‘द काश्मीर फाईल्स’मध्ये असं काय आहे कि, विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळतेय

२०१९ सालचा ‘द ताशकेंट फाईल’ हा चित्रपट पाहिलाय? पहिला नसेल तर एकदा जरूर बघा. विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटात भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूची स्टोरी दाखवली गेलीये. जी आजही एक मिस्ट्री आहे. अख्खा पिक्चर हा अंगावर काटा आणण्यासारखा आहे. या पिक्चरच्या सुपरहिट यशानंतर आता विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल’ हा पिक्चर येतोय.

कश्मीरी पंडितांचं हत्याकांड या रियल घटनेवर आधारित हा पिक्चर येत्या ११ मार्च २०२२ ला हा भारतात रिलीज होणार आहे. पिक्चरचा ट्रेलर तर जबरदस्त आहे. त्यावेळी काश्मिरी पंडितांमध्ये पसरलेली दहशत आणि भीती प्रेक्षकांचा सुद्धा थरकाप उडवणारी आहे. ‘द काश्मीर फाईल’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार आहे. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले कि,, 

“प्रेक्षकांनी चित्रपटाकडून काहीही अपेक्षा करू नये कारण तुम्हाला सत्याकडून काय अपेक्षा आहे? हा  चित्रपट वास्तव आहे, चित्रपटाचा प्रत्येक शब्द खरा आहे, प्रत्येक कथा खरी आहे. हा चित्रपट चैतन्य जागृत करणारा आहे, हा केवळ काश्मिरी पंडितांचा चित्रपट नाही तर तो प्रत्येक भारतीयाचा चित्रपट आहे.”

पण सध्या विवेक अग्निहोती यांना ‘द काश्मीर फाईल’ भारतात रिलीज होण्यापासून रोखण्यासाठी धमकी मिळतीये. तसं तर, विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ यूएसएमध्ये ३० पेक्षा जास्त वेळा रिलीज करण्यात आलाय. विवेक अग्निहोत्री यांना अमेरिकेत सुद्धा फिल्मची स्क्रीनिंग थांबवण्यासाठी धमकीचे फोन आले होते, ज्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण आता अचानक या धमकीच्या कॉल्स आणि मेसेजचे प्रमाण वाढलयं. त्यातले भारतातले जास्त आहेत, ज्यात म्हटलंय कि,  भारतात  तुमच्या फिल्मची स्क्रीनिंग थांबवा नाहीतर तुमचा जीव गमवावा लागेल.

आता अग्निहोत्री दाखवतायेत त्यानुसार काश्मिरी पंडितांसोबत झालेला नरसंहार खरंच भयानक होता.  १८४६ ते १९४७ दरम्यान काश्मिरी पंडित हा खोऱ्यातील मोठा समुदाय होता. पण १९५० दरम्यान वाढत्या अत्याचारामुळे २० टक्के लोकांनी खोरं सोडलं. १९८१ पर्यंत तर काश्मिरी पंडितांची संख्या ऐकून लोकसंख्येच्या फक्त ५ टक्के उरली. 

पण १९९० चा नरसंहार भयंकर होता. १९ जानेवारी १९९० ला मशिदींमध्ये घोषणा दिल्या कि, काश्मिरी पंडित काफिर आहेत, त्यांना एकतर काश्मीर सोडावं लागेल किंवा त्यांना इस्लाम स्वीकारावा लागेल नाहीतर ते मारले जातील. एवढंच नाही तर यातला पहिला पर्याय ज्यांनी निवडला त्या पुरुषांना आपल्या बायका इथेच सोडाव्या लागतील. यांनतर काश्मिरात जे घडलं, ते विचार करण्याच्या पलीकडे होतं.

 दिवसाढवळ्या खोऱ्यात रक्ताचे पाट वाहायला मागले. पुरुष असो, महिला असो किंवा लहान मुलं दहशतवाद्यांनी कोणालाच सोडलं नाही. त्यावेळी अनेक आंदोलन झाली, भारतभरातून आवाज उठवले गेले, कलम ३७० हटवण्याची मागणी केली गेली. पण त्यावेळी तातडीने कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. 

 दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाच्या स्क्रीनिंगवरून येणाऱ्या  धमकीच्या फोन आणि मेसेजमुळे त्यांचे ट्विटर अकाउंट डीॲक्टीव्हेट केलं होत. ट्विटर शॅडोने त्यांना बॅन केलं होत.

 

आता विवेक यांचं ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु झालंय. पण त्यांना येणारे धमकीचे कॉल आणि मेसेज थांबायचं काय नाव घेत नाहीये. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाचा हा वाद आणखी पेट घेणार हे फिक्स ….

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.