मोदीजींच्या विरोधात बोलल्याने डॉ. संग्राम पाटील यांच्यावर फेसबुकने कारवाई केली आहे का?

डॉ. संग्राम पाटील. हे नाव माहित नाही असे लोक महाराष्ट्रात क्वचित सापडतील. कोरोनाच्या भीतीच्या काळात ज्यांनी आपल्याला सोशल मीडियामधील व्हिडिओच्या माध्यमातून जगायला आधार दिला, असे नाव म्हणजे डॉ. संग्राम पाटील. एकीकडे प्रस्थापित माध्यम संक्रमण आणि मृतांच्या संख्येचा वाढता आकडा दाखवून काळजात धडकी भरवत होते.

तर दुसरीकडे संग्राम पाटील मात्र स्वतःच्या ‘Dr Sangram G Patil’ या युट्युब चॅनलवरून किंवा फेसबुक पेजवरुन कोरोना विषयी मार्गदर्शन, त्याबद्दल लोकांच्यात जनजागृती करत होते. खरी परिस्थिती सांगत होते.

मूळ जळगावचे असलेल्या या खान्देश सुपुत्राचे शिक्षण पुण्यात झाले. लग्नानंतर ते व त्यांच्या पत्नी नुपूर पाटील हे युके मध्ये स्थायिक झाले. कोरोना परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविणाऱ्या ब्रिटनमध्ये ते सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.

पण सध्या याच डॉ. संग्राम पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवर बॅन आणला आहे, आणि या मागचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लिहिणं आणि बोलणं. स्वतः डॉ. पाटील यांनी युट्युबवरून व्हिडीओ शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे.

त्याचं झालं असं की, रविवारी २३ मे रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी डॉ. संग्राम पाटील यांनी आपल्या https://www.facebook.com/drsangramgpatil/ या फेसबुक अकाउंटवरून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन भाषण एकत्र करुन अपलोड केली होती.

यातील पहिलं भाषण होतं, २०१९ मधील सुरत येथील यूथ कॉन्क्लेवमध्ये झालेलं. यात ते म्हणतं होते,

कुछ लोगों का स्वभाव होता है रोते रहना… मेरा न रोने में विश्वास है न रुलाने में विश्वास है।

तर दुसरं भाषण होतं २१ मे रोजीचं. यात ते स्वत:च्या मतदारसंघातील म्हणजेच वाराणसी येथील डॉक्टरांशी संवाद साधताना भावुक झाले होते तो प्रसंग होता.

https://fb.watch/5MD9kvVVcU/ डॉ. पाटील यांनी हाच व्हिडीओ शेअर केला.

२५ तारखेला पहिली वॉर्निंग देण्यात आली… 

त्यानंतर २५ तारखेला डॉ. पाटील यांना कम्युनिटी स्टॅण्डर्डच उल्लंघन केल्याप्रकरणी पहिली वॉर्निंग देण्यात आली. मात्र यात कारवाई करण्याचा कुठेही उल्लेख नव्हता. सोबतच चुकून झालं असल्यास काहीही ऍक्शन घेतली जाणार नाही असं आश्वासन देखील देण्यात आलं.

मात्र त्यांचं दिवशी काही वेळातच त्यांना ३० दिवसांसाठी FB LIVE आणि जाहिरात बॅन करण्यात आल्याचं सांगितलं आलं. यानंतर पुढच्या काही वेळातच हेच निर्बंध ६० दिवसांसाठी वाढवण्यात आले असल्याचा त्यांना मेसेज आला.

रात्री पर्यंत डॉ. पाटील यांना याच व्हिडीओवर २४ तासांसाठी कमेंट किंवा पोस्ट बॅन करण्यात आलं.

या पूर्वी देखील एक अकाउंट बॅन करण्यात आलं आहे.

गतवर्षी जेव्हा परदेशात कोरोना वाढत होता तेव्हा देशातील काही नामंकित माध्यमांनी सरकार आणि देशाला कोरोना बाबत देशात सावध करण्यास सुरुवात केली होती. यात देशाने काय करायला हवं? आणि पंतप्रधान काय करत आहेत याबाबत माहिती सांगण्यात आली होती. तेव्हा देशात कोरोनाचे रुग्ण सापडले नव्हते.

त्याच वेळी डॉ. संग्राम पाटील यांनी देखील अशाच माहिती संदर्भातील एक व्हिडीओ मराठी मध्ये तयार केला. यानंतरच ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. यानंतर पुढच्या वर्षभराच्या काळात ते सातत्यानं कोरोना बाबत जनजागृती, कोरोनची धोरण याबाबत भाष्य करत राहिले.

