दिल्लीत सगळ्यात मोठा बॉम्बहल्ला होणार होता. एका बेरोजगाराने टेरर कोड डिकोड केला…..

इंडिया गेट हे दिल्लीची आणि भारताची शान म्हणून ओळखलं जातं. २००३ च्या अगोदर इंडिया गेटला जास्त सुरक्षा नव्हती. लोक आरामशीर तिथून येत जात असे. २३ जानेवारी २००३ साली एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्यात जबरदस्त सैनिकी फौज इंडिया गेटवर तैनात करण्यात आली होती. ती घटना काय होती जाणून घेऊया.

काश्मीरमध्ये २००२ साली एक आतंकवादी मारला गेला होता, त्याच्या डायरीच्या आधारावर दिल्ली पोलीसचं स्पेशल सेल एका ईमेल आयडीची ओळख पटवू पाहत होतं. या ईमेल आयडीवर अनेक मेसेज येत होते आणि इकडून ते पाठवले सुद्धा जात होते. या ईमेलवरून काहीच समजत नव्हतं कारण दिल्लीच्या विविध कॅफेंमधून हे मेल पाठ्वणीचा प्रकार सुरु होता. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ पाहत होते आणि हे मिशन लीड करत होते एसीपी प्रमोद कुशवाहा. 

१३ फेब्रुवारी २००३ रोजी नेहा नावाने बनवलेल्या एका ईमेल आयडीवर एक मेसेज आला ज्याने दिल्ली पोलिसांना चकित केलं. या मेसेजमध्ये फुटबॉल आणि मॅचचा उल्लेख केलेला होता.

पोलिसांना हे समजायला जास्त वेळ लागला नाही कि इथं बॉम्बचा विषय सुरु आहे. खूप मोठा आतंकवादी हल्ला होणार होता पण कुठे आणि कधी होईल यांची कोणालाही कल्पना नव्हती.

१८ फेब्रुवारीला अजून एक मेसेज एका ईमेल आयडीवरून दुसऱ्या ईमेल आयडीवर आला ज्यात एक कोड पाठवलेला होता. एसीपी प्रमोद कुशवाहा यांची टीम तो कोड डिकोड करू लागली. स्पेशल सेल दिवसरात्र त्या कोडला डिकोड करण्याच्या कामात व्यस्त होती आणि काहीही करून  तो कोड डिकोड करणं गरजेचं बनलेलं होतं कारण कधीही बॉम्ब फुटणार होते. पण पोलिसांना काय यश आलं नाही.

अनेक कोड क्रॅक करणाऱ्या लोकांना हा कोड डिकोड करण्यासाठी पाठवला पण कोणालाच यश आलं नाही. एसीपी कुशवाहा परेशान झालेले होते. १९ फेब्रुवारीला एसीपी कुशवाहा यांना भेटायला एक त्यांचा शाळेतला मित्र भेटायला आला जो बेरोजगार होता. विवेक ठाकूर त्याच नाव.

प्रमोद कुशवाहा अगोदरच खूप त्रस्त झालेले होते त्यांनी त्या वैतागाच्या भरात आपली अडचण विवेकला सांगितली कि आम्ही असा असा कोड डिकोड करायचा प्रयत्न करत आहोत पण कोणालाच तो डिकोड करता येत नाहीए.

मग विवेक ठाकूरने स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आणि बरीच प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने केली आणि तो कोड डिकोड केला. त्या कोडमध्ये लिहिलेलं होतं कि इंडीया गेटवर आतंकी हल्ला होणार आहे तेही २५ फेब्रुवारी २००३ ला.

जेव्हा कोडला ग्राह्य धरून नक्की झालं कि आपण डिकोड केलेल्या कोडचा अंदाज सही आहे तेव्हाच कुशवाहा यांनी गृहमंत्रालयाला याची माहिती दिली.

२२ फेब्रुवारीला रात्री तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी एक आपत्कालीन बैठक घेण्यात आली. यात पोलीस अधिकारी नीरज शर्मानी सगळा प्लॅन केला. सगळी माहिती काढण्यात आली. सगळ्या स्पेशल फोर्सला सूचना देण्यात आल्या. सगळं सज्ज झालं आणि दुसऱ्या दिवशी लोकांना इंडिया गेटवर कधीच न पाहिलेला नजारा लोकांना पाहायला मिळाला. नीरज कुमारांनी सगळी फोर्स इंडिया गेटवर तैनात केली आणि दहशतवाद्यांचा प्लॅन उधळून लावला.

२३ फेब्रुवारी २००३ ला सकाळी सकाळी इंडिया गेटच्या बाहेर मोठ्या प्रमाणात फौज तैनात करण्यात आली. सेनेचे टॅंक सुद्धा तिथं लावण्यात आले. यानंतर तिथं लोकांना फिरकण्यास मनाई केली. पोलीस अधिकारी नीरज कुमार यांनी हि घटना खाकी फाईल्स ; इन्साईड स्टोरी ऑफ पोलीस इन्वेस्टीगेशन. 

नंतर मात्र या प्रकरणाचा उलगडा झाला या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड होता लष्कर ए तोयबाचा कमांडर जकीउर रहमान लख्वी. या प्रकरणाला पुढे द लख्वी डिकोड नाव देण्यात आलं. एसीपी प्रमोद कुशवाहा यांनी आपल्या बेरोजगार मित्राला हाताशी धरून एक मोठी घटना घडण्यापासून टाळलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.