रिलीज तोंडावर आला असला, तरी द काश्मीर फाईल्स भोवतीचे वाद काय संपलेले नाहीत

चित्रपट आणि त्यावरून सुरु झालेला वाद हा नेहमीचाच. त्यातसुद्धा चित्रपटाची स्टोरी ही सत्यघटनेवर आधारित असेल तर प्रकरण पार कोर्टापर्यंत जात. कारणं.. प्रत्येकाची वेगवगेळी. आता असाच काहीसा प्रकार ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या बाबतील पाहायला मिळतोय.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांचं पलायन आणि त्यांची हत्या या रियल घटनेवर आधारित आहे. जो येत्या ११ मार्चला रिलीज होणार आहे. पण त्याआधीच द काश्मीर फाईल्स बऱ्याच वादात सापडलाय.

म्हणजे झालं काय गेल्या महिन्यात २१ फेब्रुवारीला विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. जो एकदम सुपरहिट ठरला. नुसत्या ट्रेलरमध्येच त्यावेळी काश्मिरी पंडितांमध्ये पसरलेली दहशत, भीती आणि त्यांची केलेली निर्दयी हत्या हे सगळंच थरकाप उडवणार पाहायला मिळालं. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

आता अग्निहोत्री दाखवणार आहेत तसं काश्मिरी पंडितांसोबत घडलेल्या घटना खरंच भयानक होत्या. थोडं डिटेलमध्ये सांगायचं झालं तर, १८४६ ते १९४७ दरम्यान काश्मिरी पंडित हा काश्मीर खोऱ्यातील मोठा समुदाय होता. पण १९५० दरम्यान वाढत्या अत्याचारामुळे २० टक्के लोकांनी खोरं सोडलं. १९८१ पर्यंत तर काश्मिरी पंडितांची संख्या ऐकून लोकसंख्येच्या फक्त ५ टक्के उरली.

पण त्यांनतर म्हणजे १९९० साली जे झालं त्याचा कदाचित विचार सुद्धा कोणी केला नसेल, इतकं भयंकर चित्र तयार झालं होत.  १९ जानेवारी १९९० ला मशिदींमध्ये घोषणा दिल्या की, ‘काश्मिरी पंडित काफिर आहेत, त्यांना एकतर काश्मीर सोडावं लागेल किंवा त्यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल नाहीतर ते मारले जातील… एवढंच नाही तर यातला पहिला पर्याय ज्यांनी निवडला त्या पुरुषांना आपल्या बायका इथेच सोडाव्या लागतील…’

यांनतर काश्मिरात जे घडलं,भयानक होतं. दिवसाढवळ्या खोऱ्यात रक्ताचे पाट वाहायला लागले. पुरुष असो, महिला असो किंवा लहान मुलं दहशतवाद्यांनी कोणालाच सोडलं नाही. त्यावेळी अनेक आंदोलन झाली, अख्ख्या भारतातून आवाज उठवले गेले, कलम ३७० हटवण्याची मागणी केली गेली. पण त्यावेळी तातडीने कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता, उलट ज्यांनी आवाज उठवला त्यांना सुद्धा मारलं गेलं. त्यांनतर कित्येक वर्ष हा प्रश्न पेंडींगवरच होता.

तेच सत्य आपल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न अग्निहोत्री यांनी केलाय. प्रेक्षकांची या चित्रपटाच्या ट्रेलरला तर जबरदस्त दाद मिळालीये. विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा म्हंटल होत कि,

“प्रेक्षकांनी चित्रपटाकडून काहीही अपेक्षा करू नये कारण तुम्हाला सत्याकडून काय अपेक्षा आहे? हा  चित्रपट वास्तव आहे, चित्रपटाचा प्रत्येक शब्द खरा आहे, प्रत्येक स्टोरी खरी आहे. हा फक्त काश्मिरी पंडितांचा चित्रपट नाही तर तो प्रत्येक भारतीयाचा चित्रपट आहे.”

पण जसा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तस विवेक अग्निहोत्री यांना भारतात चित्रपट रिलीज करू नका अशी धमकी मिळायला सुरुवात झाली. तस तर अग्निहोत्री यांच्या  द काश्मीर फाइल्सची यूएसएमध्ये ३० पेक्षा जास्त वेळा स्क्रीनिंग झालीये, तेव्हा सुद्धा  त्यांना धमकीचे फोन आले होते. पण त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं. पण आता अचानक या धमकीच्या कॉल्स आणि मॅसेजेसचं प्रमाण वाढलयं.

