राजस्थानातला रहस्यमयी किल्ला, जिथे आजही देशातला सगळ्यात मोठा खजिना दडलाय..

भारत म्हंटल कि, डोळ्यासमोर उभा राहतो तो राजे, राजवाडे आणि किल्यांच्या देश. इथल्या प्रत्येक किल्ल्याचा आपला एक इतिहास आहे. कोणी त्याच्या भव्यतेपणामुळं, कोणी त्याच्या मजबुतीमूळ तर कोणी तिथल्या लढायांसाठी. दरम्यान, असाच एक किल्ला आहे, जो प्रसिद्ध आहे त्याच्या नावामुळं.

तो किल्ला म्हणजे ‘कुंवारा किला’. राजस्थानातल्या अलवारमधला हा किल्ला, जो त्याच्या स्ट्रक्चरल डिजाइनमुळं देखील तितकाच प्रसिद्ध आहे. ज्यामुळे दूरदूरचे पर्यटन प्रेमी राजस्थानात आले कि या किल्ल्याला हमखास भेट देतात.  हा ‘बाला किल्ला’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.

तसं पाहायचं झालं तर या किल्ल्याशी अनेक रहस्य जोडली गेलीत. असं म्हणतात कि, एकेकाळी इथं एन्ट्रीसाठी तिथल्या एसपीची परवानगी घ्यायला लागायची. याला ‘अलवर फोर्ट’ असंही म्हंटल जात. सगळ्या अलवर परिसरात ही सगळी जुनी वास्तू आहे. 

असं मानलं जात कि, या किल्ल्याच्या निर्मितीचं काम  १४९२ मध्ये हसन खान मेवातीनं सुरु केलं होत. या किल्ल्यावर मुघलांपासून जात आणि मराठ्यांची देखील सत्ता होती. किल्ल्याच्या भिंतीत ४४६ मोठी छिद्र आहेत, जी खासकरून दुष्मनांवर गोळीबार करण्यासाठी बनवली गेली होती. या छिद्रांतून १० फुटाच्या बंदुकींनी सुद्धा निशाणा साधला जाऊ शकतो. यासोबतच आपल्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किल्ल्यात १५ मोठे आणि ५१ छोटे बुरुज बनवण्यात आले होते.

या किल्ल्याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे युद्धासाठी एवढा सुसज्ज असलेल्या या किल्ल्यावर इतिहासात कधीच युद्ध झाले नाही. आणि त्यामुळेच याला ‘कुंवारा किला’ असं म्हंटल जात. 

हा बलाढ्य किल्ला पाच किलोमीटर लांब तर १.५ किलोमीटर रुंद आहे. किल्याच्या आत प्रवेशासाठी ६ दरवाजे बनवले गेलेत, ज्याला जय पोल, सूरज पोल, लक्ष्मण पोल, चांद पोल, कृष्णा पोल आणि अंधेरी पोल अशी नाव देण्यात आलीत. या किल्ल्याची भिंत सगळ्या अलवारी डोंगरांवर पसरली आहे.

या किल्ल्यात मुघल शासक बाबर आणि जहांगीर सुद्धा राहिलेले आहेत. बाबरने इथं एक रात्र घालवली होती. तर जहांगीर किल्ल्यात ज्या रूममध्ये राहिला होता, त्याला आज ‘सलीम महल’ नावाने ओळखलं जात.

असं म्हणतात की मुघल बादशाह जहांगीरने इथे देशातला सर्वात मोठा खजिना लपवला. त्यात करोडो रुपयांचे दागिने, हिरे माणके यांनी भरलेली हांडे होते. या किल्ल्याच्या रक्षणासाठी जहांगीरने खास व्यवस्था केली होती.

तसेच, किल्ल्याशी जोडलेली आणखी एक खास बाब म्हणजे या किल्ल्याजवळ सुमारे २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला एक खंडर इमारत आहे, जो तोफेचा कारखाना असल्याचे सांगितले जाते. राज्यकर्त्यांच्या काळात या कारखान्यात तोफांची निर्मिती केली जायची, जिथं त्याची चाचणीही केली जायची. या चाचण्यांमध्ये तोफा फुटण्याच्या आणि त्याच्या परिणामांचे मोठे नुकसान होते.

त्यात या किल्ल्यावर आशियातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती. ही तोफ चालवताना माणसांना नाही तर एका कुत्र्याला प्रशिक्षण दिल गेलं होत. व्हिक्टर असं या कुत्र्याचं नाव होत.  तो कुत्रा तोफ डागल्यानंतर ढिगाऱ्याखाली पाण्याच्या तलावात उडी मारायचा.

राजस्थान मध्ये असं म्हंटल जात कि, या किल्ल्याच्या आत मौल्यवान खजिना दडलेला आहे, जो कि संपत्तीचा देवता कुबेरचा आहे. कित्येकजण आजही हा खाजणीनं शोधण्यासाठी अलवार किल्ल्यामध्ये फिरत असतात. परंतु हा रहस्यमयी खजिना आजपर्यंत कोणालाही तो सापडला नाही.

दरम्यान, २०१८ ला आलेली मोठ्या वादळामुळं किल्ल्याचा वरचा भाग ढासळला होता, ज्यामुळे पर्यटन या किल्ल्यावर जाऊ शकत नव्हते. मात्र गेल्या वर्षीच पुरातत्व आणि संग्रहालय विभागाने या अलवर किल्ल्यावर जाण्याची परवानगी दिलीये. यासाठी ५ सुरक्षा गार्डही तैनात करण्यात आलीये. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.