बापाविरुद्धची न्यायलयीन लढाई पोरीनं शेवटी जिंकलीच !

अमेरिकन सिंगर ब्रिटनी स्पीयर्स सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. आता ब्रिटनी कोण ? हे काय वेगळं सांगायला नको. ती ट्रेंडिंग मध्ये आहे कारण तिचा काहीतरी कंजरवेटरशिपचा मुद्दा होता वाटत. आणि त्यातून आता तिला सुटका मिळालीय.

आता ज्यांना ब्रिटनी माहीत नाही त्यांनी युट्यूबवर जाऊन Britney Spears असं सर्च करा. झटक्यात तिची सगळी गाणी तुम्हाला दिसतील. ह्या बयेचे फक्त अमेरिकेतच नाही तर अख्या जगभरात फॅन्स आहेत. तिने एक गाणं गायचा एक फोटो काढायचा अवकाश झालंच सगळं व्हायरल. तर आपण तिच्या कंजरवेटरशिपचा मुद्दा बोलत होतो नाही का ?

तर मुद्द्यावर येऊ आणि हे कंजरवेटरशिपच प्रकरण सुरू कसं झालं ते बघू.

तर ब्रिटनीने एक इन्स्टाग्राम पोस्ट टाकली होती. आणि त्यानंतर #SaveBritney #FreeBritney ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. खरं तर ही गोष्ट जुलै महिन्यातली होती. तिच्या त्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये गुलाबाचं फुल आणि एक पत्र होतं. त्यात कॅप्शन मध्ये ब्रिटनीने लिहिलं होतं,

तिच्या केसात फुल होत आणि डोळ्यात जादुई राज.

ही लाईन खरं तर अरुंधती रॉय यांच्या ‘द गॉड स्मॉल थिंग्स’ या पुस्तकातली होती. त्यावेळी ही लाईन खूपच फेमस झाली होती. याचाच परिणाम १९९७ मध्ये या पुस्तकाला बुकर प्राईज मिळालं होतं. यात दोन जुळ्या मुलांची गोष्ट होती. त्या मुलांचं आयुष्य लव लॉमुळे नष्टच झाल्यात जमा होत.

लव लॉ म्हणजेच, कंजरवेटरशिप..

अमेरिकेत कंजरवेटरशिप ह कायदा व्यक्तीच सरंक्षण करण्याच्या हेतूने तयार झालाय. हा कायदा अशा लोकांसाठी असतो ज्यांना स्वतःचं मानसिक आणि शारीरिक संतुलन ठेवता येत नाही. थोडक्यात सिज़ोफ्रेनिया झालेल्या वृद्ध लोकांसाठी हा कायदा करण्यात आलाय. यात कोर्टातर्फे एक प्रतिनिधी निवडला जातो जो त्या व्यक्तीची काळजी घेतो.

ब्रिटनीची काळजी तिचे वडील घेत होते, पण काळजीच्या नावाखाली तिचा छळ सुरु असल्याचं तिनं सगळ्या जगाला ओरडून सांगितलं. 

मागच्या १३ वर्षांपासून ब्रिटनी तिच्या वडिलांच्या कंजरवेटरशिपमध्ये होती. २००८ मध्ये पती केविन फेडरलाइनपासून घटस्फोट घेतल्यानंतर ब्रिटनीच्या वडिलांना तिच्या वैयक्तीक आयुष्यापासून ते संपत्तीपर्यंत सर्व कायदेशीर अधिकार या कंजरवेटरशीपच्या माध्यमातून देण्यात आले. त्याला वैतागून ब्रिटनीनं अमेरिकेच्या लॉस एंजेलिस न्यायालयात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की,

१३ वर्षांपासून चालू असलेल्या या कंजरवेटरशिपपासून मला आता मुक्ती हवी आहे. यासोबतच मला माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला जावा. मी १३ वर्ष खूप सहन केलं आहे. आता हे सर्व खूप जास्त होत आहे.

१३ वर्षांपासून मला जबरस्तीनं ड्रग्स दिले जात आहे. माझ्या मनाविरूद्ध माझ्याकडून काम करून घेतलं जात आहे. मला मुलांना जन्म देण्याचा अधिकारही नाहिए. मला केवळ माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. या कंजरवेटरशिपमुळे माझा फायदा नाही तर नुकसानच जास्त होत आहे. मलाही इतरांप्रमाणे स्वतंत्र आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि मी असंच आयुष्य जगू इच्छिते.

पण एवढं सगळं ऐकून घेऊन न्यायालयानं ब्रिटनीची याचिका फेटाळली. आणि तिच्या वडिलांच्या बाजूनं निर्णय दिला.

दरम्यान ब्रिटनीला पाठींबा देण्यासाठी तिचे चाहतेही रस्त्यावर उतरले होते. त्यांनी तिच्यासाठी ‘फ्री ब्रिटनी’ अशी चळवळ सुरू केली. या चळवळीला जगभरातून प्रतिसाद मिळला होता. अनेक चाहत्यांनी तसेच जगभरातील सेलिब्रेटींनी ब्रिटनीला आपला पाठींबा दर्शवला.

याचा परिणाम ब्रिटनी थांबली नाही, तर तिने आपला स्वतंत्र जगण्यासाठीचा लढा सुरूच ठेवला. आणि आज तिच्या वडिलांना सांगण्यात आलंय की पोरगी स्वतः ची काळजी स्वतः घेऊ शकते, तुम्ही आता थांबा.

पोरीनं शेवटी करुन दाखवलं, बापाविरुद्धची न्यायलयीन लढाई पोरीनं शेवटी जिंकलीच !

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.