बाबा खैराजी यांच्या लंगरने आजवर ३० लाख भुकेल्या लोकांची पोटं भरलेली आहेत…..

भारत देशाच्या अनेक विविधता आहे. या देशात लोकांना लुटणारे सुद्धा तितकेच आहेत आणि लोकांच्या हितासाठी राबणारी मंडळीसुद्धा तितकीच आहे. मोह, माया, स्वार्थ सोडून हि लोकं मनोभावे दिन दुबळ्यांची सेवा करत असतात. अन्नदान हा त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा या देशात अनेक लोकांची चूल कित्येकदा पेटत नाही पण या लोकांसाठी सुद्धा काम करणारी लोकं या देशात आहे. आजचा किस्सा सुद्धा अशाच एका सेवाभावी वृत्ती असणाऱ्या बाबाचा.

ज्या ज्या वेळी सेवाभावी वृत्तीची किंवा भावनेची गोष्ट येते तेव्हा शीख समाजाचं नाव अगत्याने घेतलं जातं. कारण ते एकमेव आहेत जे वर्षानुवर्षे लंगरच्या माध्यमातून भुकेल्या लोकांचं पोट भरतात. ज्या ज्या वेळी देश संकटात सापडला आहे त्या त्या वेळी शिखांनी लोकांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात अन्नदान केलेलं आहे. पण आपण ज्या व्यक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीने तब्बल ३० लाख भुकेल्या लोकांचं पोट भरलेलं आहे. 

जर तुम्ही महाराष्ट्राच्या यवतमाळच्या एनएच-७ हायवेवरून गेला असाल तर करंजी गावाच्या जवळ प्लास्टिकच्या चादरींनी झाकलेलं एक शेड दिसेल.

तिथे ८२ वर्षाचे बाबा कर्नल सिंग खैरो भुकेल्या लोकांसाठी लंगर चालवतात. विशेषतः करोना काळात बाबा खैराजी यांच्या या लंगरची लोकांना भरपुर मदत झाली.

ज्या भागात बाबा लंगर चालवतात त्या भागात दूरवर कुठेही हॉटेल किंवा रेस्टोरंट नाही आणि या मार्गावरून जाणारा प्रत्येकजण गुरु का प्रसाद खाऊनच पुढे जातो. बाबा खैराजी हे तब्बल मागील ३३ वर्षांपासून हे लंगर चालवत आहेत. १९८८ सालामध्ये त्यांनी लंगरसेवा सुरु केली होती. आजवर या लंगरमधून ३३ लाख भुकेल्या लोकांचं पोट भरलेलं आहे.

करोना काळात लंगरसेवेसोबतच खैराजी यांनी मोफत पद्धतीने १५ ऑक्सिजन सिलिंडरसुद्धा उपलब्ध करून दिले होते. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता आहे अशा लोकांसाठी यांनी हि सेवा सुरु केली होती. लंगर  जेवायला येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं बाबा खैराजी हसून स्वागत करतात. यामध्ये बाबा खैराजी यांची १७ जणांची टीम आहे, जे रात्रंदिवस लोकांची सेवा करत असतात. १७ लोकांमध्ये ११ लोकं आचारी आहेत तर इतर लोकं बारीकसारीक काम करतात.

लोकांना जेवण देण्याबरोबरच बाबा खैराजी यांची टीम मुक्या जनावरांना सुद्धा जेवण देत असते. त्यामुळे या ठिकाणी कायम कुत्री, मांजरी, गाय अशा प्राण्यांची गर्दी असते.

आता इतक्या मोठ्या प्रमाणावर लंगर सेवा द्यायची म्हणजे त्याला पैसेही लागणारच. या कामात बाबा खैराजी यांचे छोटे बंधू गुरुबक्ष सिंग हे आर्थिक मदत करतात. बाबा खैराजी यांचे बंधू हे न्यू जर्सीमध्ये राहतात. बऱ्याच कामात ते मदत करतात.

हि लंगरसेवा गुरुद्वारा भगोद साहिब यांच्या वतीने देण्यात येते. हायवे पासून ११ किलोमीटर जंगलात हा लंगर आहे. या ठिकाणी १७०५ मध्ये शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंग थांबले होते.

बाबा खैराजी सांगतात कि लॉक डाउनच्या काळात सुरवातीच्या १० आठवड्यांमध्ये त्यांनी १५ लाख लोकांना जेवू घातलं होतं. बाबा खैराजी यांचं हे काम अतिशय लोकप्रिय आहे.

अनेक लोकांचं प्रेरणास्थान म्हणून बाबा खैराजी ओळखले जातात. इतक्या वर्षांपासून प्रदीर्घ सेवा बाबा खैराजी देत आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.