“#@# का सरकार” ..म्हणणारे आमदार घरात AK47, हातबॉम्ब ठेवल्याबद्दल दोषी..

दुनिया मीम्सची आहे, व्हायरल माणसांची आहे.. काही माणसं आयुष्यात कितीही कांड करोत पण लक्षात कशासाठी राहतात तर त्या एकाच स्पेसिफीक गोष्टीसाठी… 

म्हणजे पुण्याच्या एकदा गजलरंग कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. तिथे एकजण दूसऱ्याला म्हणाला होता, “मर..जा” म्हणजे आत्ता मेलास तरी चालेल. कारण जे करायचं होतं ते करुन टाकलस.. 

थोडक्यात सांगायचं काय आहे तर एखाद काम, एखादी गोष्ट तुमच्या नावाला अशी जोडली जाते की बाकीचं काहीच गरजेचं नसतं.. 

तसेच आपले छोटे सरकार अनंत सिंग. आमदार अनंत सिंग. आत्ता यांच्याबद्दल काय बोलणार.. 

याचा फोटो आणि छोटासा व्हिडीओ सारखा व्हायरल होत असतो. तो त्यांनी दिलेल्या उत्तरामुळं. एकदा त्यांना पत्रकारांने विचारलं… सुशासन की सरकार हैं.. 

त्यावर त्यांच उत्तर होतं… #@डा का सरकार.. 

बघता बघता मीम्स व्हायरल झाले जे अजून वापरले जातात. 

पण मुळ मुद्दा आहे ते हे आमदार कोण आहेत.. 

तर हे आहेत अनंत सिंह. बिहारचे बाहुबली विधायक अनंत सिंह. बिहारच्या मोकामा येथून ते आमदार आहेत. बिहारमध्ये त्यांना छोटे सरकार नावानं ओळखलं जातं. सध्या त्यांचा पक्ष आहे RJD. पण यापूर्वी ते नितिश कुमारांच्या JDU मधून देखील आमदार होते. दोनदा JDU, एकदा अपक्ष आणि दोनदा RJD कडून ते आमदार राहिलेले आहेत. 

याहून विशेष गोष्ट म्हणजे UAPA कायद्यानुसार त्यांच्यावर यापूर्वी कारवाई देखील करण्यात आलेली आहे. आजवर टोटल ३४ केसेस त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या आहेत. 

त्यांच्यासंबंधातली विशेष बातमी म्हणजे त्यांना आज कोर्टाने दोषी जाहीर केलय. कशाबद्दल तर घरामध्ये AK47, हातबॉम्ब ठेवल्याबद्दल.. 

संपूर्ण प्रकरण काय आहे.. 

ऑगस्ट 2019 साली IPS लिपी सिंह बाढ हे तेव्हा जिल्हापोलीस प्रमुख होते. त्यांना टिप मिळालेली की अनंत सिंह यांच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्र आहेत. लिपी सिंह आपल्या टिमला घेवून पहाटे 4 वाजता अनंत सिंह यांच्या घरात घुसले. सुमारे 11 तास सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. 

या छापेमारीत साहेबांच्या घरातून AK47 आणि हातबॉम्ब मिळाले. सोबत जिवंत काडतुसे देखील होती. पोलीसांनी घरात असणाऱ्या केअर टेकरला अटक केली पण अनंत सिंह आमदार असून फरार झाले. 

त्यानंतर मोठ्या फौजफाट्यासहीत शोधमोहिम राबवण्यात आली. पण अनंत सिंग काय सापडत नव्हते. या दरम्यान सोशल मिडीयावर अशाच मुलाखती देणारे त्यांचे व्हिडीओ मात्र यायचे. त्यानंतर काही दिवसात अनंत सिंह दिल्लीच्या साकेत कोर्टात हजर झाले. कोर्टासमोरच त्यांनी स्वत:ला सरेंडर केलं. त्यानंतर बिहारमधून खुद्द SP साहेब त्यांना घेण्यासाठी आली. रितसर प्रक्रिया पुर्ण करुन अनंत सिंग यांना बिहारला धेवून जाण्यात आलं. कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना 24 ऑगस्ट 2019 साली जेल झाली. ते अजूनही जेलच आहे.. 

आत्ता याच प्रकरणात कोर्टाने त्यांना दोषी जाहीर केलय. काय शिक्षा होणार ते काही दिवसात कळेलच.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.