त्यावेळी चर्चा होती कि, लालू अडवाणींना स्लो-पॉयझन देतायेत

२५ सप्टेंबर १९९० ला अडवाणींनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पूजा करून रथयात्रेला सुरुवात केली. या रथयात्रेचा उद्देश राम मंदिराच्या उभारणीसाठी समर्थन मिळवणं होतं. ही यात्रा सोमनाथ मंदिरापासून रामजन्मभूमीपर्यंत जाणार होती. जी ८ राज्यांतून तसंच तत्कालीन केंद्रशासित प्रदेश दिल्लीतून जाणार होती. योजनेनुसार, २५ सप्टेंबरला सोमनाथपासून सुरू होणारी यात्रा ३० ऑक्टोबर रोजी अयोध्येत संपणार होती.

अडवाणींची ही  रथयात्रा आजही अनेक कारणांनी चर्चेत आहे. यातलेचं एक म्हणजे बिहारमध्ये अडवाणींना झालेली अटक आणि विष पाजल्याची अफवा. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ‘Gopalganj to Raisina Road’ या  पुस्तकात हा किस्सा सांगितलाय. 

तर अडवाणींची राम रथ यात्रा बिहार मार्गे अयोध्येला जाणार होती. अडवाणींच्या रथयात्रेची घोषणा झाल्यांनतर लालू यांनी नवी दिल्लीत अडवाणींनी भेट घेतली होती. लालूंनी संकोच अडवाणींना म्हंटल कि,

‘तुम्ही दंगल पसरवणारी राम रथ यात्रा थांबवा. खूप मेहनतीने आम्ही बिहारमध्ये भाईचारा कायम केलायं. जर तुम्ही दंगलीचा दौरा केला, तर आम्ही सोडणार नाही.’

लालूंनी आपला मुद्दा अगदी पण स्पष्टपणे मांडला. पण अतिशय शांत आणि गोड बोलण्यासाठी ओळखले जाणारे अडवाणी लालूंच्या बोलण्यामुळे संतापले. ते म्हणाले, ‘

‘देखता हूं कौन माई का दूध पिया है, जो मेरी रथयात्रा रोकेगा?

यावर लालूंनी सुद्धा उत्तर दिलं,

मैंने मां और भैंस दोनों का दूध पिया है। आइए, बिहार बताता हूं।

यांनतर लालूंनी थेट बिहार गाठलं.

दरम्यान, सोमनाथ येथून यात्रा सुरू होताच यूपी, बिहारसह अनेक राज्यांमध्ये जातीय तणाव पसरला. ऑक्टोबरमध्ये अडवाणींची रथयात्रा मध्य प्रदेशातून बिहारच्या धनबादमध्ये  पोहोचली. यांनतर लगेचच लालूंनी अडवाणींना अटक करण्याची मंजुरी घेण्यासाठी पंतप्रधान व्ही.पी.सिंह यांना फोन केला, पण पंतप्रधान गप्प राहिले. कदाचित त्यांच्या सरकारचे अस्तित्व भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याने ते गोंधळून गेले होते.

त्यानंतर लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री निर्णय घेत धनबादच्या डीसी आणि एसपींना बोलावून अडवाणींना अटक करण्याचे निर्देश दिले. पण दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी जातीय तणाव निर्माण होईल असे सांगून अटक नाकारली.

आता लालूंचा हा प्लॅनही फसला. अशा परिस्थितीत प्लॅन बी तयार करणे आवश्यक आहे असे लालूंना वाटले. त्यांनी आयएएस अधिकारी आर के सिंह आणि डीआयजी दर्जाचे अधिकारी रामेश्वर ओरांव यांना आपल्या घरी बोलवून घेतलं. त्यानंतर लालूंनी रात्री ९ वाजता राज्याचे मुख्य सचिव आणि गृह सचिवांच्या नावे एक विशेष आदेश तयार केला, ज्यात आर.के.सिंह आणि ओरांव यांना समस्तीपूरमध्ये अडवाणींना अटक करण्याचे अधिकार देण्यात आले.

