जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणूका म्हणजे आघाडीसाठी चाचणी परीक्षा मानली जातीय

राज्यात सहा जिल्हा परिषद  आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. नागपूर, धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला आणि पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या जागांसाठी या पोटनिवडणुका होत आहेत. जिल्हा परिषेदेच्या ८६ तर पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी हे मतदान झालं.

त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या १५, धुळे १५, पालघर १५, नंदुरबार ११, वाशिम १५ आणि अकोल्याच्या १५ जागांवर, तर पंचायत समितीच्या नागपूरमध्ये ३१, धुळे ३०, नंदुरबार १४, वाशिम २७, अकोला २८ आणि पालघरच्या १४ जागांसाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे.

दरम्यान, ही निवडणूक महाविकास आघाडी सरकारसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरणार असून भाजपला यावेळी तगडे आव्हान मिळणार असल्याचं बोललं जातंय.

खरं तर, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून असलेले कोरोना महामारीचं संकट आणि या दरम्यान ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं, त्यामुळे सहा जिल्ह्यांच्या या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणूका पुढे ढकलणं किंवा रद्द करणं शक्य नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. ज्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीला निवडणुकांची घोषणा करणं भाग पडलं. या रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.

तसं पाहिलं तर, महाविकास आघाडीने आधीच स्पष्ट केलं जात कि, पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील. ज्यानंतर आघाडीचे मंत्री, जिल्हा तसेच पंचायत समिती वरील नेते, पदाधिकारी, जिल्ह्यातील तीन पक्षांचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि कार्यकर्त्ये तयारीला लागले होते. आता राज्यात सत्ता जरी असली तरी स्थानिक पातळीवरच्या  या निवडणुकीच्या माध्यमातून महा विकास आघाडीच्या समन्वयाची कसोटी लागणार असल्याच म्हंटल जातंय.

महाविकास आघाडी सरकारसाठी ही एक प्रकारची लिटमस टेस्ट असणार आहे. कारण या निवडणुकी दरम्यान अनेक प्रश्न सरकार समोर आहेत, ज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न, मंत्र्यांवर होणारे आरोपमी भाजपचं आव्हान  या सगळ्यात कार्यकर्त्यांचा ताळमेळ राखणं कोणत्या कसोटीपेक्षा कमी नाही.

या निवडणुकीवेळी  बऱ्याच मतदार संघात काँग्रेस- राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली.

आता, विरोधी पक्ष भाजपबद्दल बोलायचं झालं तर या सर्व ठिकाणी भाजपचे खासदार आहेत, सोबतच आमदारांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यात भाजप हा एकच पक्ष विरोधी पक्ष म्हणून या राजकीय आखाड्यात उतरलाय. त्यामुळे भाजपाला महाविकास साखळीला मोडून काढावं लागणार आहे.

या निवडणुकांसाठी आज संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान झालं, तर उद्या म्हणजे ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.