जगातलं सगळ्यात मूर्ख युद्ध ; एका बादलीवरून इटलीमध्ये २ हजार लोकं मारली गेली होती…

जगाच्या इतिहासात अनेक युद्ध झाली ज्याचे अपरिमित परिणाम सोसावे लागले. प्रदेशच्या प्रदेश उजाड झाले आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या युध्दांमधली काही युद्ध ऐतिहासिक होती तर काही युद्ध हि अगदीच क्षुल्लक कारणावून झालेली होती. आजचा किस्सासुद्धा अशाच एका युद्धाचा आहे ज्याचं कारण इतकं क्षुल्लक होतं कि एका बादलीच्या नादात २००० लोकं मारली गेली होती. हे युद्ध आजही जगातलं सगळ्यात मूर्ख युद्ध म्हणून ओळखलं जातं.

या युद्धाचा काळ होता तेव्हाचा जेव्हा लोक पूर्णपणे नैसर्गिक जलस्रोतांवर अवलंबून होते. त्यामुळे लोक जमिनी खोदून  विहिरी तयार करत असत आणि बादलीने पाणी काढून त्यावरून तहान भागवत असे. आजपासून ७०० वर्षांपूर्वी याच बादलीच्या नादात मोठं युद्ध झालं होतं. हे ऐतिहासिक युद्ध लढलं गेलं १३२५ मध्ये इटलीच्या बोलोग्ना आणि मोडेना या दोन शहरांमध्ये \ राज्यांमध्ये.

बोलोग्ना आणि मोडेना या दोन्ही प्रांताच्या सीमा अगदीच एकमेकांना खेटून होत्या आणि या दोन शहरांमधील अंतर हे फक्त ५०\१०० मीटर होतं. एक दिवस अचानक बोलोग्ना शहराच्या गेटजवळ असलेला एका विहिरीवर पाणी काढण्यासाठी ठेवलेली बादली गायब झाली. खरंतर हि गोष्ट  नॉर्मल होती कि फक्त बादली चोरीला गेलीय. पण एकजणाने हूल उठवली कि मोडेना शहराच्या सैनिकांनी ती बादली चोरून नेली.

हा त काळ होता जेव्हा मोडेना आणि बोलोग्ना या दोन देशांमध्ये तणावाची परिस्थिती होती. संबंध जरा ताणले गेलेले होते आणि युद्धाची खुमखुमी दोन्ही शहरात धुमसत होती. बोलोग्ना शहरात हि बादली चोरीला गेल्याची बातमी वेगानं पसरली, हा बोलोग्ना शहराचा अपमान झाल्याची समजूत तिथल्या लोकांची झालेली होती. जेव्हा मोडेना प्रशासनाला याचा जाब विचारण्यात आला तेव्हा मोडेना प्रशासनाच्या लोकांनी याला नकार दिला कि आमच्या सैनिकांनी ती बादली चोरली आहे.

इथंच ठिणगी पडली आणि बोलेग्नोच्या लोकांनी ठरवलं कि हीच ती वेळ आहे कि आपल्या अपमानाचा बदला घेण्याची, ती बादली आता प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचं कारण बनली होती. या दरम्यान बोलोग्नोची लोकसंख्याच नाही तर सैन्यबळसुद्धा अफाट होतं. बोलेग्नोने ३२ हजारांची फौज मोडेनावर हल्ला करायला पाठवली आणि बादली परत मिळवण्याची शपथ घेतली. ज्यावेळी मोडेनाला या हल्ल्याची कुणकुण लागली तेव्हा त्यांनी ७ हजारांची फौज युद्धात उतरवली.

या युद्धात मोडेनाचं सैन्यबळ कमी होतं आणि बोलोग्नाचं जास्त तरी हि हे युद्ध चांगलंच गाजलं. तुल्यबळ युद्ध झाल्याचं सांगितलं जातं, या युद्धात मोडेनाचं संख्याबळ कमी असतानाही त्यांनी बोलेग्नोच्या सैनिकांना पळवून लावलं.

बोलेग्नोच्या सैन्यांचा पाठलाग करत करत मोडेनाचे लोकं बोलेग्नोत शिरले आणि बादली चोरली नव्हती तरी आरोप लावला म्हणून मोडेनाच्या लोकांनी तिथली एक बादली उचलून आपल्या प्रांतात परत आले. हि बादली विजयाचं प्रतीक म्हणून मिरवली गेली.

या युद्धात दोन्ही शहराचे मिळून २ हजार माणसं मारली गेली. जगातलं सगळ्यात मूर्खयुद्ध म्हणून बोलग्ना आणि मोडेना यांची जगभर नाचक्की झाली. आजही ती ऐतिहासिक बादली मोडेनाच्या टाऊनहॉल मध्ये लावण्यात आलॆली आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.