 त्यात सगळ्यात जास्त भारतातून आहेत. ‘भारतात  तुमच्या फिल्मची स्क्रीनिंग थांबवा नाहीतर तुम्हाला जीव गमवावा लागेल. अशा धमक्या अग्निहोत्री यांना मिळत होत्या. या सगळ्या धमक्या आणि मॅसेजेसमुळे  विवेक अग्निहोत्री यांनी स्वतःच ट्विटर अकाउंट डीॲक्टीव्हेट केलं होत. ट्विटर शॅडोने त्यांना बॅन सुद्धा केलेलं.नंतर विवेक यांचं ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु झालं. पण त्यांना येणारे धमकीचे कॉल आणि मेसेज थांबायचं काय नाव घेत नव्हते.

एवढंच नाही उत्तर प्रदेशातील इंतेझार हुसेन सईद नावाच्या एका व्यक्तीन चित्रपटाच्या विरुद्ध जनहित याचिका सुद्धा दाखल केली होती. ज्यात म्हंटल होत कि,

‘या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच मुस्लिम समुदायाला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलंय. यात सगळ्या घटनेबद्दल एकतर्फी भाष्य केले गेलं. चित्रपटामुळे फक्त मुस्लिम समाजच नाही तर हिंदू समाजाच्या सुद्धा भावना भडकवल्या जातायेत. यामुळे भारतात हिंसाचार भडकण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर राजकीय पक्षांकडून सुद्धा या चित्रपटाचा वापर हिंसाचार भडकवण्याचा केला जाईल असं या याचिकेत म्हंटल होत.’

या चित्रपटाच्या वादात बॉलिवूडने सुद्धा एन्ट्री केली. विवेक अग्निहोत्री यांनी आपला एक युट्युब व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी अनुपमा चोप्रा यांच्यावर आरोप केले कि, त्या द काश्मीर फाईल्स फ्लॉप ठरवण्याचा प्रयत्न करतायेत. विवेक यांनी अनुपमा चोप्राला ‘बॉलिवूडची शुर्पणखा’ असा शब्द वापरात म्हंटल कि,  ‘तुमच्यात हिम्मत असेल तर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील वाईट गोष्टी उघडपणे सांगा. पण बॅकग्राउंडला राहून डर्टी गेम खेळू नका.’ 

अनुपमा चोप्रा यांची ओळख सांगायची तर त्या लेखक आणि पत्रकार  विधू विनोद चोप्रा यांच्या यांच्या पत्नी आहेत.  

आता म्हणतात ना, ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ तसाच काहीसा प्रकार झाला. चित्रपटाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरूच होती. तेवढ्यात कपिल शर्मा शोमुळे वादात ठिणगी पडली. म्हणजे झालं काय, एका युजरने ट्विटरवर विवेक अग्निहोत्री यांना टॅग करत म्हणतात कि,

 “विवेक सर, कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणे आवश्यक आहे. त्या युजरने कपिल सुद्धा टॅग करत म्हंटल होत कि, सर तुम्ही सगळ्यांना सहकार्य केलेय. त्यामुळे प्लिज या चित्रपटाचे सुद्धा प्रमोशन करा. आम्हाला मिथुन दा, अनुपम खेर यांना एकत्र बघायचे आहे. धन्यवाद’

या ट्विटवर विवेक अग्निहोत्री यांनी लगेच रिप्लाय देत म्हंटल कि, द कपिल शर्मा शोमध्ये कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही, हा कपिल आणि त्यांच्या निर्मात्यांचा प्रश्न आहे. आणि  जोपर्यंत बॉलीवूडचा संबंध आहे, तर एकदा मिस्टर बच्चन गांधींबद्दल म्हणाले होते. ‘वो राजा हैं हम रंक..

एवढंच नाही तर विवेक यांनी कपिल शर्मा शोमध्ये न जाण्याबद्दल खुलासा सुद्धा केला होता कि, मी सुद्धा कपिल शर्मा शोचा खूप मोठा फॅन आहे. पण खरं म्हणजे या शोमध्ये आम्हाला येण्यापासून नकार दिलाय, कारण आमच्या चित्रपटात कोणता मोठा स्टार नाहीये. बॉलिवूडमधले मोठे सेलिब्रेटी सोडले तर चांगले लेखक आणि अभिनेत्यांना कोणी विचारत नाही.’ 

 

मग काय.. विवेके यांच्या या ट्विटनंतर युजर्सने कपिल शर्माला ट्रोल करायला सुरवात केली. एवढंच नाही कपिल शर्मा देशविरोधी आहे, त्याचा द कपिल शर्मा शो बॉयकॉट करा, अशी मागणी सुद्धा व्हायला लागली आणि प्रकरणाने पेट घेतला.

दरम्यान, चित्रपटाच्या विरुद्ध दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत चित्रपट रिलीज करण्याला ग्रीन सिंग्नल दाखवलाय. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींना  मोठा दिलासा मिळालाय. आणि येत्या ११ मार्च ला हा  चित्रपट भारतात रिलीज होणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.