गॅलिपोलीची लढाई ज्याला जगातलं सगळ्यात फसलेलं आणि खराब युद्ध म्हटलं जातं….

विश्व युद्धाच्या चर्चा ज्या ज्या वेळी होतात त्या त्या वेळी गॅलिपोली अभियान/ कॅम्पेन विषयी बऱ्याचदा बोललं जातं आणि त्याला जगातला सगळ्यात खराब मोर्चा म्हटलं जातं पण नक्की गॅलिपोली अभियान काय होतं ते आपण जाणून घेऊया.

पहिल्या विश्व युद्धात निर्माण झालेल्या दरीला कमी करण्यासाठी मित्र राष्ट्र ब्रिटन,फ्रांस आणि रुस यांनी एक साहसिक प्रयत्न केला होता.

 या देशांनी आपला प्रमुख शत्रू असलेल्या जर्मनी आणि ऑस्ट्रिया- हंगेरी यांना नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला होता. या दरम्यान लंडनमध्ये विस्टन चर्चिलच्या नेतृत्वाखाली ब्लॅक सी आणि इजिन सी यांच्यातला जलमार्ग ताब्यात घेऊन ऑटोमन (तुर्क) संपवण्याचा डाव आखला होता. यानंतर मित्र राष्ट्रच्या सेनेने तुर्कीच्या गॅलिपोली पेनिनसुलामध्ये प्रवेश केला.

पहिल्या विश्व युद्धाच्या वेळी ऑटोमन ( तुर्क ) सेनेने मित्र राष्ट्रांच्या सेनेविरुद्ध युद्ध लढलं. गॅलिपोली हा तो प्रदेश होता जिथून तुर्की सेनेच्या विरुद्ध मित्र राष्ट्रांनी मोर्चा उघडला होता. याला गॅलिपोली अभियान किंवा डार्डानेल्स अभियान म्हणून ओळखलं जातं. पहिल्या विश्व युद्धात सगळ्यात जास्त रक्तपात याच ठिकाणी घडला होता. म्हणून इतिहासाला सगळ्यात खराब मोर्चा म्हणून ओळखलं जातं.

मार्च 1915 मध्ये युरोपात पहिल्या विश्व युद्धाच्या काळात आधी विस्टन चर्चिलने आणि नंतर ब्रिटनचे पहिले लॉर्ड एडमिरलटीने तुर्कीच्या डार्डानेल्सला ताब्यात घेण्याची योजना आखली. अगोदर मित्र राष्ट्रांनी या प्रांतावर मोठ्या प्रमाणात गोळीबार, बॉम्ब फेकले नंतर मित्र राष्ट्रांनी या ऑपरेशन मध्ये नौसेना उतरवली. त्यावेळी युद्धात इतक्या मोठ्या प्रमाणावर नौसेना उतरवणे मोठी गोष्ट होती.

जानेवारी 1916 पर्यंत चाललेल्या या युद्धात जवळपास 8 हजार ऑस्ट्रेलियन सैनिकांसोबत 40 हजारापेक्षा जास्त ब्रिटिश सैनिक मारले गेले. एवढं असूनही या युद्धात तुर्कीचा विजय झाला आणि विस्टन चर्चिलला पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि मुस्तफा कमाल आतातुर्कच्या नेतृत्वात नव्या तुर्कीचा उदय झाला.

गॅलिपोली अभियानाला सगळ्यात खराब युद्ध का म्हटलं जातं आणि मित्र राष्ट्रांचा पराभव होण्यास कुठली कारणं कारणीभूत ठरलं. युद्धभूमी असल्याने गॅलिपोली मध्येगरम हवा, सैनिकांच्या सडलेल्या शरीरावर बसलेल्या माश्या तिथं निर्माण झाल्या. यामुळे लढाई करणाऱ्या सैनिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. सैनिकांना खाण्यापिण्यात सगळीकडे माश्या यामुळे जगणं मुश्किल झालं होतं.

त्यामुळे यात बरेच सैनिक मारले गेले. आजवर इतका भयानक रक्तपात झालेला नव्हता म्हणून या युद्धाला आजवरचं सगळ्यात खराब युद्ध म्हटलं जातं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.