थेट देशाच्या पंतप्रधानाला फाशी देण्याचा मूर्खपणा फक्त पाकिस्तानच करू शकतो..

भारताचा शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानमध्ये ४ दशकांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवेल अशी घटना घडली होती. जगभरातून या प्रकरणावर भरपूर टीका झाली पण पाकिस्तान या घटनेने आणि राजकीय खेळामुळे तेव्हा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. तर हे प्रकरण होतं पाकिस्तानचे दोन वेळा पंतप्रधान असलेल्या झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ४ एप्रिल १९७९ या दिवशी देशाच्या पंतप्रधानाला फाशी देण्यात आल्याने जगभर खळबळ उडाली होती.

या घटनेची सुरवात होते ती ५ जुलै १९७७ पासून. १४ ऑगस्ट १९७३ ते ५ जुलै १९७७ या काळात झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. ५ जुलै १९७७ रोजी पाकिस्तानचे तत्कालीन सेना प्रमुख असलेल्या जनरल मोहम्मद जिया उल हकने सत्तापालट घडवून आणला. ३ सप्टेंबर १९७७ या दिवशी भुट्टो यांना अटक करण्यात आली. अटक करण्याचं कारण होतं १९७४ साली विरोधी पक्षाच्या नेत्याच्या हत्येचा आरोप भुट्टो यांच्यावर होता. 

आता भुट्टो यांच्यावरचा हा खटला स्थानिक कोर्टात न जाता गेला तो थेट हायकोर्टात. हे हायकोर्टात गेलेलं प्रकरण परत कधी भुट्टो यांच्या बाजूने आलंच नाही. अनेक राजकारणी विचारवंत या घटनेबद्दल सांगतात कि भुट्टो यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळालीच नाही. लाहोर हायकोर्टाने भुट्टो यांना विपक्षी नेते असलेल्या नवाब मोहम्मद अहमद खान याच्या हत्येच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावली. जनरल जिया उल हक यांच्या आदेशानुसार या सगळ्या घटना घडवल्या गेल्या असही तेव्हाच्या राजकीय लोकांनी सांगितलं होतं.

जनरल जिया उल हकने हे प्रकरण न्यायव्यवस्था ताब्यात ठेवून केलं आणि आपला प्रतिस्पर्धी असलेल्या झुल्फिकार अली भुट्टो यांना आपल्या मार्गातून कायमचं हटवलं. ज्यावेळी भुट्टो यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा सगळा पाकिस्तान दुखी झालेला होता, जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला आणि भुट्टो यांची फाशी रद्द व्हावी म्हणून विनंत्याही करण्यात आल्या पण काहीच उपयोग झाला नाही. 

झुल्फिकार अली भुट्टो यांच्या जीवनावर लिहिणारे सलमान तासीर यांनी भुट्टो या पुस्तकात लिहून ठेवलंय कि,

भुट्टो ज्यावेळी सुरवातीला जेलमध्ये होते तेव्हा एक गार्ड कायम त्यांच्यासोबत असायचा. अगदी टॉयलेटच्या वेळी सुद्धा तो भुट्टो यांच्यासोबत असायचा. भुट्टो याना या गोष्टीचा इतका राग आलेला होता कि त्या गार्डमुळे ते जेवणसुद्धा करायचे बंद झाले होते.

त्यातचं त्यांना कोर्टाचा निर्णय न पटल्याने त्यांनी उपोषण सुरु केलं होतं. काही दिवस हे प्रकरण चाललं आणि कोठडीबाहेरच एक टॉयलेट भुट्टो यांच्यासाठी बांधण्यात आलं.

नंतर सलमान तासीर याची हत्या करण्यात आली. ३ एप्रिलला भुट्टो यांना निरोप देण्यात आला कि त्यांची फाशीची शिक्षा कॅन्सल करण्यात आली आहे. पण हे ऐकून भुट्टो यांच्या चेहऱ्यावरचे भाव जराही बदलले नाही. पण त्यांनी वकिलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली कारण फाशीची कुठलीही लिखित ऑर्डर त्यांना मिळलेली नव्हती, त्यांना त्यांच्या मुलीला आणि बायकोलाही भेटायचं होतं. बायको मुलीला ते भेटले आणि त्यांना कळून चुकलं कि हि त्यांची शेवटी भेट आहे.

त्यावेळी जेलचे गुप्त अधिकारी होते रफीउद्दीन त्यांनी भुट्टो के आखरी ३२३ दिन या पुस्तकात लिहिलंय कि, त्यांनी दाढी करण्यासाठी आपला सहायक असलेल्या अब्दुल रहमानला गरम पाणी जाण्यास सांगितलं आणि नंतर रफीला विचारलं कि बाहेर काय सुरूय ?  तेव्हा रफीने सांगितलं कि तुमची फाशीची शिक्षा रद्द झालेली नाही तर ती आज रात्री देण्यात येणार आहे. हे ऐकून सब खत्म म्हणत भुट्टो हताशपणे भिंतीकडे बघू लागले. 

जनरल जियाच्या वागणुकीमुळे आणि कोर्टाच्या निर्णयाने भुट्टो उपोषणाला बसलेले होते, त्यामुळे ते कमजोर झाले होते. चार लोकांनी स्ट्रेचरवरून त्यांना आणलं आणि रात्री सव्वा दोन वाजता रावळपिंडीच्या जेलमध्ये भुट्टो यांना फाशी देण्यात आली. जगाच्या इतिहासातली हि एक खूप निंदनीय आणि महत्वाची घटना मानली गेली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.