कोरोना आणि फ्ल्यूच्या डबल इन्फेक्शनचं टेन्शन ‘फ्लोरोना’ बनून आलंय…

गेल्या वर्षभराभरापूर्वी कोरोनानं एन्ट्री मारली. चीनपासून सुरु झालेलं या व्हायरचं थैमान बघता बघता अख्ख्या जगभरात पसरलं. लाखो लोकांचा जीव घेतलेल्या या व्हायरसवर तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या, लसी विकसित केलेल्या गेल्या. पण कोरोना जायचं काय नाव घेईना.

जेव्हा जेव्हा वाटतं आता परिस्थिती आटोक्यात आलीये, तेव्हा- तेव्हा या व्हायरसचे नवनवे व्हेरियंट समोर येत असतात. अगदी कालपर्यंत कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरियंटनं नुसता उच्छाद मांडला होता, दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेला  हा व्हेरियंट काही दिवसांमध्येचं सगळ्या देशात पसरला. या व्हेरियंटच्या संक्रमितांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतोय, ज्यामुळे परत एकदा लॉकडाऊन लागतंय का काय  अशी भीती सगळीकडे पसरलीये.

आता त्यात भरीस भर म्हणून कोरोना सोबत नवा व्हायरस आलाय. जगात पहिल्यांदाच कोरोना आणि फ्लूच्या व्हायरसचा मानवी शरीरावर अटॅक होणारे आहे, त्यामुळे हा नवा व्हायरस आणखी भयंकर असल्याचे बोलले जातेय. या कोरोना आणि इन्फ्लूएंझाच्या डबल इन्फेक्शनला  ‘फ्लोरोना’ म्हटले जात आहे. या नवीन व्हायरस ‘फ्लोरोना’मध्ये एकाच रुग्णामध्ये कोरोना आणि इन्फ्लूएंझा हे दोन्ही व्हायरस  आढळून आल्याचे समजते.

म्हणजे या नव्या व्हायरसने संक्रमित व्यक्तीला कोरोना सोबतच फ्लूसुद्धा होईल. त्यामुळे फ्लू+ कोरोनाच्या या डबल अटॅकला ‘फ्लोरोना’  म्हंटल गेलंय.

या नव्या फ्लोरोना व्हायरसचा  पहिला पेशंट इस्रायलमधून समोर आलाय. जिथे एक गरोदर महिला रॅबिन मेडिकल सेंटरमध्ये बाळाला जन्म देण्यासाठी दाखल करण्यात आली होती. जेव्हा तिची कोरोना टेस्ट केली गेली, तेव्हा तिच्या शरीरात हे डबल इन्फेक्शन आढळून आले. अर्थात या फ्लोरोना व्हायरसची लक्षण आढळली.

इस्त्रायलने एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलेमध्ये फ्लोरोनाचे प्रकरण समोर आले होते, तिचे व्हॅक्सिनेशन झालेलं नव्हतं.

पण सगळ्यात आधी हा मुद्दा क्लियर करू कि फ्लोरोना हा काही कोरोनाचा नवीन व्हेरियंट नाही. हा एक नवीन व्हायरस आहे. जो एकाच वेळी फ्लू आणि कोरोनामुळे होणार डबल इन्फेक्शन आहे. इस्त्रायलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलमध्ये इन्फ्लूएंझा म्हणजे फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने  वाढ होतेय. आणि म्हणूनच फ्लोरोनावर अभ्यास केला जातोय.

‘फ्लोरोना’मुळे  रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठा ब्रेकडाऊन होतो, कारण दोन व्हायरस एकाच वेळी मानवी शरीरात एन्ट्री करतात. आणि या डबल अटॅकमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते, जे  वेगाने पसरू शकते. अर्थात व्यक्तीच्या इम्युनिटी पॉवरवर परिणाम होणार, ज्यामुळे मृत्यूचे चान्सेस जास्त आहेत.

फ्लोरोनामुळे  रुग्णाला न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास, अवयव निकामी होणे, हृदयविकाराचा झटका, हृदय किंवा मेंदूला सूज येणे, स्ट्रोक असे गंभीर आजार होऊ शकतात आणि  परिस्थिती आणखी क्रिटिकल असेल तर व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

ज्याप्रमाणे कोरोना जवळच्या संपर्कात आलेल्या लोकांमुळे पसरतो. जसं कि, बोलण्यातून शिंकण्यातून, खोकताना त्याचप्रमाणे फ्लोरोनासुद्धा वेगाने पसरतो. जे श्वास घेताना तोंडातून किंवा नाकातून शरीरात पोहोचू शकतात.

आता या नव्या व्हायरससाठी दोन वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागणार आहे.  फ्लूची टेस्ट करण्यासाठी पीसीआर (PCR )चाचणी केली जाते, तर व्हायरससाठी आरएनए (RNA) ची टेस्ट केली जाते. फ्लू आणि कोरोना तपासण्यासाठी स्वतंत्र PCR टेस्ट केल्या जातात. फ्लू आणि कोरोना व्हायरसचे जीनोटाइप वेगळे आहेत. त्यामुळे या दोघांमधला फरक फक्त लॅब टेस्टद्वारे कळू शकतो.

आता सध्या तरी या व्हायरसचा एक पेशंट आहे, आणि तो सुद्धा इस्राईलमध्ये पण जसा कोरोना पसरला तसा हा पसरायला सुद्धा वेळ लागणार नाही, आता भिडू आपलं काम काही घाबरवायचं नाही,पण त्याआधी आपण स्वतः खबरदारी घेतलेली बरी. आणि यावर सध्या तरी लसीशिवाय दूसरा कोणता पर्याय नाही. त्यामुळे आपल्यातल्या कोणी जर अजून लस घेतली नसेल तर वाट बघत बसू नका एवढंच …

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.