आता अडवाणी लालूंच्या नजरकैदेत होते.  यादरम्यान अडवाणींनी एक विशेष विनंती केली की, त्यांना त्यांच्या पत्नीशी कमला अडवाणींशी बोलायचंय. ते त्यांना खूप मिस करत आहेत आणि त्यांच्याशी न बोलण्यामुळे ते अस्वस्थ आहेत.

आता अडवाणींच्या या विनंतीमुळे लालूंची विचित्र कोंडी झाली होती. कारण ही एक राजकीय कैद्याची बाब होती. अडवाणी काही गुन्हेगार नव्हते. पण लालूंना भीती होती कि, अडवाणी त्यांच्या पत्नीबरोबर काही राजकीय गोष्टी शेअर करतील. जर ती गोष्ट लीक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकले असते.

लालूंना सहकाऱ्यांनी स्पष्टपणे सुचवले की, त्यांनी अडवाणींची ही विनंती स्वीकारू नये. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या विनंतीवर लालू नाही म्हणू शकले नाही. अडवाणींना पत्नीशी बोलण्यासाठी लवकरच हॉटलाईनची व्यवस्था करण्यात आली. अडवाणी त्यांच्याशी दिवसातून दोनदा बोलायचे.

कोणत्याही गैरसमजापासून स्वतःला वाचवण्यासाठी लालूंनी उपायुक्त सुधीर यांना त्यांच्या पत्नीशी बोलत असताना खोलीत राहण्याची सूचना केली. पण आपल्या पत्नीशी बोलत असताना खोलीत सुधीर यांना पाहून  अडवाणींनी त्यांना फटकारले –

‘तुम्ही किंवा तुमचे मुख्यमंत्री माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत का?

यावर सुधीर यांनी अत्यंत विनम्रतेने उत्तर दिले की, ते फक्त सूचनांचे पालन करून खोलीत उपस्थित होते आणि त्यांनी फोनवर संभाषण ऐकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. अडवाणी सुधीरला पसंत करू लागले आणि त्यांना आपला मुलगा मानलं.

यांनतर बातमी लीक झाली की, नजरकैदेत असलेले अडवाणी आपल्या पत्नीशी दिवसातून दोनदा बोलतात. एका ज्येष्ठ पत्रकाराने कमला अडवाणी यांना अडवाणीशी संवाद साधताना त्यांची मुलाखत घेण्याची विनंती केली. ठरलेल्या दिवशी जेव्हा पती -पत्नी हॉटलाईनवर बोलत होते, पत्रकाराने अडवाणींशी दुसऱ्या टोकावरून बोलण्याचा प्रयत्न केला. पण अडवाणींनी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. कारण अडवाणींनी लालूंना वाचन दिले होते कि,  ते फक्त आपल्या पत्नीशीच बोलतील.

या दरम्यान, एक गोष्ट लालूंच्या कानावर पडली कि, अडवाणी कमी खात आहेत. कारण त्यांना जे दिले जातेय, ते त्यांचा आवडीचे नाही. लालूंना नाही म्हंटल तरी वाईट वाटले. पण अश्यातच माध्यमांच्या एका वर्गातून अफवा पसरली की, लालूंच्या सांगण्यावरून अडवाणींना जेवणातून स्लो-पॉइझन दिलं जातंय  आणि ही वस्तुस्थिती जाणून घेताना अडवाणी जेवताना खबरदारी घेतायेत.

लालूंना ही चर्चा कानावर पडताच जरा धक्काच बसला. पण ही अफवा दूर करण्यासाठी लालूंनी अधिकाऱ्यांना अडवाणींच्या मुलीशी संपर्क साधायला सांगितलं आणि वडिलांना भेटायला येण्याची विनंती केली. लालूंनी त्यांना गेस्ट हाऊसमध्ये आणण्यासाठी सरकारी हेलिकॉप्टरची व्यवस्था सुद्धा केली. लालू  हेलिकॉप्टरला  फाटफट्या म्हणायचे. यानंतर प्रतिभा तिथे आल्या आणि स्लो-पॉइझनच्या अफवा तिथेच संपल्या. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.