वो खुर्चीवाले चच्चा…अस नेमकं काय झालं की अमेरिकन चच्चा बर्नी सैंडर्स व्हायरल झाले

चच्चा अरे वो खुर्चीवाले चच्चा…

तुमचे खुर्चीवाले, तुमारे पापा खुर्चीवाले, तुम्हारे नाना खुर्चीवाले….

सध्या खुर्चीवाले चच्चांचा मीम तुफान व्हायरल होतोय. नाय म्हणायला याला एक दोन दिवस झाले असतील. आमच्या कार्यकर्त्यांनी पण चालायचं म्हणून ही गोष्ट सोडून पण दिलेली. पण झालं अस की विवेक म्हात्रे या भिडूचा मॅसेज आला.

तो म्हणाला,

वो बोलभिडूवाले चच्चा.. तो म्हातारा कोण आहे सांगा की आणि अस काय आहे त्यात तुफान व्हायरल होण्यासारखं..

मग म्हणलं गोष्ट तशी साधीच आहे पण जरा पाणी टाकून सांगावी. म्हणजे कस तुम्हाला पण कायतर वाचल्यासारखं वाटेल आणि आम्हालापण कायतरी लिहल्यासारखं वाटेल. त्यानिमित्ताने दोन चार जाहिराती तुम्ही बघितल्याच तर आमच्यापण खात्यावर चार पैसे जमा होतील कनाय. तुमचा पण टाईमपास होईल. कस दोघांचपण भलं…

तर असो मुळ मुद्यावर येवुया

तर झालं अस की अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून ज्यो बायडन आणि उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस यांचा शपथविधी होता. या शपथविधी दरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला. फोटो तसा साधाच होता. वयानुसार एक व्यक्ती पुर्ण पॅक होवून थंडीचा सामना करत गप्प खुर्चीवर बसून होते.

पण हा माणूस होता तो बर्नी सैंडर्स.

त्यातही सर्वांपासून नामानिराळे राहून एकटे बसलेले हे गृहस्थ पाहून एखाद्या माणसाला गरिबगाय वाटून गेलेही असते पण माणूस अमेरिकेचा सिनेटर. त्यातही उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार देखील होता. आत्ता ते उपराष्ट्रपती झाले नाहीत म्हणल्यानंतर असे बसले. कस तर आपल्याकडच्या लग्नात कसं आत्याला भारीतली साडी दिली तरी ब्लाऊजपीस जरा हलक्यातलच दिलं म्हणून रुसून बसते ना तसा हा फिल होता..

झालं आजकालची पोरं काय शहाणी हायत का? त्यांनी बर्नी सैंडर्सचा बाजार उठवाय सुरू केलं. आयता फोटो घावला आणि हे घपाघप चालू.

बघता बघता हा मीम्सचा प्रकार ट्रेन्डवर गेला. दिपीका पदुकोन पासून ते केरला टुरिझम पर्यन्त सर्वांनी आपआपले हात धुवून घेतले..

हि दिपीकाची म्हणजे तिचा सोशल मिडीया संभाळणाऱ्यांची कामगिरी..

हे केरला टुरीझमचे किडे

 

हे चांगलच जुळतय 

आत्ता ही निवडकच मीम्स आहेत. अशी पोत्यानं मीम्स आहेत. पण बर्नी सैंडर्सला यात काय विशेष वाटलं नसणार. कारण ते मीम मटेरियलच आहेत.

जेव्हा अमेरिकेसारख्या देशात करण्यासारखं काही नसतं तेव्हा त्यांच्यावर मीम्स केले जातात. असो असतं एकेकाचं नशीब..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.