दारू पिल्यानंतर डोळे सुजत असतील तर दारूला दोष देवू नका, या कारणामुळे सुजतात डोळे.

सर्वात पहिल्यांदा सांगतो, दारू वाईट. दारूच व्यसन वाईट. तरिही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अस म्हणतात. लोक दारू पितात. दारू पिवून झाली की सकाळी डोळे सुजतात. काही माणसांच्या डोळ्याकडे बघितलं की कळतं, हे डोळे नाईन्टीचे की क्वाटरचे.

मग माणसं दारूला शिव्या देतात. दारूत भेसळ होती. ओरीजनल नव्हती अशा प्रकारची हलक्यातली विधाने करुन बिचाऱ्या दारूला दोष दिला जातो. पण यामध्ये दारूचा काहीच दोष नसतो. बिचारी दारू आपलं काम करत असते. दारू काम असतच चढायचं ती चढते. 

मग प्रश्न राहतो, डोळे का सुजतात. चेहरा का सुजतो. 

तर याच कारण असतं. दारूमध्ये असणारे घटक. दारूमध्ये असणारे अल्कोहलचा ज्या व्यक्तिंवर फरक पडतो. ज्या व्यक्तिंचे डोळे सुजतात त्यांना डॉक्टर आपआपल्या पद्धतीने सल्ले देतच असतात. अशा गोष्टींना अल्कोहल इंटोलरंस म्हणण्यात येतं. अल्कोहलचे प्रमाण असणाऱ्या द्राक्षे, बाजरी, गहू, मका असे पदार्थ खाल्यानंतर देखील ज्यांचे डोळे सुजत असतील त्यांना आपल्याला अल्कोहल इंटोलरंस आहे हे माहिती करुन घेता येते. 

मात्र अल्कोहल एलर्जी आणि अल्कोहल इंटोलरंस यामध्ये फरक असतो, 

जर अल्कोहलची एलर्जी असेल तर शरिरात अल्कोहल आल्यानंतर आपली बॉडी अल्कोहलला एका आजाराप्रमाणे ट्रिट करते. अल्कोहल येतात शरिरात वेगवेगळे प्रोटीन आणि हार्मोनचे फरक होण्यास सुरवात होते. आणि त्यातूनच एलर्जीचे लक्षण दिसण्यास सुरवात होईल मात्र तूम्हाला जर अल्कोहल इंटोलरेट असेल तर शरिरातील डायजेस्टिव्ह सिस्टिम काम करणार नाही म्हणजे जास्त पाणी पिणं, उचक्या लागणं अशी लक्षणे दिसून येतात. 

अल्कोहल इंनटॉलरेट मुळे काय होवू शकतं ? 

अल्कोहल इंनटॉलरेटमुळे शरिरात पाण्याचे प्रमाण कमी होतं. डोळे सुजतात, चेहरा सुजतो कधीकधी चेहऱ्यावर फोड येवू शकतात. त्वचा निस्तेज होवू लागते. हातापायाला घाम येवू शकतो. 

कोणत्या प्रकारची दारू पिल्यावर जास्त त्रास होण्याची शक्यता असते. 

अभ्यासकांच्या मते वाईन मुळे अल्कोहल इनटॉलरेट होण्याची शक्यता जास्त असते. त्याचसोबत बियर मुळे देखील समस्या होते. रम आणि व्हिस्की यांचा क्रमांक यानंतर लागतो. 

अचानक असा त्रास सुरू होवू शकतो हा? 

काही लोकांच म्हणणं असत की आम्हाला पहिला त्रास होत नव्हता पण आत्ता त्रास सुरू झाला. डॉक्टरांच्या मते वारंवार दारू पिल्यानंतर असा त्रास अचानक देखील सुरू होवू शकतो. अल्कोहलच्या एलर्जीपेक्षा हा वेगळा त्रास असल्याने लोकांना तो सुरू झाला की दारू बंद करणे हा एकमेव उपाय असतो. 

हे ही वाचा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.