आजचा विधानपरिषदेचा विजय भाजपच्या भविष्यातील विजयाची नांदी ठरणार का ?

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. तर नागपूर विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला.

या दोन्ही मतदारसंघात भाजपने विजयश्री खेचून आणलाय याच संपूर्ण श्रेय जातं  देवेंद्र फडणवीस यांना. 

त्यामुळे या दोन्ही मतदार संघात भाजपने नक्की काय स्ट्रॅटेजी राबवली ते बघावं लागेल. सुरुवात करू अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघापासून. 

या मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. भाजप आणि शिवसेना या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा आमनेसामने आले होते. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात. वसंत खंडेलवाल यांचा तीन जिल्ह्यातील जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे. 

शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. अकोला-बुलढाणा-वाशीम या तीन जिल्ह्यात पसरलेली ही सीट मागच्या चार टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे .

मात्र ही सीट शिवसेनेच्या ताब्यात असण्यामागं  शिवसेनेच्या ताकदीपेक्षा गोपकिशन बाजोरिया यांचे  ‘कौशल्य’ असल्याचं दिसून आलायं.

पक्षाचे जास्त मतदान असूनसुद्धा उमेदवार निवडून येइलचं अशी ग्यारंटी या मतदारसंघात नसते. गोपीकिशन बाजोरियांनी अल्पमतात असतानाही  विजय खेचून आणलेत. त्यावेळी आघाडाची मते फुटली होती. आता महाविकास आघाडीकडून  उभा असणाऱ्या बाजोरीयांना ३ वेळा चाललेला बहुमताचा आकडा मॅनेज करण्याचा डाव त्यांच्यावरच उलटला. 

गोपीकिशन बाजोरियांना आव्हान देणारे वसंत खंडेलवाल एके काळी बाजोरियांचे बिजनेस पार्टनर होते. सराफ व्यापारी असणाऱ्या वसंत खंडेलवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत तयार झालेलं प्रोडक्ट आहे. त्यामुळे आरएसएसचं तीन जिल्ह्यात असलेलं नेटवर्क खंडेलवाल यांच्या कामात आलं.

त्यात वसंत खंडेलवाल गडकरींच्या जवळचे मानले जातात त्यामुळे स्वतः गडकरी निवूडणुकीवर लक्ष ठेवून होते.

आता नागपूरचं बघू 

नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार १८६ मतं मिळाली तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या विजयासाठी परफेक्ट प्लॅनिंगला यश आलं आहे. नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ भाजपकडे होती. भाजपनं यावेळी गिरीश व्यास यांच्याऐवजी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. काँग्रेसनं सुरुवातीला भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना फोडत आक्रमक चाल खेळली. मात्र, त्यानंतर काँग्रेस तितकी आक्रमक राहिली नाही.

मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरुन दोन गट पाहायला मिळाले. त्यामुळं काँग्रेसमधील नियोजनातील गडबड भाजपच्या पथ्यावर पडली. मतदार फुटू नये म्हणून भाजपनं मतदारांना सहलीवर पाठवलं. मतदारांना सहलीवर पाठवत मतदार एकत्रित ठेवत मतदार फुटणार नाहीत याची काळजी भाजपकडून घेण्यात आली. 

नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

1 Comment
  1. Bjp says

    This portal is pro bjp.

Leave A Reply

Your email address will not be published.