एका डिटेक्टिव्ह जोडप्याने 40 वर्षांच्या मृत्यूचं गूढ उकलून काढलं होतं….

डिटेक्टिव्ह म्हणल्यावर अनेक सिनेमांमधले डिटेक्टिव्ह लोकं उभे राहतात. सतत शोध घेत धावपळ करत असलेले आणि आपल्या हुशारीच्या जोरावर ते केसचा निकाल लावत असतात. अशीच एक घटना घडली होती अमेरिकेत ज्यात 40 वर्षांनंतर एका डिटेक्टिव्ह कपलने अपहरण झालेल्या दोन बहिणींच्या खुनाचा शोध घेतला होता. तर जाणून घेऊया नक्की काय मॅटर झाला होता.

1975 मध्ये अमेरिकेतल्या मॅरिलॅन्ड मधल्या शॉपिंग मॉल मधून शायला लियॉन आणि कॅथरीन लियॉन या दोन बहिणी अचानक गायब झाल्या. या दोघी बहिणी आपल्या मित्रांसोबत शॉपिंग करायला मॉलमध्ये गेल्या होत्या पण त्या दिवसानंतर त्या इतर कोणालाही दिसल्या नाही. भरपूर तपास या दोन बहिणींच्या शोधासाठी झाला, पोलीस यंत्रणेला कामाला लावलं, अनेक डिटेक्टिव्ह वैगरे वापरून झाले पण काय गुन्हेगाराचा पत्ताच लागला नाही. शेवटी वैतागून पोलिसांनी ती फाईल बंद करून टाकली.

या घटनेला नंतर 40 वर्षे झाले. आता इतके वर्षे झाले म्हणल्यावर कोण त्या केसमध्ये परत अडकत बसणार पण एक चमत्कार घडला. एका डिटेक्टिव्ह जोडप्याच्या हातात ही केस लागली आणि त्यांनी शोध सुरू केला. त्या केस फाईलचा त्यांनी डिटेल अभ्यास केलेला होता आणि एक एक पत्ता उघडायला सुरवात झाली.

या केसचा ज्यावेळेस त्या डिटेक्टिव्ह जोडप्याचा स्टडी चालला होता तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की तिथं एक माणूस होता जो सांगत होता की त्याने त्याच्या समोर एका जणाला त्या दोन मुलींना पळवून नेताना बघितलं होतं. पुन्हा एकदा नव्याने खटपट करणाऱ्या या डिटेक्टिव्ह जोडप्याने ठरवलं की साक्ष देणाऱ्या गड्याचं मागचं 40 वर्षांचं जीवन कसं असेल हे जाणून घ्यायला त्यांनी सुरवात केली. त्या माणसाचं नाव होतं लॉयड विल्च.

या तपासात त्या डिटेक्टिव्ह जोडप्याला असं आढळून आलं की लॉयड विल्चवर बऱ्याच मुलीचं लैंगिक शोषण आणि हत्याचे आरोप आहेत. त्या डिटेक्टिव्ह जोडप्याला मोठा विश्वास आला की ज्याला आपण जाब विचारला तोच त्याच्या जाळ्यात अडकला म्हणून. त्या डिटेक्टिव्ह कपलने लॉयड विल्चला विचारपूस करण्यासाठी बोलावून घेतलं. 8 तास त्याची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान त्याने बऱ्याचदा आपले स्टेटमेंट बदलले. पण तो हे मानायला तयार नव्हता की त्याने त्या दोन बहिणींची हत्या केली आहे.

शेवटी या डिटेक्टिव्ह जोडप्याने त्याला इतकं टॉर्चर केलं की तो इथवर कबुल झाला की त्याने त्या दोन मुलीचं लैंगिक शोषण केलं होतं आणि त्यांचं अपहरण करण्यासाठी मदत केली होती. त्या दोघी बहिणींना त्याच्या बेडफोर्ट कौंटीच्या जुन्या घरात जाळून टाकण्यात आलं होतं. लॉयड विल्चने आपला सगळा दोष हा वाडीला आणि काकावर टाकला पण पोलिसांना त्यांच्याकडे विशेष काही आढळून आलं नाही.

शेवटी डिटेक्टिव्ह जोडप्याने अजून आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा लॉयड विल्च कबुल झाला की त्याने त्या दोन बहिणीचं अपहरण केलं, त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि त्यांना जाळून टाकलं सोबतच अजून दोन-तीन मुलांचा जीव त्याने घेतलेला होता. डिटेक्टिव्ह जोडप्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि पोलिसांनी लॉयड विल्चला गजाआड केलं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.