अस कुठलं जेल उरलं नव्हतं की ड्रग माफिया एल चापो तिथून पळून गेला नाही

याचा काहीच फरक पडत नाही कि तुम्ही किती वेळा पकडले गेले आहात, एक मार्ग असतोच असतो सुटायचा त्यामुळे हार न मानता आपले प्रयत्न चालू ठेवा – एल चापो गुजमन.

हा व्यक्ती अंडरवर्ल्ड मधला सगळ्यात कुख्यात ड्रग्ज तस्कर म्हणून ओळखला जायचा आणि हा वरचा सुरवातीचा सुविचार म्हणा किंवा कुविचार म्हणा तो सुद्धा याच बहादराचा आहे. एल चापो हा जगातला सगळ्यात श्रीमंत आणि मोठा ड्रग्ज तस्कर होता. जेव्हा जेव्हा त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं तेव्हा तेव्हा तो जेलमधून पळून जाण्यास यशस्वी ठरला. तर जाणून घेऊया एल चापोबद्दल. 

लहानपणी वाईट संगतीला लागलेला एल चापोची ओळख अफूच्या शेतीसोबत झाली.

अफू लावता लावता त्याला अफूसोबत ड्रग्ज विक्रीचा चस्का लागला आणि या नादातच तो ड्रग्ज माफिया बनला. पण त्याच्या ड्रग्ज व्यवहारांपेक्षा जेलमधून पळून जाण्याच्या गोष्टी जास्त गाजल्या. सीनाओला कार्टेल या गुन्हेगारी संघटनेचा तो लीडर होता.

मेक्सिकोमधल्या अनेक ड्रग्ज वॉरमध्ये एल चापोने हत्या घडवून आणल्या. त्याच्या मारण्याच्या पद्धती या इतरांपेक्षा बीभत्स होत्या. इतर ड्रग्ज डिलरच्या तुलनेत एल चापोने दुसऱ्या देशांना ड्रग्ज पाठ्वण्यापर्यंत मजल  मारली होती. यात भुयारी मार्गाचा कुशलतेने वापर तो करायचा. हे भुयार बनवण्यासाठी टॉपच्या इंजिनिअर लोकांना तो हे काम लावायचा. 

१९९३ साली एल चापोला मेक्सिकन जेलने २० वर्षांची शिक्षा सुनावली. 

जेलमध्ये बसून तो आपली गॅंग चालवायचा. १९ जानेवारी २००१ साली जेलच्या गार्डच्या मदतीने तो पहिल्यांदा तो जेलमधून फरार झाला. ८ वर्ष जेलमध्ये राहून तो वैतागला होता आणि  बाहेर आल्यावर तो आधीपेक्षा जास्त खतरनाक झाला. २००३ सालापर्यंत तो जगातला सगळ्यात मोठा ड्रग्ज तस्कर झालेला होता. 

२०१४ साली एल चापोला पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या पण २०१५ साली तो पुन्हा एकदा फरार झाला. यावेळी जेलमधून पळून जाण्यासाठी त्याने एका भुयाराचा सहारा घेतला. जेलच्या बाथरूममधून त्याने एक अशी भुयार बनवली कि जी बरीच लांब होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यामधून बाईकसुद्धा जाऊ शकत होती. एल चापोच्या या कारवायांमुळे मेक्सिकन पोलीस वैतागले होते.

या वैतागातूनच मेक्सिकन सरकारने एल चापोला पकडून देणाऱ्याला ३.८ मिलियनचं बक्षीस ठेवलेलं होतं. 

या घटनेच्या एक वर्षानंतर लगेचच एल चापोला पोलिसांनी पकडलं. यावेळी तो पळून जाऊ नये म्हणून त्याला पकडल्या पकडल्या अमेरिकेच्या जेलमध्ये पाठवण्यात आलं. पहिल्यांदा जेव्हा एल चापोला पळून जाण्यात यश आलं तेव्हा त्याने जेलमधल्या सगळ्या गार्ड लोकांना विकत घेतलं होतं. ७१ लोकांना त्याने प्रचंड पैसे खाऊ घातले होते हे प्रकरण तो पळून गेल्यानंतर उघडकीस आलं होतं. 

या जेल ब्रेक कांड इतकं गाजलं कि मेक्सिकन पोलिसांवर लोकं हसू लागली होती. अनेक मॅगेझिनच्या टॉपवर त्याचा फोटो असायचा. ड्रग्ज तस्करीच्या काळात मेक्सिकन पोलिसांसोबत बऱ्याचदा त्याचा सामना झाला होता. २०१५ सालच्या पोलीस चकमकीत तो जखमीसुद्धा झाला होता. 

जेलमधून पळून गेल्यानंतर मेक्सिकन पोलीस, आर्मी जवळपास सगळं सैन्य एल चापोला शोधात होतं त्यावेळी हा एल चापो इतका बिनधास्त होता कि त्याने अमेरिकी फिल्म स्टार सिन पेन्नला इंटरव्हिव्ह दिला होता. या इंटरव्हिव्हमध्ये त्याने सांगितलं होतं कि त्याच्या आयुष्यावर एखादा सिनेमा बनावा. आज घडीला त्याच्या जीवनावर अनेक सिनेमे बनलेले आहेत पण एल चापोला ते पाहायला मिळालेले नाहीत कारण तो जेलमधून पळून जाण्यात यशस्वी ठरला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.