दिल्ली, मुंबई सोडून बंगलोर आयटी हब कस झालं माहितय का..? 

पुण्यात आयटी हब आहे. हिंजवडी बघितलयस का…?

भावांनो पुण्यात फक्त पाट्या टाकणारी काम होतात. निर्णय घेणं, बैठका घेणं ही सगळी काम बंगलोरमध्येच होतात आणि किमान आयटी मध्ये तरी बंगलोर आजही बाप आहे.

पुण्यावर कितीही प्रेम असलं तरी उगी आयटीच्या बाबतीत बंगलोर समोर पुण्याची अगरबत्ती लावण्यात अर्थ नाही. थोडक्यात काय आपल्या भावना जरा बाजूला सारून बंगलोर नेमकं पुढं कस गेलं हे आपण रितसर बघत गेलं पाहीजे.

तर याची सुरवात इतिहासापासून आहे.

म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर नावाची एखादी गोष्ट पुढे जाऊन येईल याची सुतराम कवी कल्पना देखील कोणी केली नसेल त्या काळापासून.

तर आपले जमशेदजी टाटा तुम्हाला माहितच असतील. या माणसाने हॉटेल इंडस्ट्रीत ताज आणलं, पॉवर इंडस्ट्रित पाय रोवले. एकदम दूरवरचा विचार करणारा हा माणूस होता. तर झालं अस की जमशेदजी टाटा यांना सायन्स इंन्स्ट्यिट्यूट काढायचं होतं. त्यासाठी ते वेगवेगळ्या शहरात जागा पहात होते. अशातच त्यांना बंगलोरच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जागेबद्दल माहिती मिळाली.

म्हैसुरचा राजा कृष्णराज वडियार चौथा यांच्याकडून त्यांना सायन्स इन्स्ट्यिट्यूट काढण्यासाठी जागा मिळाली. इनवी सन १९०९ साली आजच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना इथे करण्यात आली. सायन्स सारख्या क्षेत्रात बाप शिक्षण देण्याची ही कल्पना होती. भारतातील सर्वात भारी संस्था उभारण्याची कल्पना सत्यात आणली गेली.

इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाल्यानंतर त्या काळात बंगलोरमध्ये सायन्स शिकण्यासाठी देशभरातून पोरं इथे येवू लागले.

साहजिक एका वटवृक्षाखाली इतर झाडं जशी तग धरून राहतात तसच इथेही झालं. इंडियन इन्स्ट्यिट्यूच्या नादाने इथे इतर सायन्स क्षेत्रातील इतर संस्था, प्रकाशक, वैज्ञानिक येत गेले आणि बंगलोर ला छोट्या प्रमाणात का होईना सायन्समध्ये एक माहेर मिळून गेलं…

आत्ता हा काळ होता ब्रिटीशांचा. १९३० ते १९५० सालात सायन्स क्षेत्रात करियर करण्याचं गाव म्हणून बंगलोर विकसित होतं गेलं. या एका संस्थेने बंगलोरला एक स्टार्ट दिला.

त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि पुढचा टप्पा सुरू झाला..

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय झालं तर डिफेन्स पासून एरोनॉटिकल, स्पेस रिसर्च अशा संस्थांची पायाभरणी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

अशा संस्थाचं हेडकॉटर कुठे असावं हा सर्वात मोठ्ठा जटिल प्रश्न होता. कारण सर्व संस्था भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या होत्याचं पण संरक्षणाच्या दृष्टिकोनात त्यांच स्थान विशेष महत्वाच ठरणार होतं.

त्यासाठी जिथे या संस्था उभारण्यात येणार होत्या ती जागा भारताच्या सिमेपासून दूर असावी ही सर्वप्रथम अट होती. युद्घाच्या काळात सिमारेषेवरून दूर असल्याने अशा संस्थांना धक्का लागणार नाही याची खात्री हवी होती. दूसरी गोष्ट म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील या संस्था असल्याने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता देखील होती. कुशल मनुष्यबळाची आवश्यकता तर इंडियन इन्स्टिट्यूटच्या स्थापनेनंतर पार पडलीच होती.

शिवाय दिल्ली, मुंबई, कलकत्ता ही शहरं भारताच्या सिमेपासून जवळ होती तर चैन्नई हे समुद्रकिनारी असल्याने धोका होता. या सर्व घडामोडीत बंगलोरचं पारडं बरच वर असल्याने अशा संस्थांची पायाभरणी बंगलोरमध्येच घालण्याची निश्चित करण्यात आलं.

याच धोरणाचा इम्पॅक्ट म्हणून HAL, इस्त्रो अशा संस्थांची पायाभरणी बंगलोरमध्ये करण्यात आली. यामुळे इतर खाजगी संस्था देखील बंगलोरचा रस्ता पकडू लागल्या.

आत्ता बंगलोरच्या इतिहासात येतो तो तिसरा टप्पा.

