इंजेक्शन, ब्लेड ने HIV पसरतो हे माहित होतं, मात्र टॅटू काढताना देखील एड्स पसरू शकतो का ?

ओढ्याला करंजाच्या झाडाखाली बापू एकटाच बसायचा. दिवसभर फाटकी गोधडी गुंडाळून बापू त्याला ओढ्याच्या पलीकडं बांधून दिलेली झोपडी आणि करंजाचं झाड एवढ्याच येरझाऱ्या घालायचा. आयुष्यभर माणसाच्या गोतावळ्यात राहिलेला बापूला असं एकटं जीवन जगण्याचा तिटकारा आला होता.  पण तिटकारा आलाय हे सांगायला पण जवळ कोण नव्हतं. आजही आठवतंय ! बेंदराला जेव्हा वस्तीवरनं बापूनं खोंड असल्यापासून सांभाळलेल्या बैलाला सजवून घेऊन जात होते तेव्हा ओढ्याच्या  त्या किनाऱ्यावरून मला बैलाला एकदा भेटु द्या म्हणून अक्षरशः गुरासारखा ओरडत होता तरीही बापूला बैलालासुद्धा भेटून दिलं नव्हतं.

ओढ्याच्या या किनाऱ्याला बापूची वस्ती, घर,दार, सगेसोयरे सगळॆ राहत होते. तर दुसऱ्या तीराला बापूची एकट्याची झोपडी. एक सहा महिन्यपूर्वी बापूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला एवढंच कळलं होतं आणि त्यानंतर त्याला एक वेगळी झोपडी बांधून देण्यात आली होती एवढंच सुरवातीला कळलं. नंतर ऐकायला आलं की बापू HIV पॉझिटिव्ह होता आणि त्याला एड्स झाला होता.

गावातली बापूची पहिलीच केस होती त्यामुळं बापूला असं वाळीत टाकलं होतं. गावातला मास्तर सगळ्यांना ओरडून सांगता होता एकत्र राहिल्याने एड्स पसरत नाही. पण गावकऱ्यांनी मास्तरचीच बदली करून टाकली . शेवटी बापू खंगून खंगून मेला. सुरवातीला बापूला नको नको ती नावं ठेवण्यात आली. मात्र नंतर तालुक्याच्या ठिकाणच्या एका भामट्या डॉक्टरनं एकंच सुई वापरल्याने बापूसारखाच १०-१२ जणांना एड्स झाल्याची गोष्ट समोर आली तेव्हा अख्खा गाव खजील झाला होता.

आज एड्सबद्दल बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. कंडोमच्या वापरापासून डॉक्टरकडे गेल्यावर प्रत्येकवेळी सिरिंज बदलायला लावणे, सलोनमध्ये गेल्यावर नवीन ब्लेड लावलं आहे कि नाही हे पाहणं हे तुम्ही आम्ही करतंच असतो.

मात्र यातच एक खळबळ उडवानरी बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये टॅटू काढल्यानंतर लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

ज्यामुळे अधिकाऱ्यांकडून स्वस्त टॅटू पार्लरबद्दल चेतावणी देण्यात आली आहे.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार आजारी पडलेल्यामध्ये  १४ जणांचा समावेश आहे. त्यांच्या सुरवातीला  टायफॉइड मलेरियासह अनेक चाचण्या घेण्यात आल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

तपशिलांची तपासणी केल्यावर असे आढळून आले की एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाही रुग्णाला हा आजार लैंगिक किंवा संक्रमित रक्ताद्वारे झाला नाही. सर्व रुग्णांमध्ये एक गोष्ट सामान्य होती ती म्हणजे त्यांनी नुकतेच टॅटू बनवले होते.

ताप उतरला नाही तेव्हा एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या ज्यात सर्व आजारी रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकंच खळबळ उडाली आहे. टॅटू बनवताना सिरींजेसचा वापर होत असल्याने अशी शक्यता असल्याचं सांगितलं जातं मात्र त्यावेळी टॅटूमुळे एचआयव्ही पसरल्याची याआधी उदाहरणं समोर आली नव्हती.

