कु डाऊनलोड करुन तुम्ही चु होवू शकता…? 

मध्यतंरी सोशल मिडीयावर बुलेट थाळी गाजली. मॅटर काय आहे स्पर्धा लय वाढल्या. कायना काय गेमा करुन प्रसिद्ध झालं पाहीजे हे अगदी देशाच्या पंतप्रधानांपासून ते तळागाळातल्या व्यावसायिकांपर्यन्त सगळ्यांना रितसर समजलय. 

आत्ता आपल्या आतडीचं साईज आणि थाळीचा साईज याचा काहीही ताळमेळ न लावता उगीच चार एक हजारची थाळी तयार करायची ह्याला काय लॉजिक आहे सांगा. बर माणसं आत्ता क्वालिटी न बघता कॉन्टिटी बघायला लागल्यात ही दूसरी बोंब. मग बुलेट थाळी, सरपंच थाळी, आमदार थाळी, आयस्क्रिम थाळी सारखे प्रकार यायला लागले. पटणार नाय पण मार्केटच्या बोंबाबोंबमुळं लोकांनी चहा आणि लसणाच्या प्लेवरमध्ये कंडोम पण काढल्यात.

ही सगळी लांबड सांगण्याचा मुद्दा एकच की पैसा महत्वाचा आहे आणि त्यासाठी आयड्या महत्वाच्या आहेत. तुम्ही आत्मनिर्भर भारताचे नागरिक असा किंवा तुकडे तुकडे गॅंगचे आजीवन सदस्य असा हे मार्केट आपला पैसा रितसर छापणार. 

“कु” ॲपला या दोन्ही चष्म्यातून पहाण्याऐवजी सरळ साधं पैशाच्या चष्म्यातून पहायला हवं म्हणून वरती एवढा फाफट पसारा लिहलाय.

तर हे कु ॲप काय आहे ? 

कु ॲप म्हणजे गावठी ट्विटर. आत्ता गावठीचा पण वेगळा बाजार आहे. म्हणजे या शब्दावर कोंबडीपासून ते पिक्चरपर्यन्त सगळं चाललं. देशी आहे म्हणजे आपलं आहे. कु ॲपची प्राथमिक ओळख हीच सांगून बाजारात उतरवण्यात आलं. ट्विटर सारखच यावर ट्विट म्हणजे कु करू शकता. रिट्विट म्हणजे रिकु करु शकता, ४०० शब्दांची लिमीट आहे वगैरे वगैरे. 

पण वेगळेपणाचा मुद्दा आहे तो भाषेचा.

इथे स्थानिक भाषा आहे. हे मराठीत वापरता येतं. तुम्ही मराठीत सेटिंग्स ठेवू शकता. ॲपच्या निर्मात्यांनी कोकणी भाषेत देखील लवकर ॲप येईल हे सांगितलय. थोडक्यात सेम ट्विटर पण स्थानिक भाषेत हेच वेगळेपण. बाकी कलरमध्ये काय तो फरक. 

कु ॲपचे निर्माते आहे अप्रेम राधाकृष्णन आणि मयंक बिदावत. ही जोडगोळी टॅक्सी फॉर श्युअर, रेड बस अशा ॲपचे निर्माते म्हणून ओळखले जातात. म्हणजे याचे फाऊंडर भारतीय आहेत. साहजिक हे आत्मनिर्भर ॲप आहे. ट्विटरपेक्षा करुन करुन वेगळं काय करणार म्हणून हे विकण्याचा मेन फॉर्म्युला आहे तो म्हणजे “आत्मनिर्भरचा” नारा. 

देशी ट्विटरचं राजकारण नेमकं काय आहे व ते का खेळलं जातय..? 

यासाठीच पहिलं उदाहरण दिलेलं ते थाळीचं. जाहीरात करायला काहीतरी युनिक मुद्दा पाहीजे. नुसती थाळी विकून चालत नाही बुलेट थाळी विकायला लागती. मग मिडीयावाले आपोआप बातमी लावतात. सोशल मिडायात आपोआप व्हायरल होतं. काही दिवस थाळी खपते. तितक्याच दिवसात पैसे छापले जातात आणि मग सगळं शांत. 

तसच कु ॲपच गणित आहे. मार्च २०२० मध्ये तयार करण्यात आलेलं हे ॲप चर्चेत कधी आलं तर आत्मनिर्भर कॉम्पिटिशनमध्ये नंबर मिळाल्यानंतर. तेव्हा म्हणजे ३० लाख वेळा हे ॲप डाऊनलोड करण्यात आलं. 

पण खरा बाजार सुरू झाला तो ट्विटर विरुद्ध मोदी सरकारच्या लढाईनंतर… 

झालं अस की, २६ जानेवारीला जो काही राडा दिल्लीत झाला त्यानंतर केंद्र सरकारने ट्विटरला २५०० च्या दरम्यान अकाऊंट बंद करायला सांगितले. ट्विटरने काही काळासाठी यांना ट्विट करण्यापासून बॅन केलं पण नंतर लगेच सुरू केलं. 

ही अकाऊंट किसान आंदोलन, कारवान सारखं मॅक्झिन यांची होती. ट्विटरने साहजिक केंद्र सरकारला कोल्लं. यावर केंद्र सरकार चिडलं आणि म्हणालं, आमचा आदेश आहे तो तुम्ही मान्य करायला पाहीजे. आम्ही काय बॅन करता का म्हणून सांगत नाही तर बॅन करायला सांगतोय. अस केलं नाही तर तुमच्या लोकांना ७ वर्षांपर्यन्त जेल होवू शकते. 

