पहिला ब्रेक थ्रू देऊन सुद्धा आर डी बर्मन गुरुदत्त सोबत काम करायला तयार नव्हते

आर के कॅम्पस मध्ये जोवर जयकिशन हयात होते तोवर इतर संगीतकारांना प्रवेश हा जवळपास बंद होता. बरसात (१९४९) ते कल आज और कल (१९७१) हा संपूर्ण कालखंड आर के मध्ये शंकर जयकिशन यांचा होता. (अपवाद फक्त जागते राहो, अब दिल्ली दूर नही आणि बूट पॉलिश या चित्रपटाचा!) 

१२ सप्टेंबर  १९७१ रोजी जय किशन यांचे निधन झाले. 

त्यानंतर संगीतकार शंकर यांनी शंकर जयकिशन या नावानेच पुढची पंधरा ते वीस वर्ष चित्रपटांना संगीत दिले  पण आता त्यात ‘ती’ जादू नव्हती. राज कपूर यांनी देखील १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना पाचारण केले. यानंतर १९७५ साली ‘धरम करम’ या चित्रपटाची ज्या वेळी  सुरुवात त्यांनी केली त्यावेळी या चित्रपटाचे संगीतकार म्हणून आर डी बर्मन यांचे नाव फायनल झाले. 

या सिनेमाचे दिग्दर्शन रणधीर कपूर करणार होता. यातील काही गाणी तयार झाली. फक्त एक महत्त्वाच्या थीम सॉंगचे रेकॉर्डिंग अजून बाकी होते. यासाठी रणधीर कपूर ने आर डी बर्मन यांना असे सांगितले ,”या गाण्याची धून तुम्हाला पापा कडून फायनल करून घ्यावी लागेल!” 

त्यावेळी आर डी बर्मन नाराज झाले. ते म्हणाले ,”हा काय प्रकार आहे? चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्ही आहात. मग राजकपूरकडे मी का जायचे?” तेंव्हा रणधीर कपूरने  सांगितले,” मी जेथे मी जरी दिग्दर्शक असलो तरी, तुम्हाला माहिती आहे राजकपूर संगीतातले खरे जाणकार गर्दी आहेत. 

त्यांना संगीताची जाण आहे. आर केचे सगळे चित्रपट हे राजकपूर यांच्या समोर शंकरजय किशन यांनी स्वरबद्ध केले होते.” त्यावर राहुल देव बर्मन म्हणाले,” तुम्ही मला याची कल्पना आली द्यायला हवी तसे असते तर कदाचित मी हा सिनेमा देखील केला नसता!” 

आता थक्क व्हायची पाळी रणधीरची होती. त्यांनी विचारले,” पण तुमचा या प्रकाराला एवढा विरोध का?” त्यावर आर डी बर्मन यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमाचा अनुभव सांगितला जो गुरुदत्त यांच्या सोबतचा होता. तो किस्सा असा होता. ‘क्रिएटिव्ह डिफरन्सेस’ मुळे बऱ्याचदा चांगल्या कलाकृती बनवूच शकत नाही. अति परफेक्टनिस्ट असणं कधीकधी व्यवहारिक उपयोगाचे नसते. 

निर्माता दिग्दर्शक गुरुदत्त यामुळेच त्याच्या अनेक प्रोजेक्ट अर्धवट सोडून देत होता. कारण त्याच्या मनातील सर्जनशीलता हे क्षणाक्षणाला बदलत असे. याचा फटका त्याच्या सोबत काम करणाऱ्यांना सह कलाकारांना बसायचा. 

संगीतकार राहुल देव बर्मन यांना हिंदी सिनेमा मध्ये पहिल्यांदा संगीत देण्याची संधी गुरुदत्त यांनीच ‘राज’ या चित्रपटाच्या वेळी दिली होती.

या सिनेमासाठी आर डी बर्मन खूप उत्सुक होते. त्यांनी अतिशय गोड अशी गाणी या चित्रपटासाठी बनवली होती. पण यासाठी गुरुदत्त सोबत अनेक दिवस रात्री त्यांना चाली ऐकवाव्या लागल्या होत्या. गुरुचे चटकन समाधान कधीच होत नसे. पंचम जंग जंग पछाडला होता.

यातील काही गाण्यांचे रेकॉर्डिंग देखील झाले होते पण गुरुदत्त यांचे विचार बदलले आणि त्यांनी हा प्रोजेक्ट बंद करून टाकला. त्यामुळे राहुल देव बर्मन यांचा हा पहिला सिनेमा आणि गाणी पडद्यावर आलेच नाहीत.

हा स्वानुभव सांगून आर डी रणधीर ला म्हणाले ,”आता मला पुन्हा इथे हाच धोका संभवतो आहे. गुरुदत्त यांनी भले मला हिंदी सिनेमासाठी पहिल्यांदा संधी दिली पण त्यांच्या अति चिकित्सक स्वभावामुळे मी संगीतकार म्हणून केलेल्या धून,घेतलेली मेहनत  अक्षरशः वाया गेली. राजकपूर यांच्या मीटिंगमध्ये सुद्धा जर काही कमी जास्त झाले तर माझ्या सोन्यासारख्या धूनची पुन्हा एकदा वाट लागेल!”

रणधीर कपूर ने विश्वास दिला,” असे काही होणार नाही. उद्या सकाळी तुम्ही राज कपूर यांना तुमच्या ट्युन्स ऐकवा ते नक्की तुमची ट्यून फायनल करतील. हे गाणे राजकपूर यांच्यासाठी अगदी स्पेशल आहे. डोन्ट वरी गो अहेड!” दुसऱ्या दिवशी आर डी बर्मन आर के मध्ये गेले. 

गीताचे बोल होते ‘एक दिन बिक जायेगा माटी के मोल जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल….” गायक मुकेश आणि राज कपूर साठी हे गाणे खूप महत्त्वाचे होते. कारण हे गाणे मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. 

राज कपूर चे जवळचे असलेले शैलेंद्र, हसरत, शंकर जयकिशन हे कोणीच राहिलेले या चित्रपटात नव्हते. फक्त मुकेश त्यांचा सहारा होता. त्यामुळे राज कपूर साठी सुद्धा एक आव्हान होते. पण आर डी बर्मन यांनी कमाल केली काही क्षणातच राज कपूर यांना ही धून आवडली आणि गाण्याची रेकॉर्डिंग झाले. गाणे अप्रतिम बनले. अमर बनले. चित्रपटात हे गाणे राज कपूर वर चित्रित झाले.

आर डी ला आर के चा चांगला अनुभव आला.पण आर के चा पुढे एकच सिनेमा ‘बीवी ओ बीवी ‘ त्यांना संगीता साठी मिळाला!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.