मोदीजी देशासाठी रडतात आणि पायलने मोदीजींसाठी रडून दाखवलं..

बॉलिवूडमध्ये हजारो लोकं स्ट्रगल करत असतात. निर्मात्यांचे, दिग्दर्शक लोकांचे उंबरठे झिजवत असतात. मिळेल ते आणि पडेल ते काम नवीन आलेले लोकं करत असतात कारण कुठंतरी चांगलं काम आपल्याला मिळेल आणि आपला हा स्ट्रगल थांबेल आणि चांगले दिवस येतील असा दुर्दम्य आशावाद घेऊन ही मंडळी वावरत असतात. सगळेच यात सक्सेसफुल होतात असं नाही काही बॉलिवूडमध्ये कामाने नाही तर कांड करून फेमस होतात. यातच समावेश होतो पायल रोहतगीचा. जिने बॉलिवूडमध्ये इतके राडे केले की कोन्ट्रोव्हर्सि क्वीन म्हणून तिची ओळख बनली.

9 नोव्हेंबर 1984 रोजी हैद्राबादमध्ये पायल रोहतगीचा जन्म झाला. लहानपणापासूनच टीव्हीवर आपण दिसलो पाहिजे ही इच्छा होती. शाळेत हुशार होती, घरच्यांनी इंजिनियरिंगला घातलं . आता भारताच्या पुरातन इतिहासाप्रमाणे इंजिनियरिंगला गेलेले पोर पोरी अभ्यास सोडून सगळं करतात तसेच पायलच्या बाबतीत झालं. कॉलेजमध्ये असतानाच तिला मॉडेलिंगची ओळख झाली. मॉडेलिंग मध्ये यशस्वी झाल्यावर अभिनेत्री बनण्याची तिची इच्छा बळावली.

2001 साली मिस इंडिया टुरिझमकडून तिला पुरस्कार मिळाला. याच काळात रोहतगीने प्रियांका चोप्रा, लारा दत्ता आणि दिया मिर्झा यांच्यासोबत फेमिना मिस इंडिया पेजेन्टमध्ये सहभागी होऊन आपल्या करिअरची सुरवात केली.

सिनेमे तुरळक मिळत होते पण कामाशिवाय भलत्याच गोष्टींमध्ये सहभाग घेण्याचा स्वभाव तिला चांगलाच नडला. 2012 साली पायल रोहतगीने दिग्दर्शक दीबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. आता हे काय कमी होतं का म्हणून पायल रोहतगीने ट्विटरवरून बऱ्याचदा खोट्या माहिती आणि अफवा पसरवल्या होत्या.

मुंबई पोलिसांनी 2019 साली पायल रोहितगीच ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं होतं. पण नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मध्यस्थी करून पायल रोहतगीच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या होत्या.

गांधी घराण्यावर मात्र पायल रोहतगीने सडकून टीका केली होती की भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या वडिलांचे वैध पुत्र नव्हते. हे तर काहीच नाही तिने असा आरोप केला होता की मोतीलाल नेहरू यांना पाच बायका होत्या. जेव्हा लोकांकडून प्रचंड शिव्या पडू लागल्या तेव्हा पायल रोहतगीने सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची सार्वजनिक माफी मागितली होती. नेहरू गांधी कुटुंबावर टीका केल्याने पायल रोहितीगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक ठेवली होती.

आता पायलताई भाजपच्या सपोर्टर आहेत त्या खुलेआम आपण भक्त असल्याच सांगतात हे तर मान्य पण मध्यंतरी त्यांच्या एका व्हिडीओ मुळे भलतीच कॉंट्रोव्हर्सी झाली होती. 

झालं असं होत की यावर्षी बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागले होते. ममता दीदींनी खेला हॉबे म्हणत भाजपला चारी मुंड्या चीत केलं. तेव्हा अक्षरशः पाटील ताई रडल्या. गप्प घरात रडल्या असत्या तर ठीक होत पण त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवला. बर व्हिडीओ बनवला इथं पर्यंत पण ठीक होत पण त्यांनी त्यात थेट मोदींना आपको शर्म नही आती म्हणत त्यांच्यावर आग पाखड केली.

भक्त मंडळी पिसाळला. हमरी बिल्ली हम ही पे म्यांव म्हणत त्यांनी तेव्हा बाजार उठायचा प्रयत्न केला. पण पूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळलं कि ताईंनी मोदीजींच्या सपोर्टमध्ये व्हिडीओ बनवलाय. पण तो पर्यंत घडायचं ते घडून गेलेलं. सध्या पायल हेच करत असली तरी

2002 साली ए या हो रहा है या सिनेमातून पायल रोहतगीचं पदार्पण बॉलिवूडमध्ये झालं. नंतर पुढे प्लॅन, रक्त, तोबा तोबा, हे बेबी, ढोल, 36 चायना टाऊन, मिस्टर 100 % या सिनेमांमधून ती झळकत राहिली.

पण सिनेमे राहिले बाजूला पायल रोहतगी या राड्यांमध्येच जास्त अडकुन राहिली परिणामी सिनेमे वैगरे हातातून जाऊ लागल्याने टीव्हीवरच्या रियालिटी शोजकडे वळली. पण कॉन्ट्रोव्हर्सि क्वीन म्हणून तिची ओळख कायम झाली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.