त्यामुळे इंजेक्शनच्या सुयांमुळे एड्स कसा पसरतो हे आधी बघू.

एचआयव्ही-निगेटिव्ह व्यक्तीने एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीने वापरलेली इंजेक्शन उपकरणे वापरल्यास एचआयव्ही होण्याचा किंवा प्रसारित होण्याचा धोका खूप जास्त असतो. याचे कारण असे की सुया, सिरिंज किंवा इतर इंजेक्शन उपकरणांमध्ये रक्त असू शकते आणि रक्त एचआयव्ही वाहून नेऊ शकते. तापमान आणि इतर घटकांवर अवलंबून एचआयव्ही वापरलेल्या सिरिंजमध्ये ४२ दिवसांपर्यंत जगू शकतो असं ही cdc ची वेबसाइट सांगते.

त्यामुळॆ याबाबत माहिती घेण्यासाठी बोल भिडूने इंडियन मेडिकल असोशिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी यासंबंधीची इत्यंभूत माहिती दिली ती अशी.

” एचआयव्हीचा व्हायरस एकतर दोन प्रकारे पसरतो. एक म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध आणि दुसरं म्हणजे रक्त किंवा शरीरातील द्रावातून पसरतो.

यामध्ये इंजेक्शनची सुई एकाद्या एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णामध्ये वापरून ती दुसऱ्या सामान्य रुग्णामध्ये वापरली तरी एचआयव्ही पसरण्याचा धोका असतो. 

त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून असा प्रसार टाळण्यासाठी डिस्पोझेबल सुया वापरल्या जातात. सर्व आरोग्य विषयक ठिकाणी हा नियम लागू आहे. 

टॅटू करतानाही सुई अनेकदा शरीरात टोचली जाते आणि मग एक डिझाइन बनतं. इथंही एकदा वापर झालेली सुई फेकायची असते आणि दुसरी सुई वापरायची असते. 

जर ही टॅटूची सुई नं फेकता लगेचच दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरली तर पहिल्या व्यक्तीला एचआयव्ही असेल तर तो दुसऱ्या व्यक्तीला देखील होऊ शकतो.”

मग आम्ही डॉक्टरांना विचारलं टॅटू शॉप्सला जशा दवाखाने, हॉस्पिटल्स यांना गाइडलाइन्स असतात का?

त्यावर डॉक्टर म्हणाले टॅटूचा व्यवसाय आहे तो मेडिकलचा नाहीये तर एक आर्ट फॉर्म आहे. त्याला कुठलाच कंट्रोल नाहीये. जसा सलूनवर सरकारचा कंट्रोल आहे तसा टॅटूशॉपला पण असला पाहिजे. जे नावाजलेले टॅटू शॉप्स आहेत तिथे सुया प्रत्येकवेळी बदलल्या जातात. 

अजून एक म्हणजे बायोमेडिकल वेस्ट नियम. बायोमेडिकल वेस्ट नियमांतर्गत वापरण्यात आलेल्या सुयांची विल्हेवाट लावणे कंपलसरी करण्यात आलं आहे. मात्र असा कोणताही 

 टॅटू काढायला गेल्यांनतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबाबद्दल डॉक्टरांना विचारला?

तर टॅटू काढायला गेल्यावर सुई बदलली जात आज का हे पाहणेच सगळ्यात बेस्ट उपाय असल्याचं डॉक्टर सांगतात. तर टॅटूवाल्यांनीही प्रत्येकवेळी सुई बदलली पाहिजे असं आवाहन डॉक्टर करतात.

त्यामुळे हे उपाय फॉलो करा पुन्हा जेव्हा टॅटू बनवायला जाल तेव्हा आठवणी घेऊन या रोग नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.