सगळ्या जगाला वाचवण्याचा ठेका घेतलेला ‘सुपरमॅन’ भारताच्या वाकड्यात का जातोय ?

तुम्हाला आठवतंय का?

२०१८  मध्ये हॉलिवूडमध्ये एक पिक्चर आलेला. हॉलिवूडचा प्रसिद्ध टॉम क्रूझने यात मेन रोल केला होता. त्या पिक्चरचं नाव म्हणजे, ‘मिशन इम्पॉसिबल फॉल आउट’.  या पिक्चरला भारतामध्ये मोठा विरोध झाला होता. कारण या चित्रपटात भारतामधील काश्मीर हा वादग्रस्त भाग म्हणून दाखवण्यात आला होता.  मग काय भारतात मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. सर्वच स्तरातून या पिक्चरला विरोधाला सामोरं जावं लागत होतं. शेवटी भारताच्या आक्षेपानंतर हे वादग्रस्त काश्मीरचं दृश्य पिक्चरमधून काढून टाकण्यात आलं.

आता तुम्ही म्हणाल हा विषय मी आत्ता का उकरून काढतेय….त्याला निमित्त आहे ते म्हणजे नुकताच आलेला सुपरमॅन हा हॉलिवूड पिक्चर. 

सुपरमॅन हा जगातील सर्वात लोकप्रिय सुपरहिरो आहे जो अमेरिकेत राहत असतो. भारतात क्वचितच एखादे कुटुंब सापडेल ज्याने सुपरमॅनचे नाव ऐकले नसेल. विशेषतः मुलांमध्ये हा सुपरमॅन खूप लोकप्रिय आहे.

सगळ्या जगाला वाचवण्याचा ठेका काय हॉलिवूडमधल्या सुपरहिरोनेच घेतलाय काय?

आत्तापर्यंत या हॉलीवूड चित्रपटांमध्ये आणि कॉमिक्समध्ये आपण वाचत आणि पाहत आलो आहोत की, अमेरिका एक महासत्ता आहे आणि संपूर्ण जगाला वाचवण्याचं फक्त अमेरिकेलाच पडलंय. म्हणूनच सर्व सुपरहिरो, मग तो सुपरमॅन असो वा आयर्न मॅन किंवा मग बॅटमॅन असो. हे सर्व सुपरहिरो अमेरिकेतच राहत असतात.  आपल्याला एक गोष्ट लक्षात आलीच नसेल कि,  या सुपरहिरोच्या माध्यमातून अमेरिकेने संपूर्ण जगातील तरुण आणि मुलांना आपल्या प्रभावाखाली ठेवले आहे.

यावेळी एक नवीन वाद समोर आला. तसा नवीन म्हणता येणार कारण जो इशू ‘मिशन इम्पॉसिबल फॉल आउट’ या चित्रपटाने निर्माण केला होता आता तोच या नवीन सुपरमॅन या पिक्चरने केला आहे. 

सुपरमॅन या नवीन अॅनिमेटेड चित्रपटात, सुपरमॅनने आता थेट काश्मीरच गाठलं आहे.

आणि एवढाच काय तर त्यात काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र म्हणून वर्णन केले आणि शांततेच्या नावाखाली भारतीय लष्कराची सर्व शस्त्रे नष्ट केली आणि असेही सांगितले की काश्मीरमध्ये लष्कराच्या उपस्थितीचा काही अर्थ नाही.

हा चित्रपट पाहिल्यानंतर भारतातील आणि जगभरातील तरुणांना वाटेल की भारतीय सैन्याने काश्मीरवर कब्जा केला आहे. जो कि सरळसरळ चुकीचा संदेश जगभरात जाणार हे मात्र नक्की आणि म्हणूनच आता या चित्रपटातून हे दृश्य काढून टाका अशी मागणी भारतात होत आहे.

म्हणूनच सुपरमॅनची निर्मिती करणाऱ्या डीसी कॉमिक्सने हे दृश्य चित्रपटातून काढून टाकलं पाहिजे एवढेच नाही तर भारताची माफीही मागितली पाहिजे.

अशी मागणी करत भारतीय नेटीजन्सने ट्वीटरवर  #AntiIndiaSuperman हॅशटॅगवर ट्रेंड होत आहे.

थोडक्यात चर्चा अशिय कि, सुपरहिरोला राजकारणाचा आणि प्रचाराचा भाग बनवणे योग्य नाही.

सुपरहिरोची स्टोरी सांगणारे डीसी म्हणून तुम्हाला माहीत असलेल्या प्रसिद्ध डिटेक्टिव्ह कॉमिक्सने त्यांच्या सुपरहिरो पात्रांना सुपरमॅन आणि वंडर वूमन दाखवून त्यांच्या एका अॅनिमेटेड चित्रपटात भारताच्या काश्मीरवर हल्ला केला आहे. थोडक्यात सीन असा आहे कि, सुपर मॅन आणि वंडर वुमन काश्मिरात जातात आणि तेथे भारतीय सैन्याची शस्त्रे आणि तळ नष्ट करतात, असे सांगून की वादग्रस्त काश्मीरमध्ये शस्त्रे आणि सैन्याच्या उपस्थितीसाठी जागा नाही.

हा देखावा डीसीच्या “Injustice” नावाच्या नवीन अॅनिमेटेड चित्रपटाचा भाग आहे जो काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या लेखकांनी प्रथम काश्मीरला वादग्रस्त क्षेत्र म्हणून वर्णन केले आणि नंतर सुपर मॅन आणि वंडर वुमनने काश्मीरमध्ये जाऊन सैन्याची शस्त्रे कशी नष्ट केली आणि नंतर काश्मीरला मोठ्या अभिमानाने  ‘मिलिटरी फ्री झोन’ ​​म्हणून घोषित केले हेहि दाखवले.

आता तुम्ही या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या या ढोंगीपणावर हसू शकता आणि चिडू देखील शकता. कारण खऱ्या खुऱ्या अस्तित्वात असलेल्या पाकिस्तानमध्ये काश्मीर हिसकावण्याचे धाडस नाही, मग या काल्पनिक सुपरहिरोकडून हे कसं शक्य आहे.

बाहेरील देशांच्या चित्रपटांच्या माध्यमातून भारताच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे आणि ते अतिशय धोकादायक आहे. हे देश त्यांच्या चित्रपटांमध्ये दाखवतात की त्यांचे हिरो एलियनशी लढत आहेत, व्हाईट हाऊसचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करत आहेत, पण जेव्हा भारताचा प्रश्न येतो तेव्हा ते काश्मीर सारख्या भागाला वादग्रस्त क्षेत्र म्हणू लागतात आणि भारतीय लष्करावर प्रश्न विचारतात. पण मग तो सुपरमॅन असो किंवा कोणताही हिरो असो त्याची भारताकडे बघण्याची हिंमत होऊ नये.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.