मात्र याच दरम्यान त्यांच्या पहिल्या अकाउंवर अशाच प्रकारचे निर्बंध आणत ते अकाउंट फेसबुककडून डिलीट करण्यात आलं होतं.

माझ्यासारख्याच अनेकांवर फेसबुककडून कारवाई करण्यात आली असल्याचा दावा देखील डॉ. पाटील करतात. ते म्हणतात, सरकारच्या कोरोनाविषयक धोरणांबद्दल बोलणाऱ्या, त्याची चिकित्सा कारणाऱ्यावर सोबत अनेक भाजप विरोधी लोकांवर, पत्रकार आणि डॉक्टर यांच्यावर देखील यापूर्वी कारवाई झाली आहे.

मात्र त्यानंतर डॉ. पाटील यांनी दुसरे अकाऊंट तयार केलं, सोबतच युट्युबचा देखील ते आधीपासून वापर करत होते.

यावर्षी डॉ. पाटील यांनी पुन्हा एक व्हिडीओ हिंदी मध्ये तयार केला. यात त्यांनी कोरोनावरील उपचार, ऑक्सिजन, रेमडीसीवीर या सगळ्या गोष्टींबाबत भारतात काय सुरु आहे आणि परदेशात काय सुरु आहे याचा तुलनात्मक अभ्यास करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर ते संपूर्ण देशात लाईमलाईटमध्ये आले.

२३ एप्रिल रोजी डॉ. पाटील यांनी केलेला ‘एक डॉलरचं सुपर वॅक्सीन’ हा व्हिडीओ तयार केला होता. ज्यात त्यांनी अमेरिकेतील एका सुपर व्हॅक्सीन बाबत लोकांना माहिती दिली आहे.

फेसबुकने का केली कारवाई :

त्यानंतर आता डॉ. संग्राम पाटील यांच्यावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली आहे. आता ही कारवाई का केली तर याबाबत देखील ते बोलतात. ते म्हणतात, कोणत्याही व्यावसायिकाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना तिथल्या सरकार सोबत चांगले संबंध स्थापित करायचे असतात. त्यामुळेच फेसबुक सरकारच्या बाजूने जातं आहे.

त्यामुळेच सरकार विरोधात काही बोललं तर तुमच्या अकाऊंट वर तात्काळ कारवाई केली जाते. कम्युनिटी स्टॅण्डर्डच्या विरोधात पोस्ट असल्याचं सांगितलं जातं.

यातून ही जर काही जण सरकारसोबत नसतील तर सध्या जे फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बंद करण्याचे दबाव टाकले जात आहेत ते या धोरणांमधूनच टाकले जातं आहेत.

भारतातील माध्यम पंतप्रधानांच्या हातातील खेळणं 

या सगळ्या दरम्यान भारतातील अनेक प्रस्थापित माध्यमांवर देखील डॉ. पाटील भाष्य करतात. ते म्हणतात. भारतात काही हाताच्या बोटवार मोजण्याइतके माध्यम सोडले तर सगळेच्या सगळे माध्यम २ ते ३ लोकांच्या हातात आहेत, आणि ते सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील खेळण झाले आहेत.

त्यामुळेच एवढे चुकीचे निर्णय घेऊन, धोरणात चुका करून देखील अजूनही तिथं टिकून आहेत. तर दुसऱ्या बाजूला मोदी भक्तांची फौज उभी आहेच.

माझा आवाज बंद करू शकणार नाहीत…

मात्र कितीही कारवाई झाली, आणि किती हि अकाऊंट बंद पडली तरी मी माझं बोलणं थांबवणार नसल्याचं देखील डॉ. संग्राम पाटील सांगतात. यासाठी ते युट्युब, इंस्टग्राम यांचा आधार घेऊ. तिकडे जर काही कारवाई झाली तर छोटे छोटे व्हिडीओ तुमच्या पर्यंत पोहचवत राहीण असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Doctor says

    By this way all the leftist’, Congress supporters, liberal’s and many more people’s accounts would be either deleted or banned by FB/Twitter… Some news channels, news papers, and social media accounts would get closed. But you can see that those who were barking that Modi is traitor, Hitler and so on are still barking and no action is taken against them. Hope you all are wise enough.

Leave A Reply

Your email address will not be published.