योग्य उपाययोजना केली नाही तर आफ्रिकेतले काही देश पुढच्या वर्षापर्यंत पूर्णपणे नष्ट होणार…

पृथ्वीवर ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, अंटार्टिका, आशिया आणि आफ्रिका असे एकूण ७ खंड आहेत. या ७ खंडात जवळपास १९५ देश आणि या देशांचे आपले रोजचे वेगवेगळे प्रश्न. कोणाचे अंतर्गत वाद, कोणचे राजकीय तर कोणाचे सीमेवरून पण यात आफ्रिका खंडातल्या काही देशांचं वेगळंच दुखणं आहे. जे आता पार त्यांच्या गळ्याशी येऊन पोहोचलंय. 

 सर्वात जास्त फटका तर पूर्व आफ्रिकेवर आहे. जिथे उपासमार, नरसंहार, दुष्काळ अशी अनेक संकट एकदाच येऊन पोहोचली. शेताच्या जमिनीला भगदाडं पडलीत, पिकं पिवळी पडलीत. वातावरण म्हणालं तर पार भकास. ज्यामुळे जवळपास सुमारे अडीच कोटी लोकांवर मृत्यूची टांगती तलवार आहे आणि माणूसचं नाही तर या दुष्काळामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झालायं. 

आता आफ्रिकेतल्या या परिस्थितीला मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग त्यातल्या त्यात  गृहयुद्ध, सत्तापालट ज्यामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलंय. आफ्रिकेतल्या केनिया, सोमालिया, जिबूती, इथिओपिया, मादागास्कर यासारख्या देशांमध्ये हे रोजचं चित्र बनलयं. हे देश दहा वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत असल्याचं बोललं जातंय.

याआधी २०११ मध्ये यापेक्षा वाईट परिस्थिती होती. त्या काळात दुष्काळामुळे सुमारे २ लाख ६० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. आता २०२१  हे वर्ष सुद्धा पूर्व आफ्रिकेतल्या देशांसाठी मोठं आव्हान घेऊन आलंय. 

या संदर्भात नुकताच शास्त्रज्ञांनी एक नवीन अहवाल सादर केला. त्यात ते म्हणाले की, दुष्काळ ही संपूर्ण नैसर्गिक आपत्ती आहे. पण आफ्रिकेतल्या या परिस्थितीला फक्त हवामान बदलाला दोष देऊन फायदा नाही. त्यांच्यामते इथले स्थानिक सरकार सुद्धा याला तितकेच जबाबदार आहेत. समस्या सोडवणे ही त्यांची पहिली जबाबदारी आहे, पण वेळोवेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेलेय.

इथिओपियामध्ये गृहयुद्धाची परिस्थिती आहे. गेल्या एक वर्षापासून टायग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) आणि केंद्राच्या लष्करामध्ये युद्ध सुरू आहे. हजारो लोक पळून गेलेत. सुदानमध्ये गेल्या वर्षभरात दोन सत्तापालट झाले. सोमालियात सुद्धा थोडीफार अशीच परिस्थिती आहे.

पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडतोय. त्यात, कोरोना तर आहेच. आफ्रिकन खंडात लसीकरणाचा दर पार कमी आहे. ज्या प्रकारे कोरोनाचे नवीन व्हेरीयंट समोर येत आहेत, त्यामुळे श्रीमंत देशांनीही हात वर केलेत. त्यात आणि आफ्रिकेतल्या देशांची फक्त कल्पनाच करता येईल.

महत्वाच म्हणजे तज्ञांच्या म्हणण्यानुसार, २०२२ पर्यंत ही परिस्थिती आणखी बिघडू शकते. कारण या काही देशांमधलं मोठ्या प्रमाणावर होणार स्थलांतर यामुळे देशाच्या देश रिकामी झाली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही शहरचं नष्ट होऊ शकतात असं बोललं जातंय. आणि तोपर्यंत पाऊस पडला नाही किंवा बाहेरून कोणती मदत पोहोचली नाही, तर विनाश निश्चित मानला जात आहे.

आता पूर्व आफ्रिकेतल्या या परिस्थितीवर उपाय कोणते करता येतील तर तज्ज्ञांच्या मते, भटक्या जमाती आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्यास ते स्वत:ला आणि आपल्या जनावरांना जिवंत ठेवू शकतील. कमी पाण्यातही वाढू शकणाऱ्या बियांचं शेतकऱ्यांमध्ये वाटप केलं पाहिजे. प्राण्यांच्या उपचारासाठी मोहीम राबवण्याचा सल्लाही सामाजिक कार्यकर्ते देतात. याशिवाय शुद्ध पाण्याचा पुरवठाही वाढवण्याची गरज आहे.

पण तज्ज्ञांनी असं सुद्धा म्हंटलयं कि,  हे उपाय काही पूर्ण समस्या सोडवणार नाहीत, यांनी फक्त थोडा आराम मिळू शकेल. पण यासाठी दीर्घकालीन उपाय गरजेचे आहेत. ज्यासाठी तिथल्या सरकारांनीच पुढाकार घेणं महत्वाचं आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.