अफगाणिस्तानचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अजित डोवाल ७ देशांसोबत मिटिंग करतायत

अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती जगापासून लपून नाही. तालिबानने बंदुकीच्या धाकेवर इथला एक- एक प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि सत्ता स्थापन केली. हे सगळं चित्र इथलं सरकारसुद्धा हतबल होऊन पाहत राहील. दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही म्ह्णून मोठमोठ्या अधिकारी आणि मंत्र्यांसोबत सामान्य जनतेनेही देश सोडून दुसरीकडे पळ काढला.  त्यानंतर अफगाणिस्तानचा सगळा चेहरा- मोहराचं बदलला आहे.

आता हे सगळ अफगाणिस्तानातल्या जनतेला तर सहन करावा लागतचं आहे. पण याचा निगेटिव्ह परिणाम बाकीच्या देशांवर सुद्धा व्हायला लागलाय. म्हणजे तालिबान आपली ताकद वाढलीये या फ़ुगूरीने बाकीच्या देशांना लक्ष्य करण्याच्या प्लॅन आखतंय. यासाठी त्याने सीमेलगतच्या देशांमधल्या दहशतवादी संघटनांची देशील मदत घ्यायला सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे बाकीच्या देशातल्या विरोधी संघटना, कट्टरपंथीय देखील तालिबानचा आदर्श घेत हिंसा भडकवण्याची तयारी करतंय. याचं परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भविष्यातील धोकादायक संकेनावर ताबा मिळवण्यासाठी आता भारत मैदानात उतरलंय.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अफगाणिस्तानमधील प्रादेशिक सुरक्षेबाबत एक आंतराष्ट्रीय स्तरावरची बैठक घेतली. ज्यात इराण, कझाकस्तान, किरगिझ प्रजासत्ताक, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या ७ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी  (NSA) उपस्थिती लावली.  

याआधी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते की, बैठकीत अफगाणिस्तानमधील ताज्या परिस्थितीवरून आपल्या देशाच्या प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली जाईल. याशिवाय सामायिक सुरक्षा धोरण बनवण्यावरही चर्चा होणार आहे.

यासोबतच दहशतवाद, कट्टरता, सीमेपलिकडच्या हालचाली, अंमली पदार्थांचे उत्पादन आणि तस्करी आणि अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी मागे सोडलेली शस्त्रे आणि उपकरणे यासह अफगाणिस्तानमधील तालिबानसमोरील आव्हानांना तोंड देण्याबाबतही या बैठकीत विस्तृत चर्चा केली गेल्याचे समजते.

या बैठकीत बोलताना NSA अजित डोवाल म्हणाले- 

“आम्ही सर्वजण आज अफगाणिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर बोलण्यासाठी एकत्र आलो आहोत. अफगाणिस्तानात काय चालले आहे याकडे आपण सर्वजण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. हे केवळ अफगाणिस्तानच्या लोकांसाठीच नाही तर त्याच्या शेजारील देशांवर आणि प्रदेशासाठी देखील महत्त्वाचे आहे.

ते पुढे म्हणाले, “मला विश्वास आहे की आमची चर्चा प्रॉडक्टिव्ह आणि उपयोगी ठरेल. अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करण्यात आणि आमची सामूहिक सुरक्षा वाढवण्यात योगदान देईल. ही आपल्या दरम्यान जवळून सल्लामसलत करण्याची, अधिक सहकार्याची आणि प्रादेशिक देशांमधील संवादाची वेळ आहे.”

आता महत्वाचं म्हणजे या बैठकीसाठी चीन आणि पाकिस्तानला सुद्धा निमंत्रण पाठवलं गेलं होत.पण पाकिस्तान ने थेट नकार दिला तर त्या पाठोपाठ चीनने सुद्धा काढता पाय घेतला. पण, चीनने अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताशी सहकार्य आणि संवाद सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं. आणि तसही  या बैठकीत पाकिस्तानचे नापाक मनसुबे उद्ध्वस्त करण्यावर भर असणार असल्याचं बोललं जातंय.

यापूर्वी इराणने अशा बैठका घेतल्या आहेत. तेहरानने २०१८ आणि २०१९ मध्ये सादर केलेल्या स्वरूपाचा हा विस्तार आहे. मात्र, यावेळी या चर्चेत सर्वाधिक सात देश सहभागी झाल्याने निश्चितच मोठा निर्णय होणार आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.