या रहस्यमय घटनेत थेट ३० वर्षांनंतर फ्लाईट ९१४ एअरपोर्टवर लँड झाली होती…

जगात इतके रहस्य आहेत कि त्याचा थांगपत्ता आजवर कुणालाही लागलेला नाही. अनेक जणांनी खोलवर शोध घेतला, अगदी ज्या नाही त्या गोष्टी केल्या पण काही रहस्ये हि उलगडलीच नाही. २१ शतकात प्रगत समाज असूनही काही रहस्ये मानव सोडवू शकलेला नाही. या रहस्यमय घटना बघून वैज्ञानिकसुद्धा हैराण होतात.

आजचा किस्सा असाच विचित्र आहे ज्यात एक विमान हरवतं आणि तब्बल ३० वर्षानंतर ते विमान लँड होतं.

आजपासून सुमारे ६५-६६ वर्षांपूर्वी म्हणजे १९५५ साली अशाच एका रहस्याने जगाला एक आश्चर्याचा धक्का दिला होता. अमेरिकेतल्या एका विमानाने उड्डाण तर केलं पण जेव्हा ते जमिनीवर लँड झालं तेव्हा लँड होण्यासाठी त्याला ३० वर्ष लागली होती. आता लँड तर केलंच पण नंतर अचानक गायबसुद्धा झालं. तर बघूया डिटेलमध्ये हा काय मॅटर होता.

मीडिया रिपोर्ट्स नुसार,

२ जुलै १९५५ रोजी अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधून मियामीसाठी फ्लाईट ९१४ ने उड्डाण केलं. या विमानात एकूण ५७ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. पण हि फ्लाईट ९१४ ने उड्डाण तर केलं पण लँड करण्याऐवजी ढगातच ते गायब झालं. अमेरिकेच्या जेव्हा हे प्रकरण ध्यानात आलं त्यांनी या विमानाचा शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न केला पण हि फ्लाईट ९१४ काय सापडलीच नाही.

खरंतर आजच्या काळात जर विमानाने न्यूयॉर्कवरून उड्डाण केलं तर मियामीमध्ये पोहचण्यासाठी जवळपास साडे तीन तासांचा वेळ लागतो. जर १९५५ सालाचा विचार केला न्यूयॉर्कमधून मियामीमध्ये जाण्यासाठी ५ तासांचा वेळ लागत असेल. सगळीकडेच या गायब झालेल्या विमानाची चर्चा सुरु झाली होती जेव्हा १९५५ मध्ये गायब झालेलं फ्लाईट ९१४ विमान तब्बल ३० वर्षानंतर ९ मार्च १९८५ रोजी रहस्यमयीरित्या व्हेनेझुएलाच्या कारकास एअरपोर्टवर वर लँड झाली.

यात सगळ्यात जास्त हैराण करणारी गोष्ट होती कि एअर ट्राफिक कंट्रोलला हे विमान लँड होणार याबद्दल कसलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. लँडिंगच्या काही काळानंतर लगेचच या विमानाने पून्हा एकदा आकाशाच्या दिशेने झेप घेतली आणि परत गायब झालं. या विमानाबद्दल एक भयंकर रहस्य निर्माण झालं. 

असंही सांगितलं जातं कि जेव्हा फ्लाईट ९१४ एअरपोर्टवर लँड झाली तेव्हा पायलटने तिथे उपस्थित असलेल्या स्टाफला विचारलं कि हे कोणतं वर्ष चालू आहे? जेव्हा ग्राउंड स्टाफने सांगितलं कि १९८५ साल चालू आहे. तेव्हा पायलटने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलला ओह माय गॉड! आणि हे विमान पुन्हा एकदा आकाशात झेपावलं.

या विमानाबद्दल अनेक अफवा आहेत किंवा या घटनेला सत्य मानणारी लोकं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. पण ९ मार्च १९८५ नंतर या विमानाचा काहीच पत्ता कोणालाच माहिती नाही. अमेरिका आजही या हरवलेल्या विमानाच्या शोधात आहे. या घटनेवर विश्वास बसणंच मुळात अवघड आहे पण या विमानाबद्दल ज्या ज्या लोकांनी संशोधन केलं त्यांचं मत आणि या घटनेला हास्यास्पद समजणारे लोकं वाढतच चालले आहे. विमान गायब झालं किंवा क्रॅश झालं या विषयी रहस्य आजही कायम आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.