ऐन सणासुदीच्या काळात अमेझॉन कायमचं बंद होणार असल्याची चर्चा सुरु झालीय…

आता सध्या सणांची लगबग चालू झाली आहे.आज दसरा आणि काही दिवसानंतर दिवाळी येईल.दिवाळी दसरा आला म्हणजे सुरु होते खरेदी साठी धावपळ. खरेदी करायची म्हटल्यावर आधी बाजारपेठा गच्च भरलेल्या दिसायच्या. पण जशी जशी तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसं तसं सर्व गोष्टी ऑनलाईन येत गेल्या.पण त्याला वस्तूंचीखरेदी हे कसं अपवाद राहील ना..वस्तूंची खरेदी हि  सुद्धा ऑनलाईन उपलब्ध व्हायला लागली. त्याचे मार्केट एवढे मोठे झाले कि त्यामध्ये अनेक मोठ्या कंपनी मध्ये रस्सीखेच बघायला मिळत आहे. फ्लिपकार्ट,मिंत्रा,अमेझॉन , यासारख्या अनेक online शॉपिंग साठी ऑप्शन लोकांना उपलब्ध झाले आहेत.

यामध्ये अमेझॉन कंपंनी ने भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपले जाळे पसरले आहेत. अमेझॉन हि जगातील सर्वात मोठी शॉपिंग कंपनी ठरली आहे. आणि ती भारतात सुद्धा सर्वात मोठी शॉपिंग कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. पण अनेकदा हि कंपंनी जगभरात आणि भारतात सुद्धा वादात सापडली आहे. आता हीच कंपनी पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडली आहे…

जाणून घेऊया या कंपनी चा सध्याचा वाद..त्याच्यानंतर कंपनीने आधी केलेले वाद सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका अहवालात म्हटले आहे की, अमेझॉन ने इतर कंपन्यांची उत्पादने कॉपी केली. तसेच, त्याने आपल्या कंपनीच्या उत्पादनांची भारतात विक्री वाढवण्यासाठी अमेझॉनच्या सर्च रिजल्ट मध्ये फेरफार केला.

रॉयटर्सने  म्हटले आहे की, अमेझॉनची हजारो अंतर्गत कागदपत्रे आम्हाला मिळाली आहेत, ज्याच्या आधारे आपण हा आपला अहवाल तयार केला आहे. अमेरिकन कंपनी अमेझॉन आपल्या कंपनीने तयार केलेल्या ब्रॅण्ड्सला  भारतात प्रोत्साहन देण्यासाठी इतर ब्रॅण्ड्सची कॉपी करते  आणि सर्च रिजल्ट मध्ये फेरफार करण्याची पद्धतशीर मोहीम राबवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात असं सुद्धा म्हणण्यात आलंय  कि हा सगळं प्रकार कंपनीच्या स्ट्रॅटेजी चा भाग आहे. कंपनी च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची योजना आखून त्याचा पाठपुरावा केलाय.

रॉयटर्सचा हा अहवाल समोर आल्यानंतर भारतीय किरकोळ व्यापाऱ्यांनी सरकारकडे अमेझॉन विरुद्ध  चौकशी सुरू करण्याची मागणी केली आहे.अमेझॉन ह्या कंपनी ला अमेरिकेत सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

मुळात अमेझॉन ही कंपनी मूळची अमेरिकेची आणि तिला अमेरिकेत विरोध होतोय म्हटल्यावर घरचाच आहेर अमेझॉन मिळतोय असंच म्हणावं लागेल.

अमेरिकन खासदार एलिझाबेथ वॉरेन यांनी तर चक्क Amazon.com बंद करण्याची मागणी केली आहे.अमेरिकन खासदार वॉरेन दीर्घकाळापासून अमेझॉनच्या टीकाकार राहिल्या आहेत.. हा अहवाल ट्विटरवर शेअर करताना त्या म्हणाल्या,

“आम्हाला अमेझॉन च्या मक्तेदारीवर जी भीती होती त्याच भीतीवर हि कागदपत्रे शिक्कामोर्तब करत आहे. ही कंपनी आपल्या नफ्यासाठी सर्च रिजल्ट मध्ये  फेरफार करण्यास सक्षम आहे आणि ती फेरफार करत सुद्धा आहे. असं करून ही  कंपनी अनेक छोट्या व्यावसायिकांची उपजीविका धोक्यात आणू शकते. अमेझॉन बंद करावं यासाठी असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक हे कारण सुद्धा आहे.”

भारतीय किरकोळ व्यापाऱ्यांनीही या प्रकरणी अमेझॉनविरोधात चौकशी सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीआयएटी) चे प्रवीण खंडेलवाल म्हणाले, 

“लहान उत्पादकांना अमॅझॉनकडून  खूप त्रास होत आहे. ते त्यांच्या कमाईचा काही भाग खात आहेत जे कि तो भाग त्यांच्यासाठी नाहीये.”  

अमेझॉन  अद्याप पर्यंत तरी या प्रकरणावर कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.

अमेझॉन वर असे गंभीर आरोप लागण्याची ही काय पहिली वेळ नाही याआधी सुद्धा काँग्रेस ने गंभीर स्वरूपाचे आरोप अमेझॉन  वर केलेले आहेत.

ॲमेझॉन कंपनीद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांकडून ८ हज़ार ५४६ कोटी रुपये सरकारला देण्याचा आरोप काँग्रेस पक्षाने काही दिवसांआधी केला होता. ८,५४६ कोटी रुपये ॲमेझॉनने लाच म्हणून दिली आहे असा थेट आरोप काँग्रेस पक्षाचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी सरकार आणि अमेझॉन वर केला होता. अमेझॉन ला कोणत्या कामासाठी सरकारला लाच देण्याची गरज पडली अशी चर्चा काही दिवसांआधी रंगली होती.

अमेझॉन च्या मक्तेदारीमुळे अनेक छोटे व्यावसायिक आपला उद्योग गमावून बसत आहेत. आता फेसबुक वर झालेल्या आणखी नव्या आरोपाचा वाद काय वळण घेतो हे बघणं महत्वाचं असेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.