राजीव गांधींचे बेस्ट फ्रेंड होते तरी अमरिंदर सिंग यांनी पूर्वी एकदा कॉंग्रेस सोडली होती.

कॅप्टन अमरिंदरसिंग आणि आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मधील वादाची परिणती आपल्याला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावरून दिसून आली. कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सगळीकडेच आता अशीही चर्चा चालू आहे कि, ते या पदाच्या बरोबरच पक्ष देखील सोडतील.

सिद्धू समर्थक आमदारांचा एक गट बंड करण्याच्या तयारीत असताना पक्षनेतृत्वाला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक वयाचे मुख्यमंत्री म्हणून अमरिंदरसिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ते ७९ वर्षांचे आहेत.

पण त्यांच्या कॉंग्रेस मध्ये एंट्रीला कारणीभूत होते राजीव गांधी !

परंतु आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहिती नसेल की अमरिंदरसिंग हे राजीव गांधी यांचे वर्गमित्र होते.डेहराडून येथील डून स्कूल येथे दोघांचे शिक्षण झाले होते. तेव्हापासून त्यांची मैत्री कायम होती.

अमरिंदरसिंग हे मूळचे पतियाळा इथल्या राजघराण्याचे महाराज यादवेंद्र सिंग यांचे सुपुत्र. ब्रिटिश काळापासून पंजाबमध्ये पतियाळा घराण्याचा दबदबा प्रचंड होता. पण तरीही अमरिंदरसिंग यांचे आजोबा आणि वडील या दोघांनाही सैन्यात पराक्रम गाजवला होता. आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून आर्मी मध्ये जायचं हे अमरिंदरसिंग यांचं स्वप्न होतं.

डून स्कुलमध्ये असताना त्यांच्या वर्गात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नातू राजीव गांधी होते. दोघांची चांगली गट्टी जमली. कित्येकदा अमरिंदरसिंग सुट्टीच्या काळात दिल्लीमध्ये पंतप्रधान निवास येथे राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्या सोबत खेळण्यासाठी जात.

पुढे राजीव गांधी इंजिनियर होण्यासाठी इंग्लंडला गेले तर अमरिंदर सिंग यांनी सैन्यात जायच्या इच्छेने राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये प्रवेश घेतला. तेथील अभ्यासक्रम पूर्ण करत ते १९६३ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. तिथे कॅप्टन या हुद्द्यापर्यंत जाऊन पोचले. पुढे त्यांनी आर्मीमधून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली पण तत्पूर्वी त्यांना १९६५ च्या युद्धासाठी पुन्हा बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी तिथे आपला सहभाग नोंदवला. 

इकडे राजीव गांधी हे पायलट झाले होते. त्यांना राजकारणात रस नव्हता. पण संजय गांधी यांच्या आग्रहामुळे अमरिंदर सिंग यांना राजकारणात यायला भाग पाडलं. १९७७ साली अमरिंदर सिंग यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पण १९८० साली ते पतियाळा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले. 

पण आपला खासदारकीचा कार्यकाळ १९८५ ला पूर्ण होण्याआधीच त्यांनी १९८४ ला राजीनामा दिला.

 राजीनाम्याचे कारण होते खलिस्तानी दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार घडवून आणले.

पण १९८४ मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवून तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात शीख धर्मियांसाठी पवित्र असलेल्या सुवर्णमंदिराचे बरेच नुकसान झाले अशा पवित्र जागी हिंसा होऊन रक्तपात घडवला. या सगळ्या प्रकरणाने शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या. अशा पवित्र जागी लष्कर घुसवून एवढा उत्पात करायला नको होता अशी तेथील लोकांची भावना होती.

या भावनेला साद देत कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी १९८४ ला आपला खासदारकीचा राजीनामा दिला.

त्यानंतर ते शिरोमणी अकाली दलात सामील झाले. आणि ‘तळवंडी साबो’ येथून निवडणूक लढवत ते विजयी झाले व कृषी, वने व पंचायत राज विभागाचे मंत्री झाले.  १९८४ ते १९९२ या काळात ते अकाली दलात होते. तेथेही पक्षश्रेष्ठींशी खटके उडाले त्यांनी अकाली दल पक्षातून बाहेर पडत शिरोमणी अकाली दल पक्षाची स्थापना केली. पुढे

१९९२ साली अकाली दल पक्षातून बाहेर पडून त्यांनी शिरोमणी अकाली दल पक्षाची स्थापना केली.

सात वर्ष स्वतंत्र पक्ष मार्फत ते काम करत राहिले. १९९८ ला राज्य विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. ते स्वतः देखील निवडून येऊ शकले नाहीत. त्त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले प्रेम सिंह चांदुमाजरा ३३,२५१  मतांच्या फरकाने यशस्वी झाले.  अमरिंदर सिंग यांना फक्त ८५६ मतं मिळाली. हा पराभव त्यांना खूप जिव्हारी लागला म्हणून त्यांनी स्थापलेला शिरोमणी अकाली दल या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९९ ते २०१७ या काळात ते पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते. दरम्यान २००२ ते २००७ दरम्यान पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांचा त्यांनी १०२०००  मतांनी पराभव केला.

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केले. पतियाळा शहरी मतदारसंघातून तीन वेळा, सामाना आणि तळवंडी साबो येथून प्रत्येकी १-१ वेळा ते निवडून आले. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१७ साली राज्य विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळून काँग्रेसचे सरकार बसले  व मुख्यमंत्री झाले.

काँग्रेस मधले शेवटचे लोकनेते म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पण गेल्या काही काळापासून ते पक्षनेतृत्वावर नाराज होते. सोनिया गांधींशी त्यांचं राजीव गांधींच्या वेळेपासून मित्रत्वाचं नातं होतं.  पण राहुल गांधी व प्रियांका गांधी हे नवज्योत सिंग सिद्धू यांच पक्षात महत्व वाढवत आहेत यावरून त्यांनी निराशा व्यक्त केली होती. याच असंतोषातून काल त्यांनी राजीनामा दिला.

ते म्हणतात सकाळी मला सोनिया गांधी यांचा फोन आला होता तेव्हा सोनिया गांधींनी राजीनामा स्वीकारला आणि म्हणाल्या सॉरी अमरिंदर. या एका घटनेतून देखील त्यांची मैत्री जाणवून येते. राजकारण बदलत राहीलच पण अमरिंदर सिंग यांच्या सारख्या नेत्याने राजीनामा देणे भावी काळात काँग्रेसला मोठा फटका देणारे असेल हे नक्की. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.