अफगाणिस्तानात सत्तेवरून आता तालिबानी- हक्कानी आपापसातचं भिडलेत

गेल्या कित्येक दिवसांपासून अफगाणिस्तानात तालिबान्यांचं सत्ता नाट्य सुरु आहे. बंदुकीच्या धाकेवर त्यांनी सत्ता बनवली खरी मात्र, आता त्यांचं आपापसातचं वाजलंय. तालिबान्यांमधल्या गोंधळा दरम्यान, तालिबान नेता मुल्ला बरादरला बंधक बनवल्याचं समजतंय. एवढंच नाही तर तालिबानचा सर्वोच्च नेता म्हंटला जाणारा हैबतुल्लाह अखुंदजादाच्या मृत्यूच्या बातम्या समोर येतायेत.

हा, याबाबत अजूनतरी कुठलीच अधिकृत घोषणा झालेली नाही. पण यामागे हक्कानी गट असल्याचं सांगितलं जातंय.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, तालिबान सरकारमध्ये हक्कानी गटाचे वर्चस्व इतके वाढले आहे की, त्याच्या एका कमांडरने बरादारला जबरदस्त मारहाण केलीये.  अफगाणिस्तानात नव्यानं स्थापन झालेल्या सत्तेत मुल्ला बरदार उपराष्ट्राध्यक्ष बनला होता. या हक्कानी गटानं त्याला राष्ट्रपती भवनात बंदक बनवलं असून लाथा- बुक्क्यांनी मारण्यात आलंय.

आता हे खरं आहे का खोटं अजून तरी स्पष्ट नाही, कारण गेल्या आठवड्यातचं बरादरच्या मृत्यूची बातमी आली होती, पण नंतर बरादारनेचं व्हिडिओ जारी करून या सगळ्या अफवा असल्याचं म्हंटल होत.

मात्र, आता अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रपती भवनात बरदारवर हल्ला झाला आणि गोळ्या देखील झाडण्यात आल्यात. 

असे म्हंटले जाते कि, सत्तेवरून हक्कानी आणि तालिबान्यांत  संघर्ष झाला. या संघर्षात मुल्ला बरदार आणि  हैबतुल्लाह गंभीर जखमी झाला. या भांडणात फर्निचर आणि गरम चहा भरलेले मोठे थर्मास सुद्धा फेकण्यात आले. एवढच नाही तर वाद सुरु असताना  हक्कानी नेटवर्कचा नेता खलील-उल-रहमान हक्कानीनं आपल्या जागेवरून उठून खुर्ची उचलून मुल्ला बरदारला मारहाण केल्याचं म्हंटल जातंय.

 पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने सुद्धा हक्कानी नेटवर्कवरही पैज लावल्याच म्हंटलं जातंय.

खरं तर, मुल्ला अब्दुल गनी बरदार हा तालिबानची स्थापना करणाऱ्या लोकांपैकी एक आहे. तालिबानच्या प्रत्येक महत्त्वाच्या लढाईचा तो भाग होता. अमेरिकेबरोबरच्या चर्चेतही तो कायम सहभागी होता. तालिबानचा तो प्रमुख नेता असल्यानं त्यालाचं तालिबान सरकारमध्ये म्हत्वाचाही जबाबदारी देण्यात येईल असं म्हंटलं होत. मात्र, त्याला उपराष्ट्राध्यक्ष पद दिल गेलं.  

यासाठी प्रामुख्याने पाकिस्तान समर्थित हक्कानी गटाच्या नेत्यांनी तर्क लावण्यात आला कि,

मुल्ला बरादर अमेरिकेसोबत नेहमी चर्चेला असतो, त्यामुळे तो अमेरिकेच्या दबावाखाली येण्याची शक्यता आहे आणि हे तालिबान सरकारसाठी हानिकारक ठरू शकतो.

त्यामुळे या हक्कानी गटानं अंतरिम सरकारमध्ये मुल्ला बरादरला उपराष्ट्राध्यक्ष पद दिलं आणि आपल्याकडे गृह मंत्रालयासह चार महत्त्वाची मंत्रालयं घेतली.तर एफबीआयच्या दहशतवादासाठी मोस्ट वॉन्टेड यादीत असलेला सिराजुद्दीन हक्कानीला कार्यवाहक गृहमंत्री बनवण्यात आलं.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या संघर्षानंतर मुल्ला बरादरने टीव्हीवर निवेदन दिलेयं. त्याने या सत्ता संघर्षाच्या बातम्यांचं खंडन केलंय. पण असे म्हंटले जातेय की, मुल्लावर दबाव असून त्याला निवेदन वाचायला भाग पाडले गेले. 

असं असलं तरी, हैबतुल्लाचा कुठेच पत्त्या नाहीये. तो बऱ्याच काळापासून ना कुठे पहिला गेला ना त्याला कुठं ऐकलं गेलंय. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हंटलं गेलंय. 

या सगळ्यांवरून हे स्पष्ट होतयं कि,अफगाणिस्तान सरकारमध्ये  पाकिस्तान समर्थित हक्कानी गट मजबूत झाला आहे. त्यामुळे आता तालिबान्यांबरोबरचं भारताची देशील डोकेदुखी वाढलीये.

हे ही  वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.