्रदेश मधील जबलपूर येथे झाला. १९७१ ते २००८ पर्यंत लष्करात होते. ते लष्करातील मेजर जनरल हुद्दा पर्यंत पोहचले होते. लष्करातील सर्वात मोठी पोस्ट समजल्या जाते.

लष्करात भर्ती

एका महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

इतर मुलांच्या वडिलांप्रमाणे जी. डी. बक्शी यांच्या वडिलांना सुद्धा वाटायचे की, त्यांच्या मुलगा आयएएस व्हावा. बक्शी यांचा मोठा भाऊ पण लष्करात होता. मात्र ते १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले होते. बॉम्ब स्फोट एवढा ताकतीचा होता त्यांच्या शरीर सुद्धा कुटुंबियांना मिळाले नाही. त्यामुळे घराचांचा विचार सुद्धा बदलला.

त्यानंतर बक्शी यांनी भारतीय लष्करात सामील होण्याचा निर्णय घेतला.  १९६६ मध्ये बक्शी यांनी एसएसबीची परीक्षा दिली. कमी अधिक नाही तर ते भारतात दुसरे आले होते. त्यांच्या लष्करात भर्ती होण्याचे मुख्य प्रेरणास्थान होते त्यांचे मोठे भाऊ.

जेव्हा कोणी लष्करात भर्ती होत, तेव्हा त्या जवानाच्या आई-वडिलांना एक बॉड साईन करावा लागतो. त्या बॉड मध्ये कुटुंबियांना अवगत करून देण्यात येते की, लष्करात असतांना भविष्यात कुठली अप्रिय दुर्घटना घटली अथवा मृत्यू येऊ शकतो. जर असे झाले तर त्यांचे कुटुंबीय लष्कराकडे कुठली आर्थिक मदत मागणार नाही.

मात्र जी डी बक्शी यांच्या कुटुंबीयांनी मात्र असा बॉड साइन करणार नसल्याचे सांगितले. त्यांना सांगण्यात आले की बॉड वर साइन केल्या शिवाय तुम्ही एनडीए जॉईन करू शकत नाही. त्यांनी आपल्या कुटुंबियांना समजून सांगितले आणि ते १९६७ मध्ये पुण्यातील एनडीए मध्ये प्रवेश घेतला. ३ वर्षाच्या खडतर प्रशिक्षणा नंतर एक वर्षासाठी इंडियन मिलिट्री एकदमी येथे होते. त्यांनी भारतीय लष्करात तब्बल ३७ वर्ष सेवा केली आहे.

२१ वर्षीच ते भारतीय लष्करात भर्ती झाले होते.

१९७१ मध्ये एकडे इंडियन मिलिट्री एकदमी मधील प्रशिक्षण पूर्ण होणार होते. मात्र तिकडे भारताच्या सीमेवर तणाव वाढला होता. त्यामुळे नवीन जवानांना सीमेवर पाठविण्यात आले होते. त्यात २१ वर्षीय जी डी बक्शी यांचा समावेश होता.

१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात त्यांचा समवेश होते. त्यावेळी पार पडलेल्या कामगिरी मुळे त्यांना लष्करात गौरवाच मानण्यात येणार सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरविण्यात आले होते.

२००८ मध्ये ते भारतीय लष्करातून निवृत्त झाले. त्यांना ३७ वर्षाच्या सेवेत एकून २६ पदके मिळाले आहेत.

शेवटी प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे जी. डी बक्शी यांना राग का येतो

बक्शी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. बक्शी हे सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या विचाराने प्रेरित असल्याचे असं सांगण्यात येत. अनेक टीव्ही डिबेट त्यांनी याबाबत सांगितले आहे.

भारतीय लष्कर नकाशा बदलू शकतो म्हणणारे जी डी बक्शी म्हणतात , काही जण भारतीय लष्कर हे अशा युनिट प्रकारचे युनिट आहे की, ते मानावधिकारला काही समजत नाही. मात्र मानवाधिकाराचा संबध जर करुणेशी असेल तर मी त्याचीशी सहमत आहे. मात्र मानवाधिकार हा लष्कराच्या ऑपरेशन मध्ये आला तर मी त्याला मानत नसल्याचे सांगितले होते. आत्तापर्यंत त्यांनी दोन वेळा लाइव्ह डिबेट मध्ये शिव्या दिल्या आहेत.

निवृत्त होऊन त्यांना १४ वर्ष झाली आहेत. मात्र त्याच शत्रू राष्ट्रा विषयी असलेला राग अजूनही तसाच आहे. त्यांच्या भावाचा मृत्यू पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात झाला होता. त्यामुळे संरक्षण विषया बाबत ते अशा प्रकारे आपली बाजू मांडत असेल असं सांगण्यात येते.

हे ही वाच भिडू 

 


Leave A Reply

Your email address will not be published.