या सगळ्या राड्यात इगो दुखावला. कंपनीच्या इंडिया पॉलिसी हेड महिमा कौल यांनी राजीनामा दिला. अशा मोक्याच्या क्षणी ट्विटरवर मोठमोठे मंत्री कु जॉईन करु लागले. पियुष गोयल, स्मृती इराणी, रवीशंकर प्रसाद, शिवराजसिंग चौहान, इजिटल इंडिया, डिजीलॉकर, अनिक कुंबळे अशा मोठमोठ्या लोकांची अकाऊंट कू वर आली.

थोडक्यात सरकारने कु ला पाठींबा दिल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. 

याच सरळ लॉजिक काय तर सोशल मिडीया कंट्रोलमध्ये ठेवणं. आपल्या कंट्रोलमध्ये नसला रहात तर आपला स्वत:चा सोशल मिडीया करणं. इथे मनु जिवंत असता तर धन्य पावला असता. 

कु चं चायनिझ कनेक्शन काय आहे..? 

आत्ता कसं वाटतय, गार गार वाटतय. कु चं चायनिझ कनेक्शन देखील समोर आलय. एका हॅकरने सांगितलं की यामध्ये चायनिझ कंपनी शुनवईचे शेअर्स आहेत. झाली का बोंब म्हणजे बुलेट थाळी ही बुलेट थाळी नसून लुनाथाळी आहे समजण्याचा हा प्रकार. 

यावर कंपनीचे प्रमुख प्रमेय (सगळीकडे नाव वेगवेगळं झालय, कु चं सगळं शोधलं पण हे नाव दरवेळी गोंधळात टाकणारं ठरलं) राधाकृष्णन CNBC ला म्हणालेत, 

यापूर्वी आमची वोकल म्हणून कंपनी होती. २०१८ साली सिंगल डिजीट म्हणजे जास्तीत जास्त ९ टक्के शेअर्स शुनवईकडे होते. पण आत्ता शुनवईने माघार घेतली आहे. हा हिस्सा भारतीयांसाठी खुला आहे. 

कु सेफ आहे काय ? 

याबद्दल फ्रान्सच्या एका हॅकरने एक ट्विट केलय. यात त्याने कु अर्ध्या तासात डिकोड केल्याचा दावा करुन कु बेसिक माहिती चोरत असल्याचा दावा केलाय तर कंपनीने सांगितलय की पब्लिक डोमेनमध्ये इतर लोकांना लागती तिच माहिती इथे आहे. या हॅकरने फक्त शहाणपणाचा आव आणलाय. आमच्याकडे सगळा डेटा सेफ तर आहेच पण कंपनीचा सर्व्हर इंडियात आहे. टेन्शन नॉट. 

कु ला ट्विटरचा आधार..? 

यामध्ये एक गंम्मत आहे. म्हणजे मध्यंतरी सिग्नल आल्यावर त्याची जाहीरात लोक वॉट्सएपवर करत होते तशी कु ची जाहीरात ट्विटरवर करण्यात येत आहे. बर यात स्वत: कु देखील गंडलय. म्हणजे,

ट्विटरवर कु ॲप इंडिया आणि कु ॲप ऑफिशियल नावाचे दोन अकाऊंट होते. यातल्या कु ॲप इंडियाला 7 हजार फॉलोअर्स तर कु ॲप ऑफिशियलला 20 हजार फॉलोअर्स होते. साहजिक लोकांच्या मते कु ॲप ऑफिशियल हे ओरिजनल अकाऊंट असणारं. पण इथेही अप्रेमय राधाकृष्णन आले व ते म्हणाले कु ॲप इंडिया हे ओरिजनल आहे. कु ॲप ऑफिशियलने पण ट्विट करुन सांगितलं की मी ओरिजनल आहे. 

थोडक्यात ट्विटरवर ओरिजनल कु कोण म्हणून दोन कु भांडू लागले. शेवटी 20 हजार फॉलोअर्स वाला खोटा निघाला. त्याचं अकाऊंट ट्विटरने बॅन केलं. 

दूसरी गोष्ट म्हणजे मी कु वर आलोय म्हणून सगळे ट्विटरवर सांगत सुटलेत. इथे जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहचण्यासाठी ट्विटरच महत्वाचं ठरतय.. 

शेवटचा प्रश्न कु ॲप डाऊनलोड करुन चु ठरणार का? 

हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबुन आहे. देशी माल विकून रामदेव बाबा पण श्रीमंत झालाय. मुद्दा आहे तो दुषित मनानं कु कडे बघु नका. ॲप कस वाटतय. सोईस्कर आहे का? प्रायव्हसी पॉलिसी काय आहे या सगळ्याचा विचार करा. 

पण त्याहून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे,

सोशल मिडाया खऱ्या अर्थाने सोशल आहे म्हणून त्याच्या असण्यात अर्थ आहे. विरोधी विचार ऐकून कितीही त्रास होत असला तरी तो काय विचार करतोय हे समजून घ्यायला पाहीजे. कु ज्या पद्धतीने पुढं चाललय ते बघुन फक्त एकाच विचारांचे लोकं कु जॉईन करतील.

सुरवातीला सगळीकडे आनंदी आनंद असेल तर बोअर होईल. काय चाललय हे कळणारचं नाही. आणि “आपल्या धडावर आपलाच मेंदु” या वाक्याला कु सारखे ॲप सपशेल गाढव लावू शकतात. 

थोडक्यात चु सारखा विचार करुन कु करु नका आणि हो ते आत्मनिर्भर, देशी, वगैरे ची टिमकी पण वाजवू नका, लय लोकं यातनं श्रीमंत होवून युरोपला फिरायला जात असतेत माहिताय आम्हाला.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.