आर.के. बलेगाव. हे व्यक्ती भारत इलेक्ट्रिकल्स मध्ये चीफ इंजिनियर होते. पुढे जावून ते कर्नाटक राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स डेवलोपनेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन झाले. त्यांनीच ९० च्या दशकात एक आयड्या समोर आणली.

ही आयड्या होती इलेक्ट्रॉनिक सिटीची…

इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून बंगलोरमधला काही भाग डेव्हलप करण्यात येणार होता. त्या दृष्टीने काम सुरु करण्यात आलं. भारतभर विखुरलेल्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या बंगलोरमध्ये आणण्यात आल्या. पण आर.के. बलेगाव यांच अकाली निधन झाल्याने हा प्लॅन शंभर टक्के निकालात येवू शकला नाही…

पण या सर्व घडामोडींपाठोपाठ दोन महत्वाच्या घटना देखील घडल्या. त्या म्हणजे बंगलोरमध्ये इन्फोसिस आणि विप्रो या दोन कंपन्या सुरू झालेल्या होत्या. गंम्मत म्हणजे या कंपन्या आजच्या सारख्या मोठ्या नव्हत्या.

बंगलोरला खरा फायदा झाला तो म्हणजे तेव्हाच्या बाप असणाऱ्या टेक्सास इन्स्ट्रुमेंन्ट या कंपनीमुळं.

टेक्सास इन्स्ट्रुमेंट ही त्याकाळजी सर्वात मोठी कंपनी होती. जगभरात त्यांचा दबदबा होता. कॅल्यक्युलेटर पासून मायक्रोप्रोसेर पर्यन्त ते सर्व गोष्टी बनवायचे. आत्ता जागतिक लेवलची कंपनी टेक्सास इन्स्ट्रुमेंट बेंगलोरमध्ये कशी आली तर त्याची सुद्धा एका गोष्ट आहे. त्यांनी भारतातल्या विविध शहरांना अप्रोच केलेलं.

पण या कंपनीचं महत्व बंगलोरच्या प्रशासनाला कळलं. कारण इथे यापूर्वीच छोट्या स्केलच्या अशा कंपन्या डेव्हलप होवू लागलेल्या. नशीबाने ही कंपनी बंगलोरमध्ये आली आणि पुढचा गियर मिळाला.

आत्ता या कंपनीच्या नादाने दूसरी कंपनी बंगलोरमध्ये आली ती म्हणजे जनरल इलेक्ट्रिक. GE आणि विप्रो यांच्यात एक करार झालेल्या. ही कंपनी आल्यानंतर भारताच्या बाहेर बंगलोरचं नाव होवू लागलं.

भारतात आपलं ऑफिस करायचं असेल तर ते बंगलोरमध्येच करावं लागलं असा संदेश पोहचू लागला. सिलिकॉन व्हॅलीत देखील बंगलोर नाव ओळखीच वाटू लागलं आणि त्यानंतर HP, IBM, INTEL,ORACLE अशा कंपन्या इंडियासाठी बंगलोरला पसंदी देवू लागला, आणि बघता बघता बंगलोरचा झेंडा लागलाच..

आत्ता या शहराचा शेवटचा टप्पा आला तो २००० अर्थात Y2K या वर्षात, इथे बंगलोरने जगात झंडा लावला.

Y2K बग.

प्रोग्रॅमिंग हे फक्त वर्षाच्या शेवटच्या दोन डिजीटवरून रिप्रेझेन्ट केलं जायचं. जस की १९९८ ला फक्त ९८ म्हणून रिप्रेझेन्ट करायचं. आत्ता जेव्हा २००० साल आलं तेव्हा याला घोडा लागणार होता. कारण कॉम्प्युटर १९०० आणि २००० .यातला फरक करु शकणार नव्हता. त्यामुळे फायनान्सच्या बॅकिग प्रोग्रम पासून सगळ्यांनाच घोडा लागणार होता.

त्यासाठी सॉफ्टवेअरला रिप्रोग्रॅमिंग करायला लागणार होतं. याचाच अर्थ खुळ्यागत काम अस होत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा देखील मिळणार होता.

मोठ्ठा वर्क फोर्स आणि मोठ्ठ काम याचा अंदाज घेवून डेडिकेडेट Y2K बग सॉल्व्ह करणाऱ्या कंपन्या बंगलोरमध्ये उभारल्या गेल्या.

मोठमोठ्या कंपन्या बंगलोरमधून काम करून घेवू लागल्या. इथेच चांगले चांगले प्रोग्रमर बाहेर येवू लागले. इथेच विप्रो, इन्फोसिस सारख्या कंपन्या बलाढ्य होतं गेल्या आणि जगात झेंडा रोवला गेला. आत्ता लक्षात आल का वरती का म्हणालेलो, पुण्याची अगरबत्ती लावू नका बंगलोरचा इतिहास वाचा.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.